प्रवास

सिध्धगड अन भेटलेला पाऊस......

Submitted by रोहित ..एक मावळा on 4 December, 2010 - 05:30

अरे या रविवारी नाही जमणार...पुढच्या रविवारी नक्की...अस करत सरतेशेवटी २९ ऑगस्टला जायच ठरल.आदल्या रात्री पावसाने गडगडासह जोरदार आगमन केले.व्वा...हेच तर पाहिजे होते.ट्रेकिंगला वा कुठेही भटकायला जायच असेल तर आदल्या रात्री झोप येत नाही.तसेच झाले...आणि सकाळी तरीपण पावनेसहाला उठलो.आईने एवढ्या सकाळी उठुन डबा केला होता.सॅक पाठिला लटकविली आणि आईच्या भाषेत बोलायच तर उंडरायला निघालो.सकाळी पावसाची भुरभुर चालु होती.वातावरण पण एकदम प्रसन्न होते.ठाणे महानगरपालिकेची कृपा म्हणजे टि.एम.टि पकडुन ठाणे स्टेशनला पोहोचलो तर सव्वासात वाजले होते.रविवार असुनसुद्धा टिकिट काढायला भली मोठी रांग लागली होती.मग पन्नास रुपय

बालदिन विशेष ट्रेक - राजमाची "फोटो वृतांत" (दिवस दुसरा)

Submitted by जिप्सी on 1 December, 2010 - 00:36

असुदे याचा "वृतांत"
जुई हिचा पहिला वाहिला बालदिन विशेष - राजमाची ,
कविता नवरे हिचा राजमाची ट्रेक - आयोजकांच्या चष्म्यातून
माझा फोटो वृतांत राजमाची "फोटो वृतांत" - दिवस पहिला
=================================================
=================================================
दुसर्‍या दिवशीची पहाट

शब्दखुणा: 

'तुंग किल्ला' (कठीणगड)

Submitted by Yo.Rocks on 28 November, 2010 - 04:46

कधी कधी नकळत अचानक ट्रेक केला जातो.. नि तो यशस्वी झाला तर मिळणारे समाधान, आनंद मोलाचा असतो.. गेल्या रविवारी असेच काही घडले..
शनिवारी रात्री शिर्डी पॅसेंजरने लोण्यावळ्याला जात होतो तोच पक्क्याचा समस आला.. स्टार माझा ब्लॉग मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल.. त्याला अभिनंदन केले नि कळवले 'तुंग' ला जातोय.. नंतर बोलू'... यावर त्याचा प्रतिसमस.."आयला, तुंग ?? कोणकोण जात आहेत?"...
म्हटले आता ह्याच्यासकट अनेक माबोकरांच्या शिव्या खाव्या लागणार.. आपण कधीतर एकत्र इथे जायचे असे ठरले होते.. पण माझे अचानक ठरले..

पाउले चालती "माहुली"ची वाट..!!

Submitted by Yo.Rocks on 9 November, 2010 - 13:48

ऑक्टोबरची सुरवात कुलंग ट्रेकने केली होती.. नि आता शेवटसुद्धा एखाद्या ट्रेकनेच करायचे ठरवले.. दिवाळीपुर्व ट्रेक असल्याने जवळपासच कुठेतरी जाण्याचे ठरवले.. मायबोलीच्या भटकंती कट्ट्यावर तशी पोस्टदेखील टाकली.. तांदुळवाडी वा माहुली ठरवायचे होते.. याच वर्षी एप्रिलच्या सुरवातीला तसा मी माहुलीला नाईट ट्रेक करुन आलो होतो.. पण शुल्लक चुकांमुळे अख्खा माहुली गाव रात्री काळकुट्ट अंधारात पालथा घालावा लागला होता.. हे कमी म्हणून की काय आम्ही सकाळीदेखील वरती जाण्याची चुकीची वाट पकडली नि भर उन्हात माहुली चढायला घेतला होता... कडक उन त्यावेळी झेपले नव्हते..

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग ३ - कुंभळगड़ मार्गे ठंडीबैरी ... !

Submitted by सेनापती... on 2 November, 2010 - 06:10

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग २ - वीरों का मठ मार्गे कुंभळगड़ ... !

Submitted by सेनापती... on 28 October, 2010 - 16:21

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

दुसऱ्या रात्रीचे 'घोराख्यान' ऐकून झाल्यावर सकाळी जागे झालो तेंव्हा चांगलेच उजाडले होते. पण जाग आली होती ती छपरावर नाचणाऱ्या माकडांमुळे. १-२ नाही तर अख्खी टोळी होती त्यांची. आम्ही सर्व सामान पटापट आवरून घेतले आणि त्यांचे फोटो काढायला लागलो. एकेकाची शेपटी ही........ मोठी. फोटो तर बघा काय सही आले आहेत त्यांचे.

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

Submitted by सेनापती... on 27 October, 2010 - 16:04

मुख्य टीप : वाचायला बसायच्या आधी काहीतरी खायला घेऊन बसावे नाहीतर खाऊन बसावे... वाचल्यावर भूक लागल्यास धागाकर्ता कुठलीही जबाबदारी घेणार नाही... Lol

भटकंती कट्टा ...

Submitted by सेनापती... on 26 October, 2010 - 06:42

नमस्कार भटक्या दोस्तांनो...

दरवेळी कोणी ना कोणी कुठे ना कुठे ट्रेकला जातच असते. किंवा जावेसे तरी वाटत असते. आपण सर्व उनाडक्या करणाऱ्या भटक्यांनी ह्या पानावर भटकंतीबद्दल गप्पा माराव्या.

एखाद्या जागेबद्दल माहिती विचारावी, माहितीची देवाण घेवाण करावी, शंका विचाराव्यात, नवीन कार्यक्रमांची माहिती द्यावी, एखाद्या ट्रेकला जायचे असेल तर चर्चा येथेच व्हावी...

कुलंगशी कुस्ती ..... अन माबोसंगे मस्ती....

Submitted by रोहित ..एक मावळा on 23 October, 2010 - 07:44

नमस्कार मायबोलीकरहो,

विमानातील मोशन सिकनेस

Submitted by sneha1 on 11 October, 2010 - 10:44

मला ह्या महिन्यात भारतवारी करायची आहे.लेक साडेचार वर्षांची आहे, तिला घेऊन पहिल्यांदाच एकटी जाते आहे.माझी अड्चण अशी आहे की मला विमान लागतं.डॉक्टर ने औषध दिले आहे, पण त्याच्या मते कोणत्याही औषधाने झोप येणारच्.एकटीने लेकीला सांभाळायचं आहे,त्यामुळे औषध न घेता हा त्रास कमी कसा करायचा हे सांगू शकेल का कोणी?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - प्रवास