अर्थकारण

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी

Submitted by अमितव on 2 February, 2023 - 00:09

हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

अर्थाअर्थी -(भाग-०६) - नचिकेतच्या वहिन्या..

Submitted by अ'निरु'द्ध on 28 January, 2023 - 08:25

NRI भारतात गुंतवणूक

Submitted by च्रप्स on 28 November, 2022 - 12:03

नमस्कार- मला भारतात चांगल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करायची आहे...
hdfc संचय प्लस प्लॅन कसा आहे.. 7.38% रिटर्न आहे ग्यारेंटेड... आणखी चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुचवता का प्लिज...

जगाच्या डोक्यावरच्या घडामोडी

Submitted by पराग१२२६३ on 19 November, 2022 - 00:16

उत्तर धृव महासागराचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये अमेरिकेनं या महासागरात पार पाडलेली Rapid Dragon क्षेपणास्त्राची चाचणी. हे अण्वस्त्रवाहू क्रूझ क्षेपणास्त्र असून ते मालवाहू विमानातून सोडता येतं. त्याचीच ही चाचणी होती. या क्षेपणास्त्राचा पल्ला 950 ते 1900 किलोमीटर इतका आहे. या चाचणीच्या काही काळ आधी रशियानंही आपलं उत्तर धृव धोरण जाहीर केलं होतं.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

Submitted by पराग१२२६३ on 15 October, 2022 - 07:21

यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

(१०, ००, ००,००, ००, ००,०००) : अबब आणि अरेरे !

Submitted by कुमार१ on 9 October, 2022 - 21:59

मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो.

LIC वाले नातेवाईक

Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07

Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...

शब्दखुणा: 

नवीन ट्रेडिंग इन्डेक्स - निफ्ती ५४३

Submitted by बिचुकले on 3 August, 2022 - 10:04

आमदार आणी खासदाराना नवीन सेक्टर खाली आणुन नैशनल आणी बौम्बे एक्चेण्ज वर लिस्ट करण्यासाठी विचार चालु आहे अशी सेबीच्या विश्वसनीय सुत्रांकडुन आतील बातमी आली आहे. बरेच दिवसापासुन हि मागणे प्रलंबित आहे.
खासदारांना जास्त मान द्यावा म्हणुन निफ्ती ५४३ असे नवीन इन्डेक्स चे नावहि ठरले आहे . कोणत्या सेक्टर खाली त्यांना लिस्ट करावे याबद्दल खुप चर्चा झाली . शेवटी त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी नवीनच सेक्टर काढायचे ठरले. सेक्टर चे नाव ठरवायला फार वेळ लागला नाहि . घोडे या नवीन सेक्टर वर त्यांना आणण्यात येत आहे

आपण पक्केपणा करून कसे वाचू शकतो?

Submitted by मोहिनी१२३ on 7 July, 2022 - 05:48

भीड ही भिकेची बहिण आहे. तरीसुध्दा आर्थिक व्यवहारात सुध्दा आपण काहीवेळा भिडस्त राहून फसवणूक करून घेतो.

त्यातून शिकून पुढच्यावेळी जास्त दक्ष रहातो. अशा दक्षपणाचे, पक्केपणाचे किस्से येऊद्यात.

शब्दखुणा: 

तुमच्या सोबत कधी फ्राॅड झालाय का?

Submitted by काड्यासारू आगलावे on 1 July, 2022 - 08:03

मागे मला एका क्रेडीट कार्ड विकनार्या मुलीने सांगीतलं की क्रेडीट कार्ड फ्री आहे. मी विश्वास ठेऊन घेतलं नी १५०० रूपये पहीलं बील आलं जोईनींग फी म्हणून. त्या मुलीने नंतर फोन स्विकारणे बंद केलं, एसबीआय मधून मेल ला काहीही ऊत्तर आलं नाही. आता तीन महीन्याने ५००० रूपये मागतेय एसबीआय. मी देनार नाहीये. पण क्रेडीट स्कोर खराब केलाय त्या लोकांनी.
तुमच्या सोबत असा कधी कुठेतरी फ्राॅड झालाय का? मग त्यावेळी तुम्ही काय केले? पैसे, वस्तू परत मिळाली का?

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण