गुंत्यास पिंजले मी ....

गुंता

Submitted by मिरिंडा on 9 February, 2013 - 09:36

गुंत्यास पिंजले मी
जटांस पिंजलें मी
जटांस कवळिले मी
जगण्याचे सार म्हणुनी

उबदार वाटल्या त्या
थंडीत भावनांच्या
थंड गार वाटल्या त्या
ऊष्म्यात जीवनाच्या

गुंत्यात कवळू पाहिले
मी विश्वरूप सारे
आतले बाहेरचे ते
सारेच गुंते गुंतलेले

अडकलेल्या माणसांच्या
किंकाळ्या ऐकल्या मी
सुटकाही नको त्यांना
असेही ऐकले मी

आनंद मोकळेपणाचा
साराच विसरलो मी
देउनी सत्यास माती
गुंत्यास पांघरले मी

Subscribe to RSS - गुंत्यास पिंजले मी ....