मनोरंजन

तडका - नेट चाट

Submitted by vishal maske on 17 May, 2015 - 06:22

नेट चाट

मना-मनातल्या भावनांना
शब्दांमध्ये ओतल्या जातात
सोशियल मिडीयातील गप्पा
मेसेज मध्ये नटल्या जातात

अशा ऑनलाईन गप्पांची
एक वेगळीच झलक असते
कित्तेक ऑनलाईन गप्पांत
अनोळखीच ओळख असते

अशा अनोळखी ओळखीचेही
हर्टलाईन कनेक्शन असतात
कुठे तिरस्कारित तर कुठे
प्रेमाचेही लक्षण असतात

कुणाशी चाटिंग करावी वाटते
कुणाशी चाटिंग नको वाटते
कुणाची चाटिंग रिअल असते
कुणाची चाटिंग फेको वाटते

कुणी-कुणी सिरिअस असतात
कुणी भलतेच जोकरे असतात
ऑनलाईन चाटिंग करतानाही
कुणा-कुणाचे नखरे असतात

चाटिंगने माणसं जोडता येतात
तसे ते तुटलेही जाऊ शकतात
वेग-वेगळ्या विचारांनुसार

तडका - हसण्याचे सत्य

Submitted by vishal maske on 13 May, 2015 - 12:37

हसण्याचे सत्य

प्रत्येकाच्याच जीवनामध्ये
अटळ स्थानावर हशा असतो
कुणी खद-खदा हसतो तर
कुणी-कुणी मुरमुशा हसतो

कित्तेकांनी हे मान्य केलं की
हसतील त्यांचे दात दिसतील
पण ज्यांना दातच नसतील
त्यांचे दात कसे दिसतील,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शाब्दिक आक्रमण

Submitted by vishal maske on 12 May, 2015 - 10:47

शाब्दिक आक्रमण

सरळ बोलता येईल तिथे
सरळ-सरळ वार आहेत
कुणावरती ना कुणावरती
रोज शाब्दिक प्रहार आहेत

सरळ बोलता नाही आल्यास
शालीतील जोड्यांचे वापर आहेत
शाब्दीक आक्रमण करण्यासाठी
इथे एकापेक्षा एक सुपर आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आठवणी,...

Submitted by vishal maske on 10 May, 2015 - 10:13

आठवणी,...

जीवनामध्ये खुप काही
प्रत्येकाला कमवावं वाटतं
मात्र जे आयुष्यभर कमावलं
तेही क्षणात गमवावं लागतं

कुणी अनुभव घेऊन पाहतात
कुणी अनुभव दूरून पाहतात
कमावलेल्या अन गमावलेल्या
आठवणी मात्र उरून राहतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रसिध्दीच्या पोळ्या

Submitted by vishal maske on 8 May, 2015 - 10:07

प्रसिध्दीच्या पोळ्या

जे काही अंदाज लावलेले होते
ते सुध्दा व्यर्थ होऊन राहिले
आप-आपल्या पध्दतीनं कुणी
वेग-वेगळे अर्थही लावुन पाहिले

वैचारिक आणि अवैचारिक सुध्दा
एकएकाचे विधानं गाजु लागतील
कुणी सलमान खानच्या खटल्यावरती
प्रसिध्दीच्या पोळ्याही भाजु पाहतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सल-मान

Submitted by vishal maske on 7 May, 2015 - 21:19

सल-मान

कुणी म्हणाले योग्य आहे
कुणी मात्र रडून गेले
सलमानच्या शिक्षेवरती
खुप काही घडून आले

सलमानच्या या प्रकरणात
कुणी सांत्वनाला जाई
मात्र कुणा-कुणाच्या मनात
सल आहे पण मान नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

'आसक्त'चं 'रिंगण'

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’ अशी अत्यंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. देशभरातल्या नामवंत रंगमहोत्सवांमध्ये ही नाटकं वाखाणली गेली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.

प्रकार: 

जिथे रस्ता तिथे एस् टी

Submitted by स्वीट टॉकर on 5 May, 2015 - 05:59

मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. त्यामुळे वर्षात चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते महाड मार्गे पाचगणी सात तासांचा प्रवास.

आयजीच्या जीवावर

Submitted by परदेसाई on 4 May, 2015 - 16:22

'प्रवीण, अरे ही chocolates पण नेणार आहेस का? मग ती पण बॅगेत टाक', नेहा नेहमीप्रमाणे bag भरायला मदत करत होती. शेजारी tv वर काही तरी कार्यक्रम चालू होता. भारतात जायच्या बॅगा भरून व्यवस्थीत रचून ठेवल्या होत्या. आता शेवटची handbag घेऊन त्यात काहीतरी कोंबाकोंबी चालू होती. एवढ्यात tv चा नूर पालटला. हिरो हिरवीन नाहीसे होऊन अचानक बातम्या चालू झाल्या…
'India state of xxx-pradesh has suffer from a huge earthquake. Thousands of people have been ..'
'बाप रे, हे आणि काय नवीन?' प्रवीण मनातल्या मनात म्हणाला.

गंमत हास्य दिनाची

Submitted by vishal maske on 3 May, 2015 - 10:20

गंमत हास्य दिनाची,...

तीला म्हटलं हसून घे
आज हास्य दिन आहे
एक दिवस हसण्याचाही
सांग तुला का शीन आहे

तीनं माझ्याकडं पाहीलं
चेहरा थोडा गंभीर केला
तीच्या या गंभीर वर्तनाला
मी माझाच मला धीर दिला

मी प्रयत्न केला तरीही
ती मात्र हसली नाही
तीच्या स्वभावाशी ती
जराशीही फसली नाही

तीचा चेहरा पाहून मात्र
मी गप-गुमान बसलो होतो
तीला हसवण्याच्या नादात
मीच आज फसलो होतो

मात्र तीला पाहून मीही
आता पुरता गंभीर झालो
आता मीही हसणार नाही
या मतावर खंबीर झालो

माझी झालेली फसगत
आता मला दिसु लागली
मात्र माझा चेहरा पाहून
ती जोरजोरात हसु लागली

नक्की कळेनासं झालं मला

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन