मनोरंजन

अशी कबुतरे येती...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 March, 2016 - 08:13

सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती.

शब्दखुणा: 

जोक कसा मारायचा?

Submitted by विद्या भुतकर on 7 March, 2016 - 23:57

जोक कसा मारायचा? घाबरू नका डिस्क्लेमर टाकत आहे.
डिस्क्लेमर: ही पोस्ट जोक कसे लिहावे, बनवावे किंवा सांगावे यावर नाहीये. तर ही पोस्ट 'हाऊ टू किल अ जोक?' यावर आहे. मराठीमध्ये शब्दश: भाषांतर केल्यामुळे असा घोळ होणे साहजिक आहे. मी अजिबातच 'जोकाळू' (हा ही नवऱ्याचा शब्द वापरत आहे) वृत्तीची नाहीये. उलट जरा 'खडूस' च म्हणाल तर खोटे नाही. माझे सर्व मित्र मैत्रिणी केवळ त्यांच्या चांगलेपणामुळे माझे मित्र आहेत, माझ्या नाही. माझे सर्व मित्र -मैत्रिणी माझी ही पोस्ट वाचून जोक सांगायचे किंवा पाठवायचे बंद करतील याची मला खात्री आहे. असो घडाभर तेल पाजळून झालेलं आहे तर मुद्द्याचं बोलते.

विषय: 

व्हिव्हियाना हाईट्स - भाग २

Submitted by विश्वास भागवत on 7 March, 2016 - 11:59

भाग १ इथे

http://www.maayboli.com/node/57947
- - - - - - - - - - - - - -
आवाज होताच क्षितिज वायूवेगानं किचन कडे झेपावला, त्याच्या पाठोपाठ सगळेच किचन मध्ये आले. तिथे ते काळं मांजर टेबल वर उभं राहून गंजातल दूध पीत होत. त्याने काचेचा ग्लास खाली पाडला होता व त्याचे जमिनीवर पडून तुकडे झाले होते. सिद्धार्थ ने त्याला हाकललं तर ते त्याच्याच कडे पाहून गुरगुरु लागल, शेवटी जेव्हा क्षितिज नी त्याला हुसकवला तेव्हा ते पळत बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडलं.

गंमत

Submitted by आवारा on 6 March, 2016 - 07:13

गाडीच्या नंबरप्लेटवर किंवा खाली लिहलेली काही मजेदार वाक्य....

"हॉर्न वाज़वून माझ्या झोपलेल्या देशाला जागवू नका"

"AVoide GF save petrol. " ( हा एखादा कॉलेज कुमार आणि त्यातल्या त्यात gf न मिळालेला असावा असा "दाट" संशय आहे)

"ना चिंता ना भीती फक्त शिवछत्रपती... "

"बघतोस काय रागानं,
ओव्हरटेक केलय वाघानं......"

"जलो मत गाड़ी कर्जे में है।"

"हळू चालव bike तुला आय ची शपत हाय..!"

"वावर हाय त पावर हाय"

"मेरी चलती तो तेरी क्युं जलती......."

"भाऊ तु पुढे जा
तुला असेल घाई...
~•~•~•~•~•~•
माझ्या घरी
वाट पाहतेय माझी... आई"

"ऐक वेळेस चिकलात पडेल पण प्रेमात नाही पडनार"

विषय: 

ट्रोल माझा

Submitted by भरत. on 2 March, 2016 - 23:31

चालू घडामोडींपासून प्रेरणा घेऊन सुरेश भटांच्या 'दु:ख माझे' ही कविता माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अन्य काहींसाठी थोडी बदलून

ट्रोल माझा
माझियामागे असू दे !

तो बिचारा एकटा जाईल कोठे?
मी असोनी का अनाथासारखे त्याने फिरावे?

माझियावाचून** त्याला
आसरा आहे कुणाचा?

जन्मला* तेव्हापुनी
श्वानापरी
माझ्याच मागे राहिला तो!

ट्रोल माझा
माझियामागे असू दे!

फुसके बार – ०१ मार्च २०१६ आजचा अर्थसंकल्प, ऑस्कर पुरस्कार, देशविरोधी घटना व करदात्यांच्या पैशांचा हिशोब

Submitted by Rajesh Kulkarni on 29 February, 2016 - 14:51

फुसके बार – ०१ मार्च २०१६ आजचा अर्थसंकल्प, ऑस्कर पुरस्कार, देशविरोधी घटना व करदात्यांच्या पैशांचा हिशोब
.

१) आजचा अर्थसंकल्प

आजच्या बजेटवर पप्पूने ट्विट करणे हा मोठाच विनोद झाला. कसलीच दृष्टी नसलेला व दृढविश्वास नसलेला असा हा अर्थसंकल्प असल्याचे तो म्हणाला. हे शब्ददेखील त्याला कोणी पढवले कोणास ठाऊक.

मला आवडलेले साय-फाय फिक्शन्स!

Submitted by kulu on 25 February, 2016 - 03:24

साय फाय फिक्शन वरती एकही धागा शोधुनही सापडला नाही. म्हणुन हा उपद्व्याप! आपल्याला आवडलेले असे मुव्हीज जर इथे दिले तर चांगली यादी होईल.

मी माझी यादी देतोय!

१. इन्टरस्टेलार
फादर ऑफ साय्फाय असं मला वाटतो. इतका अभ्यासपुर्ण सायफाय पुर्वी कधीच आला. सायन्सलाच एक वेगळा ग्लॅमर या चित्रपटाने आणले यात वादच नाही! रेटिंगवर जाऊ नका. ज्याना मुव्ही समजला नाही त्यानी रेटिंग कमी दिले!

२. ज्युरॅसिक पार्क

अद्भूत खेळण्या

Submitted by स्वप्नाली on 24 February, 2016 - 13:59

लहान मूलाना बर्‍याचदा स्वत: च्या खेळण्या कंटाळवाण्या होतात..तेच तेच खेळायला नको वाटते, कधी कधी खेळायला कोणी सोबत नसते..अश्या वेळी, कोणत्या वस्तू मूलाना देता येतील ज्या त्यांच्या साठी नवीन असतील (वय 2-10 वर्षे), ज्यामधून त्यांना शिकायला ही मिळेल.
उदा: लोह-चुंबक, दरवज्याचा आय-होल, भिंग (मॅगनिफाइंग ग्लास), किचन मधले मोज-मापाचे चमचे. चला करू या यादी..

विषय: 

फुसके बार – २२ फेब्रुवारी २०१६ - पम्पोरमधील शहीद, जे जे मधील प्रदर्शन, पुण्यातील कॉमिककॉन

Submitted by Rajesh Kulkarni on 21 February, 2016 - 15:23

फुसके बार – २२ फेब्रुवारी २०१६ - पम्पोरमधील शहीद, जे जे मधील प्रदर्शन, पुण्यातील कॉमिककॉन
.

१) काश्मीरमधल्या पम्पोरमध्ये गेल्या जवळजवळ तीस तासांपासून अतिरेक्यांशी चालू असलेल्या चकमकीत उधमपूरच्या कॅप्टन तुषार महाजन या जवानाचा मृत्यु झाला. त्याच्या वडलांनी सांगितले की तुषार शाळेत असल्यापासूनच दहशतवादासंबंधीच्या बातम्या ऐकल्यावर मोठा झाल्यावर मी या दहशतवाद्यांना मारेन असे म्हणत असे.

तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा

Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32

ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.

कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!

सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.

प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन