मनोरंजन

झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

आईऽऽ .. भूऽऽक ........

Submitted by पुरंदरे शशांक on 25 January, 2014 - 22:53

आईऽऽ .. भूऽऽक ........

कस्ली भूक लाग्लीये आईऽ
खायला लवकर कर ना काही

शिरा-उप्पीट कर नं काही तरी
तोवर जराशी चाखतो कचोरी

फरसाण चिक्की संपले सारे ??
आत्ता तर होते वेफर्स, कुरकुरे !!!

कुठय या डब्यात लाडू नि चकली ?
कडबोळी तीही एक-दोनंच उरली !!

अशी काय बघतेस मान वेळावून
बघ ना किती मी गेलोय कोमेजून !!

"पोट का पोतं हे म्हणायचं तुझं
आत्ताच जेवण झालंय कोणाचं ?"

"काढतात का कोणी असं कोणाचं खाणं
त्यात मी आहे बाळ तुझं शाणं !!!"

"काय ते बाळ दिस्तंय हो मला...
बकासुराचा जन्म झालाय पुन्हा !!!"

शब्दखुणा: 

टोपी उंदीरमामांची ....

Submitted by पुरंदरे शशांक on 23 January, 2014 - 22:58

टोपी उंदीरमामांची ....

उंदीरमामा पिटकु छान
इवलेसे नाजुक कान

कस्से पहा ऐटीत चाल्ले
वाटेत छोटे कापड दिसले

घेऊन कापड टाण टाण
गाठले शिंप्याचे दुकान

"शिंपीदादा तुम्ही महान
शिवा जरा टोपी छान..."

"गोंडा लावा अस्सा न्यारा
म्हाराजांचा उतरेल तोरा.."

टोपी घालून गोंडेदार
गळ्यात ढोल बोंगेदार
मामा करती हा पुकार -----

ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
टोपी माझी दिमाखदार
राजमुगुट फिका पार

राजा म्हणे -"कोण तो
माझ्यासमोर गरजतो ??"

"काढून आणा त्याची टोपी
मोडेल त्याची मिजास मोठी.."

ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
राजा कस्ला भिकार्डा
टोपीसाठी कर्तोय ओर्डा

माझ्या कुतुहलाची दीनगाथा !

Submitted by सफरचंद on 22 January, 2014 - 20:48

आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा, स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'!!:

विषय: 

गाणीच गाणी ......

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2014 - 23:49

गाणीच गाणी ......

छान छान गाणी ग्गोगोड गाणी
म्हणू या राणी दोघी जणी

वेलीची गाणी फुलांची वेणी
झाडांची गाणी फळांची गोणी

पर्‍यांची गाणी जादू कहाणी
न संपणार्‍या गोष्टींची गाणी

पावसाची गाणी झुळझुळ पाणी
गडगड ढगांची लखलख गाणी

बागेची गाणी झोपाळ्यावाणी
मागे-पुढे झुलवणारी

मामाची गाणी अंगाई गाणी
गागू करुया पटाक्कनी

पापी तुझी साखरेवाणी
हसते कशी राधाराणी....
---------------------------------------

शब्दखुणा: 

सांग ना आई ऽऽ.....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 January, 2014 - 22:22

सांग ना आई ऽऽ.....

खर्रे खर्रे सांग मला
गप्प बैस म्हणू नको
नसेल सांगायचं ना तुला
पापी माझी मागू नको

ढग दिसतो आकाशात
पुढे पुढे जातो कसा
दाणकन् येऊन खाली
पडत नाही बॉल जसा ?

कोण उठवतो सूर्याला
सांगतो जा सरळ असा
जाताना पुढे पुढे तो
मागे वळत नाही कसा ?

चांदोबा हा असा कसा
एकटाच फिरतो रात्रीचा
झोपवत नाही आई याची
घेऊन एक गालगुच्चा

सगळं सांगीन बाई तुला
ऐकशील का माझं जरा
गर्रम गर्रम दूध पिऊन
थोडी लोळालोळी करा

शब्दखुणा: 

चला, ओळखा...

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2014 - 22:08

चला, ओळखा...

चला चला चला
लौकर ओळखा
खेळ गमतीचा
किती अनोखा

चला चला चला
डोळे मिटा जरा
आणि आता असे
हात पुढे करा

डोळे किलकिले
करायचे नाही
फटीतून त्यांच्या
मुळी पहायचे नाही

हातावर आहे
खाऊ मऊ मऊ ?
का कडक आहे जरा
ओळखा ओळखा भाऊ ?

ओळखा ओळखा पाहू
कसा आहे खाऊ
नाकाला विचारा
सांग जरा भाऊ

गोड का खमंग
सांग की रे वेड्या
नाकपुड्या कशा
मारतात उड्या

डोळे मिटून अशी
गंमत तरी करु
दम्ला नाकदादा
विचार कर करु

जाऊ द्या त्याला
जीभेलाच धरु
येईल का सांगता
तिला विचारु

आंबट नि चिंबट
येता जीभेवर
अंग थरथरे
पार आतवर

जीभ मारी मिटक्या
चुटुक चुटुक
हे तर आपले

शब्दखुणा: 

चाल चाल बाळा ....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2014 - 01:22

चाल चाल बाळा ....

चला चला चला
पाय टाका जरा
सोनु मोठी राणी (सोनु मोठा राजा)
काय तिचा तोरा (काय त्याचा तोरा) Happy

पाऊल एकेक
उचला अस्सेच
थोडे थोडे पुढे
टाका हलकेच

डुगडुगु डुगडुगु
होतीये गाडी
जरा गडबडे
मागे पुढे थोडी

कशी आता झाली
हळुहळु चाली
मजा किती किती
द्या बै टाळी....

शब्दखुणा: 

चिम्णुताई चिम्णुताई

Submitted by पुरंदरे शशांक on 12 January, 2014 - 00:46

चिम्णुताई चिम्णुताई
कुठेच कशा दिसत नाही ?
चिवचिव चिवचिव गोडशी
कानावरती येत नाही ??

या लवकर इकडे बाई
घर देईन मेणाचे
पाऊस येता जोराचा
गळ्णार नाही एवढुस्से

कंटाळलात भाताला ?
खाऊ देईन छानसा
टिपता येईल चिव्चिवताना
शेवचकली खमंगसा

ये जरा लवकर बाई
तुझ्याशिवाय करमत नाही
अंगणात जाऊन बस्लं तरी
बाळ आमचं जेवत नाही

चिवचिव चिवचिव ऐकल्यावर
बाळ धावेल अंगणभर
म्ममं म्ममं होईल मग
ही अशी भराभर .......

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन