ययाती...

ययाती...

Submitted by सुधाकर कदम on 20 June, 2013 - 00:59

ययाती...

स्पर्शून एकदा तू केले मला ययाती
या भग्न मंदिराशी का जोडतेस नाती ?

आता अशा घडीला मी काय बा करावे
तेजाळलेस देहा लावून एक ज्योती

विरता धुक्यात दोघे कोणी कुणा दिसेना
तीरावरी नभाच्या राहील फक्त दीप्ती

पांथस्थ मी असा की रस्ता फितूर ज्याला
सारेच भास नुसते चकवा जसा सभोती

माझे न राहिले ते तू मागते कशाला
स्वप्नातल्या असे ह्या बिनपालखी वराती

हा पीळ आतड्याचा कोणासही न कळला
मधुपात्र हे रिकामे हातात फक्त माती

सुधाकर कदम

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ययाती...