दै. प्रहारमध्ये प्रकाशित झालेला हा लेख... हा माणूस खूप वेगळ्या वातावरणातून, परिस्थितीतून आलेला आहे. त्यामुळेच त्याचे विचार वेगळे वाटतात आणि मनाला थेट भिडतात. म्हणूनच हा लेख मायबोलीकरांसाठी इथे टाकते आहे...
तो http://www.prahaar.in/collag/42299.html इथेही पाहता येईल 
शेतकरी संघटक - वर्धापनदिनाच्या निमित्ताने
ही गोष्ट आहे १९८६-८७ च्या सुमारातली. सुरेश चोपडे सकाळी ६ च्या सुमारास माझ्या वर्धेतील खोलीवर आला आणि आल्याआल्याच अगदी दारावरूनच हुकूम सोडला.
आजच्या लोकसत्ता मध्ये वाय-फाय (वायरलेस फिडेलिटी) सुरक्षिततेवर छान माहिती आली आहे.
सध्या वायरलेस इंटरनेट वापरण्याचे प्रमाण बरेच आहेत आणि त्याचे धोकेही भरपूर आहेत. त्याबाबत हि माहिती मायबोलीकरांसाठी.
सकाळ वृत्तपत्रात दि. २४ नोव्हेंबर २०१० रोजी आलेली ही बातमी वाचा. या प्रकारच्या पत्रकारितेला काय म्हणावे??? 
नाग आणि मांजरीच्या झटापटीचे अगदी साद्यंत वृत्त देण्यामागचा हेतू आणि लॉजिक नक्की काय ते केवळ या पत्रकारालाच ठाऊक 
नमस्कार,
मायबोलीवर विविध विषयावर चर्चा होत असते. त्याच बरोबर आपल्या आजुबाजुच्या जगात काही महत्वाच्या घडलेल्या घटना आपल्याला वृत्तपत्र, टिव्ही, रेडिओ वगैरे मिडियातुन कळत असतात. अशा काही महत्वाच्या बातम्यांवर मायबोलीकरांनी आपले मत मांडावे. येथे आपण आपल्याला कळालेली बातमी मायबोलीकरां पर्यंत पोहचवुन त्यावर त्यांची मते जाणुन त्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे वैचारीक देवाणघेवान होऊ शकेल. हा या बीबी चालु करण्या मागे उद्देश.
नमस्कार!
या बा. फ. चा उद्देश सांगणे तसे गरजेचे नाही तरीही लिहितो. मराठी वर्तमानपत्र तर आपण वाचतोच. ईंग्रजी मधे The Times of India, Indian Express हे वर्तमानपत्र कदाचित तुम्ही वाचत असाल. पण आपल्यापैकी काही जण इतर देशातील वर्तमानपत्र देखील वाचत असाल. अशा वाचकांकडून आपल्यालाही त्या वर्तमानपत्राची माहिती होईल आणि कदाचित तुम्हालाही ते वर्तमानपत्र वाचायला आवडेल.
तर तुम्ही तुम्हाला आवड असलेल्या पेपर बद्दल इथे लिहा. का आवडतो, कुठला भाग आवडतो तेही लिहा.
धन्यवाद!