वादळ -वनिता ४

वादळ

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 8 February, 2013 - 00:34

अंधारून आलं सारं
दाही दिशा झाकोळल्या
कशा निपचित झाल्या
पानापानांत सावल्या

कधी मेघांच्या मनात
वीज चमकून जाई
बावरून मग वारा
रूप वादळाचं घेई

बेलगाम होती सरी
क्षुब्ध सागराचा ध्वनी
उसळती कैक लाटा
स्तब्ध वादळच मनी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वादळ -वनिता ४