मनोरंजन

स्वप्न आणि वास्तव - भाग १

Submitted by बोबो निलेश on 17 February, 2014 - 22:05

मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले.

शब्दखुणा: 

फेसबुक नव्हतं तेव्हा..

Submitted by Aseem Bhagwat on 15 February, 2014 - 22:52

आजच्या आम्हा तरुणांना प्रश्न पडतो कि फेसबुक नव्हतं तेव्हां लोक काय करत असतील ? त्यांच्या जीवनात काय अर्थ असेल ? सोशल नेटवर्किंग, चॅट, गटग हे काहीच नव्हतं का ?

या लोकांचा टाईमपास काय असेल ?
आणि त्याचं उत्तर मिळालं..

पहाच !
.
.
.
.
.

facebook.jpg

प्रांत/गाव: 

जाहिराती - मला प्रेमात पाडणाऱ्या !!

Submitted by मी मी on 12 February, 2014 - 13:28

काही जाहिराती मनाच्या किती जवळच्या वाटतात. काहींची गाणी आपलीशी वाटतात. काहीतल्या थीम तर काही केरेक्टर..काही काही जाहिराती पाहतांना तर हमखास आपल्या काही जवळच्या माणसांची आठवण येते. काही जाहिरातीतले वातावरण जुने दिवस आठवण करवून देतात काही स्वप्नील भविष्यात घेऊन जातात….

SBI Life च्या त्या जुन्या गाण्यावर आधारित जाहिरात मला नेहेमीच attract करायची

'हम जब होंगे साठ साल के …या गाण्याच्या चालीवर स्पेशली जेव्हा तो म्हणतो ….

लंबी सी एक गाडी मे फिर तुमको लेकर जाऊंगा
तुम अंदर से देखना बाहर और मै आईस्क्रीम खाउंगा

विषय: 

लोखंडी खाटेवर

Submitted by बोबो निलेश on 10 February, 2014 - 11:50

वरटीप - कुणाच्याही भावना दुखवायचा उद्देश नाही.

लोखंडी खाटेवर - विडंबन कविता (गाण्याशी संबंधित सर्व थोर आणि महान मंडळींची आणि रसिकांची माफी मागून… )

चाल - मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग
-----------------------------------------------------

लोखंडी खाटेवर अंग निजून दुखतंय ग
सांगा या ढेकणास रक्त शोषून पीडतोय ग।।धृ ।।

सूळसूळतो गोधडीत हाच दुष्ट मेला ग
हुळहुळतो चाव्याने अजून देह सारा ग ।।१।।

अजून तुझे काविळीचे डोळे पिवळे पिवळे ग
अजून तुझ्या देहामध्ये त्राण नाही उरले ग ।।२।।

ब्लू अम्ब्रेला -- एका छोट्या मुलीच्या मनाचा संवेदनशील आणि मेच्युअर प्रवास

Submitted by मी मी on 9 February, 2014 - 09:21

भारतात चांगल्या कलाकृतींना जीवन नाही अस मला सतत वाटत असतं. इथल्या लोकांची कलागुणांची पारख कमी पडतेय कि मुळात कलागुणांची आवडंच नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण असे आहे खरे …. आणि फिल्म च्या बाबतीत हे पूर्वीपासून घडत होते त्याहीपेक्षा आज ते त्याहीपलीकडे अजीजीने घडत आहे. म्हणुनच कदाचित 'The ship of theseus' सारख्या दर्जेदार फिल्म भारताच्याच निर्मात्यांना भारतात रिलीज करावा वाटत नाही. त्यासाठी कोणीतरी (किरण-आमिर खान) विशेष प्रयत्न घेऊन आपल्यासाठी म्हणून रिलीज करतात आणि इतकं होऊनही परदेशात गाजलेला सिनेमा त्याच्याच देशात भारतात चक्क आदळतो आणि वाईटटट आदळतो.

विषय: 

सरकारी वाहिन्या आणि गरिबी

Submitted by विजय देशमुख on 2 February, 2014 - 21:45

कित्येक वर्षांनी दुरदर्शनची एखादी मालिका बघितली - माझी शाळा. खरं तर ही मालिका बघण्याची इतकी उत्सुकता होती, की एकाचवेळी ५-६ भाग बघितले, आणि आवडलेही... पण....

ऋतु - संधी

Submitted by पुरंदरे शशांक on 29 January, 2014 - 06:00

ऋतु - संधी

अलख गाजता शिशिराचा तो
तरुकुळ अवघे तल्लीन झाले
हिरवी-पिवळी वस्त्रे त्यागून
पुरेपूर ते निसंग झाले

पुष्पभूषणे नको उपाधी
दंड-कमंडलू हाती धरले
वैराग्याचे तेज झळकता
हस्त रवीचे मृदुमय झाले

उभे उभेचि लावी समाधी
श्वास निरोधन इतुके केले
जीवनरसही नको बोलुनी
धरणीमाते सचिंत केले

किती काळ ही लावी समाधी
द्विजगण अवघे व्याकुळ झाले
निष्पर्णशा त्या शाखांवर
गान तयांचे लोपून गेले

ऋतुराजाची येता स्वारी
ताम्रध्वजा त्या डोलु लागती
प्रसन्न हांसत डोलत शाखी
वृक्षकुळे त्यागती समाधी

गर्द हरित पालवी झळकता
पक्षीकुलांच्या कंठी गाणी
रंगांची उधळण होताना

शब्दखुणा: 

बारीकराव ....

Submitted by पुरंदरे शशांक on 29 January, 2014 - 02:23

बारीकराव...

एक होते बारीकराव
सदा त्यांची काव-काव

नक्को हे पोहे अस्ले
कोथिंबीर खोबरे किस्ले ???

पोळी-भात आवडेना
भाजी कोणती चालेना

अजून होती बारीक बारीक
सग्ळे म्हण्ती आली खारीक

बारीकराव बसले रुसून
आई सांगे त्यांना हसून

पोळी-भाजी, भात ताजा
सग्ळे खावे माझ्या राजा

कोशिंबीर करकरीत
फळे मस्त रसरशीत

मजेत खावे सग्ळे मस्त
सोडून सारे वेडे हट्ट

घट्ट - मुट्ट होशील बघ
कोण कशाला चिडविल मग .....
-----------------------------------------------------

शब्दखुणा: 

झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

आईऽऽ .. भूऽऽक ........

Submitted by पुरंदरे शशांक on 25 January, 2014 - 22:53

आईऽऽ .. भूऽऽक ........

कस्ली भूक लाग्लीये आईऽ
खायला लवकर कर ना काही

शिरा-उप्पीट कर नं काही तरी
तोवर जराशी चाखतो कचोरी

फरसाण चिक्की संपले सारे ??
आत्ता तर होते वेफर्स, कुरकुरे !!!

कुठय या डब्यात लाडू नि चकली ?
कडबोळी तीही एक-दोनंच उरली !!

अशी काय बघतेस मान वेळावून
बघ ना किती मी गेलोय कोमेजून !!

"पोट का पोतं हे म्हणायचं तुझं
आत्ताच जेवण झालंय कोणाचं ?"

"काढतात का कोणी असं कोणाचं खाणं
त्यात मी आहे बाळ तुझं शाणं !!!"

"काय ते बाळ दिस्तंय हो मला...
बकासुराचा जन्म झालाय पुन्हा !!!"

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन