अर्थकारण

युग्म!

Submitted by चिट्टी on 7 October, 2016 - 05:15

माझ्या ओठांच्या सायीला
तुझ्या ओठांची साखर
माझ्या भिजल्या मनाला
तुझ्या पंखांची पाखर

माझ्या अंगांगा लाभावी
तुझ्या स्पर्शाचीच लेणी
नकळतशी सुटावी
माझ्या पाठीवर वेणी

तुझा श्वास माझा श्वास
व्हावे हवेनेही कुंद
युग्म भारले पाहता
यामिनीने व्हावे धुंद

शब्दखुणा: 

चला 'रफाल'ला जाणून घेऊया

Submitted by पराग१२२६३ on 25 September, 2016 - 10:56

गेल्या २३ सप्टेंबर १६ रोजी भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार आहे. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे. हा करार झाल्यानंतर आता त्याची एकूण किंमत आणि प्रत्यक्षात हवाईदलाला मिळणाऱ्या विमानांची संख्या यावरून आता बरीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. तिच चर्चा इथे करण्याचा हेतू नाही.

कोजागिरी मसाला दूध गटग

Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
तारीख/वेळ: 
15 October, 2016 - 12:40 to 18 October, 2016 - 12:00
ठिकाण/पत्ता: 
शनिवारवाडा, न्यूजर्सी. (योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)

कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्‍यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.

माहितीचा स्रोत: 
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव: 

महागाई का?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 16 September, 2016 - 07:49

मे २०१४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन सत्तांतर झाले. त्यानंतर काहीच दिवसांत इंधनांच्या किंमती झपाट्याने उतरु लागल्या. अर्थात ह्यात नव्या सरकारचे काहीच कर्तृत्व नव्हते आणि त्याप्रमाणे त्याचे श्रेयही त्यांना प्रसारमाध्यमांनी दिले नाहीच. त्याचवेळी शेतमालाच्या किंमती मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचे श्रेय (?) मात्र जनता, विरोधक व प्रसारमाध्यमांनी सरकारच्या पदरात पुरेपूर घातले.

देवळांचे अर्थकारण - भावना आणि तर्क

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 10 September, 2016 - 10:20

भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.
मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.
भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात
आणि त्या भावना जर चांगल्या शब्दांत गुडाळलेल्या असतील तर आपण फारसा विचार न करता त्या लगेच घेतो.
*म्हणूनच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेले संदेश हे भावनेला हात घालणारे असतात आणि अनेकदा तर्कहीन असतात*.
*हिंदूंचे सण जवळ आले की भावनांनी ओथंबलेले संदेश व्हायरल होतात*.
*होळी, दिवाळी हे कॉमन*.

तडका - खुमखुमी मध्यरात्रीची

Submitted by vishal maske on 31 August, 2016 - 21:13

खुमखुमी मध्यरात्रीची

अार्थिक शोषण करत आहे
पेट्रोल-डिझेल भाव वाढता
अहो कमी केल्या भावाचाही
काढला जातो एकदाच कडता

हि इंधन दर वाढवण्याची
जणू सरकारची हमी असते
सकाळी इंधन भरणारांना
मध्यरात्रीची खुमखुमी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांदा पाच पैसे किलो

Submitted by vishal maske on 23 August, 2016 - 11:36

कांदा पाच पैसे किलो

शेतकर्याला कांदा देताना
भाव भलताच वाढतो आहे
शेतकर्याचा विकत घेताना
भावाने कांदा पडतो आहे

वारंवार भेटणारं सांगा हे
दु:ख कुठवर भोगायचं
पाच पैसे किलोने कांदा
विकुन कसंच जगायचं,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - स्पर्धा

Submitted by vishal maske on 15 August, 2016 - 21:22

स्पर्धा

मानवी जीवनात आता
स्पर्धेला मोठं महत्व आहे
स्पर्धेनं माणूस मोठा होतो
हे मना-मनात तत्व आहे

प्रत्येकाच्या मनात इथे
स्पर्धेसाठीची तृष्णा आहे
दैनंदिन जीवनात देखील
नजरेस स्पर्धामय चष्मा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

शब्दखुणा: 

तडका - कर्ज वसुलीत

Submitted by vishal maske on 12 August, 2016 - 21:13

कर्ज वसुलीत

घेताना घेतात
कर्ज भरमसाठ
मात्र फेडताना
फिरवतात पाठ

कर्ज वसुलीसाठी मग
प्रॉपर्टीही जप्त होते
कमावलेली अब्रुही
बदनामीत मुफ्त जाते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण