लग्न

लग्नापुर्वीची मैत्रीण

Submitted by विजय देशमुख on 27 June, 2013 - 04:37

"आज तर तुम्ही खुप खुश दिसताय"
"हा. बऱ्याच वर्षांनी मित्रांची भेट होनार आहे न"
"मित्राम्ची की मैत्रिणीची? "
"तेच ते.... "
"अच्छा, म्हणजे कोणी स्पेशल होती वाटते"
"हा हा हा ... मला वाटून काय उपयोग होता, तिच्याकडून काहीच सिग्नल नव्हता. आणि एकाच पोरिवर मरणारे बरेच होते. "
"का? बाकिच्या मुली नव्हत्या का? "
"मेकॅनिकलला कसल्या आल्याय मुली... जाउ दे, चल आता लौकर"
************
"मी माने, शरद माने"
"हाय, मी संगीता चौधरी, अनिकेतची बायको, ते तिथे, ब्ल्यू शर्ट"
"अच्छा, आणि त्यांच्या शेजारी जी आहे ती माझी बायको, स्नेहल"
"हो का... हे सगळे मजेत आहेत अन मला बोअर होतय"
"मला पण... "
*********

विषय: 
शब्दखुणा: 

लग्नाची नवी (सुधारीत?) व्याख्या

Submitted by विजय देशमुख on 19 June, 2013 - 00:32

आजच्या सकाळला "शरीरसंबंध ठरेल कायदेशीर विवाह" ही बातमी वाचली. शरीरसंबंधावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने निकाल दिला की काय कुणास ठाउक.

पण यामुळे बलात्कार आणी शरीरसंबंध कमी होतील ?

शब्दखुणा: 

अपघात

Submitted by सीमंतिनी on 11 June, 2013 - 11:31

सकाळी तळ्यावर जायला बाहेर पडले तेव्हा दोघी म्हाताऱ्या झाडाखाली बसल्या होत्या. मला बघून एक कुजबुजली “ही लग्न करायचं म्हणतीये” दुसरी उद्गारली “देवा रे! वाटलं नव्ह्त ही अस काही करेल. सालस आहे तशी. केव्हढी असेल ही वयाने?” सोयर असेल तेव्हा आई ह्या पहिल्या आज्जीलाच बोलवायची, माझ्याही वेळेला हीच असणार. सगळ गावच तिला बोलवायचं. पण म्हणून कोणाच वय ती विसरली अस थोडी होणार! ती म्हणाली “बहुतेक वीसावर पाच किंवा सहा असेल.” दुसऱ्या आज्जीने लगेच शेरे झाडले “लहान आहे का? तरी अस लग्न करायचं म्हणते! आपल्या ना रक्ताचा ना मांसाचा. अशा माणसाबरोबर आयुष्यभर रहायचं. काही कळत नाही ह्या हल्लीच्या मुलींचं.

विषय: 

आहेर भैरव

Submitted by मुंगेरीलाल on 25 December, 2012 - 07:44

आजकाल लग्न समारंभ मी चुकवीत नाही. कारण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भेटीगाठींपेक्षाही जरा निराळ्या चवीचं सुग्रास जेवण यथेच्छ झोडणे हा माझा अंतस्थ हेतू असतो. शिवाय बहुतेक ठिकाणी आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नये असे पत्रिकेत लिहिलेलंच असतं त्यामुळे या गोष्टी आवर्जून वेळ काढून विकत आणण्याचे कष्टही जवळपास इतिहासजमा झालेले आहेत. जरा बऱ्यापैकी कपडे घातले की काम झालं. पूर्वी असं नव्हतं. अगदी सुरवातीला अशी सूचना छापून यायची तेंव्हाही ते खरोखरच प्रमाण मानायचं की तरीही काहीतरी न्यायचंच या संभ्रमात पडायला व्हायचं. बायको म्हणायची ‘अहो ते लिहायची पद्धत आहे, पण आपण जवळचे पडलो, बरं दिसत नाही’.

विषय: 

फिझिओथेरापिस्ट - भाग १

Submitted by आशयगुणे on 13 September, 2012 - 14:29

नवीन शहरात किंवा गावी गेलात तर तिथे जाऊन काय करायचे ह्याचे बरेच तोडगे आहेत. खादाडीचा शौक असलेल्यांना त्या शहराचे ( किंवा गावचे ) खाद्यपदार्थ अनुभवता येतात. काहींना ऐतिहासिक वास्तू पाहण्यात रस असतो तर काहींना फक्त खिडकी पलीकडील वस्तू न्याहाळण्यात! ( ह्या दुसऱ्या वर्गातील लोकांची मला भयंकर दया येते! अहो, दुकानात टांगलेला शर्ट घेण्यासाठी कुणी यात्रा करतं का? तसले शर्ट तर आपल्या गावी असतातच की! असो...) काही लोकांना तिथल्या मातीचा, दगडांचा संग्रह करायची हौस असते!

विषय: 

मुलीचा बाप! - भाग २ (अंतिम भाग)

Submitted by आशयगुणे on 31 May, 2012 - 04:01

" तुला आठवतंय? आज बरोबर चार वर्ष झाली मी तुला प्रोपोज केलं होतं . चार वर्ष कशी गेली कळले देखील नाही. काय काय झाले रे ह्या वर्षात.... माय्क्रोबायोच्या कचाट्यातून आपण दोघेही सुटलो. मग माझे वर्षभर जॉब करणे आणि MBA साठी तयारी करणे. मग दोन वर्षांचं MBA आणि आता मी देखील नोकरीला तयार. आणि माझा बच्चू अजून फिरतोच आहे. तुझे हे फिरणे कधी कमी होणार रे?" मला ही बच्चू म्हणायची हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

गुलमोहर: 

मुलीचा बाप - भाग १

Submitted by आशयगुणे on 30 May, 2012 - 13:37

आमच्या छोट्या शहरी एक बऱ्यापैकी मोठा तलाव आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना तसा तो जवळ देखील आहे. तलावावर कमळांची सुंदर गादी तयार झालेली आहे आणि म्युन्सिपालटी ने थोडीशी दया दाखवून ती अनुभवायला तिकडे बसायची सोय देखील केली आहे. काठावरच छोटं देऊळ असल्यामुळे अनेक आजी-आजोबांची सकाळची फेरी आणि नंतर चर्चासत्र इकडेच रंगतात. आत अनेक देव असल्यामुळे 'वारांची वारी' अगदी ठरलेली! संध्याकाळी देखील कसली तरी व्याखानं, मध्येच एखादा गाण्यांचा कार्यक्रम, कुणाचा तरी कौतुक सोहळा, पत्त्यांचे सामने, कॅरम खेळणे हे इथल्या छोट्याशा व्यासपीठावर नित्याने होते असते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लग्न

Submitted by सौरभ.. on 15 March, 2012 - 11:29

१२ डिसेंबर २००८. फारसं काही घडलं नाही या दिवशी, पण मी 'उच्चशिक्षित' झालो.कसा झालो याची चर्चा करण्यात फारसा अर्थ नाही.मातापितरांच्या अपेक्षेपेक्षा खुपच शिकलो म्हणुन त्यांना आनंदाचं भरतं आलं.पण शाळेमधे 'पास' आणी 'नापास' यामधली 'वर घातला' ही एक स्थिती असते, तसं काहीसं feeling होत. ( माझ्या मते 'वर घातला' यासारखा दुसरा संतापजनक प्रकार नसेल.एक तर सन्मानानी पास तरी करा नाहीतर अपमानानी नापास तरी करा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नाव-बदल: हिंदु विवाह कायदा

Submitted by भानुप्रिया on 7 March, 2012 - 06:07

Hindu Marriage Act ह्या बद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत.

लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?
मात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का?

म्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का?

कायदेशीर बाबींमधील माहिती असणाऱ्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

आणि सोबत काही लिंक्स दिल्या तर सोन्याहून पिवळे!

धन्नो!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लग्न