मनोरंजन

वाटले नव्हते कधी

Submitted by इस्रो on 31 January, 2015 - 23:16

हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी

ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्ह्णावे वाटले नव्हते कधी

खेद त्यांनी व्यक्त केला- चूक माझी जाह्ली
चूक उमगावी धुरीणा वाटले नव्हते कधी

चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी

एकटा उरलो असा की शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझा वाटले नव्हते कधी

लागलो गझला लिहाया फावल्या वेळेत मी
लोक गुणगुणतील त्याही वाटले नव्हते कधी

-नाहिद नुरुद्दिन नालबंद 'इस्रो'
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]

हिंजवडी चावडी

Submitted by mi_anu on 31 January, 2015 - 02:57

(ही जेवणानंतरची चावडी, त्याचे ठिकाण, पात्रे, गप्पा सर्व काल्पनिक आणि कैच्याकै आहे.याचा वस्तुस्थितीशी संबंध असल्याशी शंका आल्यास दोन तीन शिंका देऊन सर्व शंका झटकून टाकाव्या.)

"काय म्हणाला गं तुझा मांजर अप्रेझलला?"

फिर वही रात है .....

Submitted by विशाल कुलकर्णी on 30 January, 2015 - 00:38

साधारणतः चाळीसच्या दशकात खांडव्याहून मायानगरी मुंबईत आलेल्या आभासकुमार गांगूली नावाच्या त्या कलंदराने बहुदा रसिकांच्या मनावर तहहयात अधिराज्य गाजवायचं हे ठरवुनच मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. सुरूवात अभिनयक्षेत्रातुनच झाली. १९४६ मध्ये आलेल्या आणि अशोककुमार नायक असलेल्या 'शिकारी' मधुन किशोरदांनी एक अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. अशोककुमारांची इच्छा किशोरदांनी त्यांच्याप्रमाणे अभिनेता बनावे हीच होती. स्वत; किशोरदा मात्र फिल्मी करियरबद्दल फारसे गंभीर नव्हते. १९४८ साली आलेल्या 'जिद्दी' मध्ये संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोरदांना सर्वप्रथम गाण्याची संधी दिली.

श्वानहिरो

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 January, 2015 - 00:15

नाव डॅनी असले तरी हा चित्रपटातील खलनायक नसून आमच्या घरातील श्वानहिरो आहे. माझा पुतण्या- अभिषेकच्या आग्रहास्तव माझ्या मिस्टरांनी एका काळ्या कुळकुळीत ग्रेटडेन नामक जातीच्या कुत्र्याच्या पिलाला आमच्या घरी आणले. ग्रेटडेन जातीचे कुत्रे धिप्पाड, उंच असतात. असेच वेगळेपण यांच्या पिलांमध्येही असते. इतर गावठी कुत्र्यांच्या पिल्लांपेक्षा उंच, काळा कुळकुळीत चमकता रंग तसेच पट्टा लावल्याने पावडर-तीट लावलेल्या बाळाप्रमाणे दिसणारा डॅनी घरातील सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय झाला होता.

विषय: 
शब्दखुणा: 

मालिका - असे हे कन्यादान

Submitted by कनिका on 26 January, 2015 - 18:53

नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.

बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….

शब्दखुणा: 

अरे, ही तर खोट्याची दुनिया!

Submitted by कोकणस्थ on 20 January, 2015 - 22:49

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥

सत्यासारखा दुसरा धर्म नव्हे. सत्यापलीकडे काहीच नाही. आणि असत्याहून अधिक तीव्र काहीच नाही.

श्रियुत गंगाधर टिपरे - मराठी मालिका

Submitted by योकु on 18 January, 2015 - 11:41

मला एवढ्यात युट्युबवर गंगाधर टिपरे मालिकेचे बरेचसे भाग सापडलेत. मालिका माहिती होतीच. पण आता काही भाग पुन्हा पाहिलेत अन एक नो नॉन्सेस करमणुक मिळाली.

ही मालिका दिलिप प्रभावळकर यांच्या 'अनुदिनी' पुस्तकावर आधारित आहे.

अगदी सर्वसामान्य चौकोनी कुटुंब + आबा.
राजन भिसे - शेखर
शुभांगी गोखले - श्यामल
रेश्मा नाईक - शलाका
विकास कदम - शिर्या (श्रिलेश)
आणि
दिलीप प्रभावळकर - आबा

विषय: 

फ्लॅश फिक्शन ( शिकार )

Submitted by कवठीचाफा on 16 January, 2015 - 18:06

सरोवराकाठी त्यांची पार्टी पूर्णं रंगात आली होती, वेगवेगळ्या झाडांपासून मिळवलेली मद्ये, मोसमात उपलब्ध असलेली फळे, अनेक तर्‍हेच्या झाडांच्या पानांना एकत्र करून तयार केलेल्या खाद्यकृती, सोबत जिभेला झणका देणार्‍या मुळ्या. हो, असेच सगळे, कारण आता जिभेचे बाकी चोचले पुरवायला दूर दूरपर्यंत एकही शिकार उपलब्ध होत नव्हती, जी काही थोडीफार शिकार शिल्लक होती ती सुद्धा संरक्षीत करून फार दूरवर नेऊन ठेवण्यात आलेली होती.

आमच्या मुलींचे पालक ( इथे पुन्हा टाईप केलेले. लिंक नव्हे)

Submitted by स्वीट टॉकर on 13 January, 2015 - 05:47

आमच्या घरी हॉलमध्ये बर्‍यापैकी मोठ्या साइझचा एक फोटो आहे. मी, माझी पत्नी शुभदा आणि तिच्या हातात आठ महिन्यांची आमची कन्या पुनव. मूळ फोटो पंचवीस वर्षें जुना. एकदम ordinary.

आमची एक मानसकन्या देखील आहे. तिचं नाव दीपाली. तिच्याकडे हा जुना छोटासा धूसर फोटो होता. फोटोशॉप सॉफ्टवेअरची उत्तम माहिती आणि बरीच मेहनत यांच्या जोरावर तिनी या फोटोला नवजीवन दिलं, एनलार्ज केला, चांगल्या फ्रेममध्ये लावून एक महिन्यापूर्वी आम्हाला भेट दिला. अर्थातच आम्ही कौतुकानी तो हॉलमध्ये टेबलावर ठेवला.

आता उत्तरार्ध.

पिंपरीची बस, प्रेमशास्त्र आणि मै प्रेम की दीवानी हूं।

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 8 January, 2015 - 02:56

१. पिंपरीची बस - त्या काळी पुण्यात पीएमपीएमएल ऐवजी पिंपरी-चिंचवड (पीसीएमटी) व पुणे (पीएमटी) महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बस सेवा होत्या. कोणी कुठल्या भागात सेवा द्यायची याबद्दलचे काही नियम होते. पुणे महानगरपालिकेच्या पुणेस्टेशन परिसरात पीसीएमटी ला प्रवासी भरण्यास मुभा होती परंतु पुणे मनपा परिसरात येथे पीसीएमटीला परवानगी नव्हती. तसेच पीएमटीला निगडीच्या मुख्य चौकात तसेच पुढे जकातनाका, सोमाटणे फाटा, तळेगाव या भागापर्यंत प्रवासी वाहतुकीस परवानगी होती परंतु पिंपरी चिंचवड नवनगर (निगडी-प्राधिकरण), मासूळकर कॉलनी, पिंपरी गांव, वडगांव अशा काही भागांमध्ये पीएमटीला परवानगी नव्हती.

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन