शेती

तडका - माती प्रेम

Submitted by vishal maske on 25 July, 2015 - 10:13

माती प्रेम

शेतकर्‍याच्या आत्महत्येचेहीे
वेग-वेगळे तर्क-वितर्क आहेत
मंत्र्यांच्या बोलण्यातुन दिसते
कोण किती सतर्क आहेत,.!

बोगस कारभार हाकण्यापेक्षा
किसानी जगणं जगुन बघा
मातीवरचं प्रेम काय असतं ते
एकदा मातीतंच येऊन बघा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

साहेब,...

Submitted by vishal maske on 23 July, 2015 - 11:29

कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के " यांची शेतकर्‍यांच्या भावना प्रखरपणे मांडणारी ही एक वास्तवदर्शी कविता,...

साहेब,...

वरून वरून बोलु नका
एकदा शेतात येऊन जा
डोळ्यात तुमच्या पाणी येईल
करपतं पीक पाहून जा

फक्त कागदंच वाचु नका
रानात पुरावा वाळला आहे
एका-एका ठोंबासाठी
जीव आमचा जळला आहे

आभाळ सताड आ वासुन
पीक खाण्यास टपलं आहे
लेकराबाळांचं सुख आमच्या
मातीमधी खपलं आहे

हिशोब कर्जाचा पाहून तर
जगणं आमचं बारगळलंय
अन् रानामध्ये पेरलेलं
बीज सुध्दा विरघळलंय

आम्ही जाणतो आहोत तुमची
सत्तेची बोर पिकलेली आहे
पण तुमचे धोरणं ऐकुनच
पिकाने मान टाकलेली आहे

शांत बसुन पाहिलं आहे

तडका - कर्ज फेड

Submitted by vishal maske on 21 July, 2015 - 01:00

कर्ज फेड

कर्जातुन निघलेलं जीणंही
कर्जामध्येच जातं आहे
शेतकरी आणि कर्जाचं हे
पिढ्यान् पिढ्याचं नातं आहे

कर्जमाफी न करणारं सरकार
शेतकर्‍याचं कर्ज होऊ नये
सरकार रूपी कर्ज फेडण्याची
शेतकर्‍यावर वेळ येऊ नये,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कर्ज माफी,...!

Submitted by vishal maske on 17 July, 2015 - 23:21

कर्ज माफी,...!

विरोधकांनी विरोधही केला
तरीही जाग आलीच नाही
दूष्काळी परिस्थितीची जणू
सरकारला जाण झालीच नाही

कर्ज माफीचा मुद्दा वारंवार
सरकार कडून टळतो आहे
अन् कर्जाच्या बेरजेमध्येच
शेतकरी घूटमळतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सापका-शिपका

Submitted by vishal maske on 16 July, 2015 - 23:04

सापका-शिपका

आभाळाची सताड काया
मना-मनाला छेडू लागली
एका-एका थेंबाची आशा
मना-मनातुन वाढू लागली

आता शेतामधलं पीक जणू
मरण यातनेच्या शिक्षेत आहे
अन् शेतकरी मात्र तटस्थपणे
सापक्या-शिपक्याच्या प्रतिक्षेत आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - दुष्काळात

Submitted by vishal maske on 15 July, 2015 - 00:26

दुष्काळात

शेतातला एक-एक ठोंब
पाण्याविना पोरका आहे
या दुष्काळी पावसाळ्याचा
मना-मनाला चुरका आहे

निर्गालाच बाधक ठरणारा
कसा नैसर्गिक महिमा आहे
कर्जाळू जीनं जगता-जगता
दुष्ळात तेरावा महिना आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शेतकर्‍याची व्यथा

Submitted by vishal maske on 13 July, 2015 - 11:58

शेतकर्‍याची व्यथा

वेग-वेगळ्या विचारांनुसार
अधिवेशनं सजले जातील
शेतकर्‍याचे प्रश्न मांडणारेही
अधिवेशनात गाजले जातील

नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्‍याला दुष्काळी भत्ता नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नैसर्गिक प्रकोप

Submitted by vishal maske on 7 July, 2015 - 22:19

नैसर्गिक प्रकोप

दिला निसर्गानं दगा
मेघ लबाड-लबाड
कसं सावरावं मनं
जीनं उजाडं-उजाडं

अपेक्षांची झाली राख
सारे चुकले अंदाज
थेंब-थेंब डोळ्यातला
कसा वाचवावा आज,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - किसानी जगणं

Submitted by vishal maske on 5 July, 2015 - 11:31

किसानी जगणं

शेतातील पिकाचे अस्तित्व
अंतिम टप्प्यात गेले आहे
जगण्याची आस आहे पण
मरणाचे संकट आले आहे

पिकाकडं पाहण्यासाठी आता
मनात बळ ना उरलेलं आहे
अन् शेता-शेतातील अंकुरासह
किसानी जगणं हरलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पावसाळी उन्हाळा,...

Submitted by vishal maske on 3 July, 2015 - 11:13

पावसाळी उन्हाळा,...

पावसाळा असला तरीही
हा पावसाळा वाटत नाही
पावसाचा पडलेला खंड
आता मनाला पटत नाही

आता या नैसर्गिक विद्रोहाने
निसर्गाचीही अवकळा आहे
अन् पावसाळ्याच्या नावाने
हा पावसाळी उन्हाळा आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - शेती