प्रवास

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग २ : ''तोरणा- राजगड' मार्ग !

Submitted by Yo.Rocks on 31 January, 2011 - 13:05

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग १ : शुभारंभ तोरणापासून ! इथून पुढे...

तोरणाच्या या कड्यावरून दिसणारा 'तोरणा-राजगड' मार्ग मस्तच !! बुधला माचीपासून डोंगरांची रांग सुरु होते ती थेट राजगडच्या संजीवनी माचीपर्यंत.. ! बघून तरी अंधार पडायच्या आता पार करु असे वाटत होते..

तोरणाच्या बुधलामाचीपासून सुरु होणारी तोरणा-राजगडची वाट.. (सुरवातीचा टप्पा)

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग १ : शुभारंभ तोरणापासून !

Submitted by Yo.Rocks on 30 January, 2011 - 14:36

मायबोलीवर 'तोरणा ते राजगड' भटकंतीचा बाफ झळकला नि माझा काळीज करपटला.. काय करणार.. मला जमण्यासारखे नव्हते.. 'योजना तयार ठेवा.. संधी मिळताच तुमच्यात सामिल होतो' असा संदेश मी या मोहीमेवर जाणार्‍या मायबोलीवीरांना दिला होता.. २१ जानेवारी उजाडला ज्या दिवशी गिरीविहारच्या गाडीतून मायबोलीवीर राजगडाच्या दिशेने कुच करणार होते.. मग तिथेच गाडी पार्क करुन एसटी वा जीप करुन वेल्हेला (तोरण्याच्या पायथ्याकडील गाव) जायचे नि मग तिथूनच 'तोरणा ते राजगड' या मोहीमेस सुरवात करायची अशी योजना आखली गेली होती.. त्याच दिवशी रोहीत, गिरीविहार यांचे फोन आले..

सुवर्णदुर्गाच्या मुलुखांत..भाग २

Submitted by हेम on 30 January, 2011 - 12:26

आपटेकाकांनी रात्रीच एक मोठं आमिष दाखवून ठेवलं होतं '..सकाळी या मंडळींचं आवरून व्हायच्या आत आपण मुरुडचं दुर्गादेवी मंदिर बघून येऊया'.. आदल्या दिवशीच्या धावपळीचा शीण अंगात असूनही सकाळी लवकर जाग आली. आणखी काही जण तयार झाले. सेनापती विनयच्या कानांत कुजबुजून आम्ही मुरुडकडे पायीच निघालो. एकदम मस्त गांव..

जलदुर्ग १ - सुवर्णदुर्गाच्या मुलुखांत..भाग १

Submitted by हेम on 29 January, 2011 - 09:18

दि. २८.११.२००९
रात्री १ वा. मुलुंडहून निघालो. सकाळी ६ वा दापोली. पावणेसातला सालदुरे (मुरुड) इथे पोहोचलो. आसुदच्या जोशींनी अनिष निवासमधील (प्रोप्रा प्रताप भोसले. फोन २३४६१५-२३४८९७) डॉरमेटरीमध्ये व्यवस्था करुन ठेवली होती. या जोशींचं आसुदमध्ये समाधान नांवाचं हॉटेल आहे. (फोन- (०२३५८) २३४५२६, २३४५६१). झटपट फ्रेश होवून, चहा घेउन मुरुड बीचवर गेलो. हंगाम असल्याने भरपूर सीगल्स होते.
प्रचि १

ढाक-भैरी ते राजमाची ... !

Submitted by सेनापती... on 16 January, 2011 - 20:10

२००५...जुलै महिना... कर्नाळा अभयारण्याजवळ माझा आणि शामिकाचा बाईकवरून पडून अपघात झालेला. जोरदार पडूनही तिचे फक्त मुक्यामारावर निभावले होते. एस.टी. वाल्याच्या चुकीचे बक्षीस म्हणून मला उजव्या हाताला एक प्लास्टर बक्षीस... Happy महिनाभर विश्रांती घेतल्यावर ऑगस्टमधला हा ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. मोजून २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते.

पिरॅमिड व्हॅली - वन ऑफ दी सेव्हन वंडर्स ऑफ बेंगालूरू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सध्या रोज बँगलोर मिरर मध्ये ह्या पिरॅमिड्चे फोटो येत आहेत. त्यावरुन मला हे इथे लिहावंसं वाटलं. काही महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीकडून पिरॅमिड व्हॅली विषयी ऐकले आणि लगेचच्या विकेंड्ला तिथे जाउन आले. कनकपुरा रोडवरून साधारण ३५ किमी अंतरावर आहे ही पिरॅमिड व्हॅली. रविशंकर आश्रम सोडल्यावर अजून १५ किमी पुढे जावे लागते. ठिकठिकाणी साईन बोर्ड्स लावलेले आहेत. शेवटी डाविकडे वळावे लागते.

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण

Submitted by नरेंद्र गोळे on 8 January, 2011 - 11:07

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८

ठाण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या साहित्य-संमेलनाचे निमित्ताने, अनेक पुस्तके त्यादरम्यानच प्रसिद्ध झाली. हे पुस्तकही त्यातीलच एक होय.

मुख्यत्वे वेंडेल आणि ब्युला यांच्या आठवणी जपण्यासाठी हे पुस्तक लिहील्याचे लेखकानेच अर्पण-पत्रिकेत लिहून ठेवलेले असले तरीही ब्युला, वेंडेल, रिकी, एजाज, रीफ आणि जेस्सी या सहा व्यक्तींची व्यक्तीचित्रे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

पुणे म.टा. मधील लेख - स्कॅन कॉपीज...

Submitted by सेनापती... on 7 January, 2011 - 22:59

दोस्तांनो...

शुक्रवार दिनांक ७ जानेवारी २०११ पासून दर शुक्रवारी माझे भटकंतीवरील लिखाण 'महाराष्ट्र टाईम्स (पुणे)' मध्ये प्रकाशित होत होते. गेल्या ३-४ महिन्यात एकूण १४ लेख पुणे म.टा. मध्ये प्रकाशित झाले. परंतु मटावाल्यांनी ते आंतरजालावर उपलब्ध करून दिले नाहीत. का ते त्यांनाच ठावूक. त्यामुळे प्रत्येकवेळी पुण्यातल्या मित्राकडून लेखाची स्कॅन मिळवून मग ती अपलोड करणे असे प्रकार करावे लागले. सर्व लेखांच्या स्कॅन कॉपीज येथे एकत्र देत आहे...

१. पवनाकाठचा तिकोना...

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग ३

Submitted by सेनापती... on 4 January, 2011 - 19:45

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग १
अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग २

मंडणच्या गुहेत झोपलेलो असताना पहाटे कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. टोर्च मारून आसपास पहिले तर काहीच दिसले नाही. अजून उजाडले नव्हते म्हणून दरवाज्यावर बनवून ठेवलेल्या काठ्यांच्या जाळीकडे बघत तसाच पडून राहिलो.

केरळ डायरी - भाग १

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

कोचीनला विमान केवळ २० मिनीटे उशीरा उतरले तेंव्हा कोट्टायमला नेणारी टॅक्सी तयारच होती. वाटाड्या स्टुडंट जेंव्हा दरवाजा उघडणे, बॅग पकडणे असे करु पाहु लागला तेंव्हा आपले काम आपण (निदान अशी कामे तरी) चा बाणा लगेच सरसावला. जुजबी आणि बोलण्यासारखे बोलुन झाल्यावर पुढचे दोन तास अर्धवट झोपेत, आपण चुकुन घोरत तर नाहीना या विवंचनेत गेले. साधारण ९ वाजता गाडी एका पॉश रेस्टॉरंटसमोर उभी ठाकली. तसा मी खूप खात नाही, पण माझे तलम अॉर्डर करुन झाल्यावर त्याने फक्त फ्रुटसॅलड मागवले.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - प्रवास