शेती

तडका - नाना,मकरंद

Submitted by vishal maske on 11 August, 2015 - 00:20

नाना मकरंद

या दुष्काळलेल्या माणसांना
त्यांनी माणूसकी वाटलेली आहे
या मातीतल्या त्या लेकरांची
मातीशी नाळ ना तुटलेली आहे

शेतकर्‍यांचे अश्रु पाहून
मन त्यांचं तळमळलं आहे
सरकारला जे कळलं नाही
ते नाना,मकरंदला कळलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गेलेले दिवस

Submitted by vishal maske on 7 August, 2015 - 22:54

गेलेले दिवस

सुखासाठी तर कधी कुणाच्या
दु:खासाठीही नवस असतात
कधी चांगले तर कधी वाईट
जीवनामधले दिवस असतात

वाईट काळातील दिवस हे
पराकाष्टेनं रेटवले जातात
तर गेलेले दिवस मात्र
पुन्हा-पुन्हा आठवले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रयोग फसले,...!

Submitted by vishal maske on 7 August, 2015 - 00:34

प्रयोग फसले,...!

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी
ढगही होते उत्सुकलेले
खडसावताहेत आज तुम्हाला
हे प्रयोग सारे फसलेले

जखमेवरती मीठ चोळल्याने
आमचे डोळे कसे हो पुसायचे,.!
प्रयोग नियंत्रणाखाली आहे म्हणून
तुम्ही नियंत्रणावर का बसायचे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पाणी

Submitted by vishal maske on 5 August, 2015 - 22:39

पाणी

प्रवाहा विरूध्द पोहण्याचे
निर्णय कधी गैर असतात
पाण्या मध्ये राहून कधी
पाण्याशीच वैर नसतात

पाणी जीवन असलं तरी
पाणी मरणही होऊ शकतं
जगण्या-मरण्याची साक्ष
पाणी सुध्दा देऊ शकतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भविष्यात

Submitted by vishal maske on 5 August, 2015 - 10:34

भविष्यात,...

दिवसें-दिवस टेक्नॉलॉजीत
नव-नविन बदल घडू लागले
हे मान्यच करावं लागेल की
माणसंही पाऊस पाडू लागले

कदाचित संपेल गरज टँकरचीही
भविष्यात बदल फिरू लागतील
कृत्रिम पावसाच्याच मागण्याही
पाण्यासाठी लोक करू लागतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

कहाणी,...

Submitted by vishal maske on 4 August, 2015 - 22:50

----------- कहाणी,... -----------

त्याच्या थेंब-थेंब बरसण्याने
ती सतत-सतत खुश झाली
पण जेव्हा-जेव्हा तो दुर गेला
ती तेव्हा-तेव्हा बुश झाली

ओलिचिंब भिजायची तेव्हा
ती सुगंध सोडत फुगायची
अवती-भवती तीच्या सारी
ही सृष्टी सदैव फुलायची

पण का कुणास ठाऊक
त्यांचा ब्रेक-अप झाला होता
तीला त्याची आस होती
पण त्याने दगा दिला होता

ती प्रतिक्षा त्याची करत होती
हा विरह मात्र ना सरत होता
तो मात्र दुरून-दुरूनच पाहत
तीच्या अवती-भवती फिरत होता

एकमेकांची गरज असताना जणू
त्यांची नैसर्गिकता संपली होती
त्यांच्या या ब्रेक-अप प्रकरणानं
हि सृष्टीही सारी कंपली होती

तडका - कृत्रिमतेत

Submitted by vishal maske on 4 August, 2015 - 22:10

कृत्रिमतेत

जस-जशी गरज भासु लागेल
तसा निसर्ग झुलवु लागतील
निसर्ग चक्रात चालता-चालता
माणसं निसर्ग चालवु लागतील

नैसर्गिक नाही झाले तरीही
माणसं कृत्रिम ओले होतील
गरज भासेल तेव्हा-तेव्हा
ढगांचे सिझर केले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पावसाचा जोर

Submitted by vishal maske on 4 August, 2015 - 10:25

पावसाचा जोर

टिपका-टिपका टिपकवुन
पावसाला हूलकावणी आहे
दिसतोय पण पडत नाही
हि नैसर्गिक सतावणी आहे

जोरदार पाऊस पाहण्याला
आस आमची सक्षम आहे
मात्र पावसाचा झिमझिमाट
जोर धरण्यास अक्षम आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कृत्रिम पावसात

Submitted by vishal maske on 3 August, 2015 - 21:57

कृत्रिम पावसात

एकापेक्षा एक विध्वंस करत
निसर्गाने इतिहास रचला आहे
शेतकर्‍यासह सामान्य माणूस
आता दुष्काळाने खचला आहे

अनपेक्षित नैसर्गिक कोपामुळे
अपेक्षांचे भांडार थिजु लागले
तरीही मात्र मनातील स्वप्न
कृत्रिम पावसात भिजु लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विठ्ठला

Submitted by vishal maske on 27 July, 2015 - 10:48

विठ्ठला

कुणी असतील तिथुन तर
कुणी पंढरपुरी जाऊन
कुणी विठ्ठल नाम घेऊन
आपले गार्‍हाणे गाऊन

आप-आपल्या पध्दतीने असे
भक्तांनी साकडे घातले आहेत
प्रत्येक-प्रत्येक साकड्यामध्ये
पावसाचे मुद्दे घेतले आहेत

भक्तांच्या या साकड्यांसाठी
ये सत्वरी तु धाऊन ये
या दुष्काळात पावसाला
विठ्ठला पाऊस होऊन ये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - शेती