gazal

आजन्म दुःख येथे सोसायचे कुणाला

Submitted by सचिन–चव्हाण on 23 May, 2020 - 15:11

आजन्म दुःख येथे सोसायचे कुणाला
शत्रुत्व का सुखांशी साधायचे कुणाला

जे जे मनात येते ते ते लिहीत जातो
समजत जगास नाही भांडायचे कुणाला

माणूस वागतो जर कुत्र्यापरी जगाशी
मग प्रश्न एवढा की? पाळायचे कुणाला

नाकारले मला जर माझ्याच आरशाने
बाहेर तोंड आता दावायचे कुणाला

मी घेतली उधारी माझ्याच माणसांची
आहेत ओळखीचे टाळायचे कुणाला

आई तुझा हरवला कोठे पदर कळेना
मी दूध मग अवेळी मागायचे कुणाला

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - gazal