प्रवास

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

Submitted by स्वानंद on 8 May, 2011 - 14:56

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

सकाळी दहाला आम्ही धक्क्यावर पोचलो. ’हार्तिग्रुतेन’ तिथे आधीपासूनच आमची वाट पहात होती. बोट कसली एक शहर होते ते सातमजली. त्यात हॉटेल होते, चित्रपटगृह होते, रेस्टॉरंट होते, वाचनालय होते. (मला भावलेली गोष्ट म्हणजे वाचनालयात एक रंगपेटीही होती, चित्रे काढायची सोय होती), आणि सगळ्यात महत्वाचे खिडकीतून दिसणारे दृश्य प्रत्येक क्षणाला बदलत होते. कल्पनेपेक्षाही सुंदर होत होते. बोटीत प्रवेश करताच हे सारे पाहून मी तर भारावूनच गेलो.

शब्दखुणा: 

नॅशनल पार्क ते कान्हेरी गुंफा

Submitted by Yo.Rocks on 25 April, 2011 - 06:48

भटक्या मायबोलीकरांचा भटकंती गटग करुया असे म्हणता म्हणता दोन तीन ट्रेक्स झाले.. पण सगळ्यांना एकत्र येण्यास जमेल तर शप्पथ.. असाच आतापर्यंतच्या आमच्या ट्रेक्सला मुकलेला पुण्याचा 'आशुचँप' आम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होता.. तो अचानक मुंबईत आला.. अचानक त्याचा फोन आला.. नि विकेंडला काहीच प्लॅन नसताना अचानक रविवारी सकाळी कुलाब्याचे "सागर उपवन" गाठण्याचे ठरले.. पण अचानक प्लॅन चेंज झाला नि शेवटी आदल्या रात्री ठरले बोरिवलीच्या "नॅशनल पार्क" (संजय गांधी उद्यान )मध्ये भेटूया.. साहाजिकच सर्वात जास्त आनंद बोरिवलीकराला झाला होता.. एकतर सकाळीच ६.३०-७ च्या सुमारास भेटण्याचे ठरले होते..

पुण्याहुन तीन दिवसात अष्टविनायक करणे शक्य आहे का?

Submitted by mansmi18 on 18 April, 2011 - 11:13

नमस्कार,

पुण्याहुन (बाणेर-बालेवाडी) शनिवार, रविवार, सोमवार (अर्धा दिवस) अशा तीन दिवसात अष्टविनायक करणे शक्य आहे का?
संपुर्ण अंतर किती आहे?
५ जणासाठी स्वतःच्या गाडीने (आय १०) जाणे ठीक का जरा मोठी भाड्याची गाडी (टवेरा इ.) करावी?
बरोबर २ लहान मुले आहेत..तेव्हा आताचा एप्रिल. मे सीझन पेक्षा थंडीच्या दिवसात जाणे बरे होइल का?

मी गाड्यांची इ. चौकशी करणार आहेच पण त्यांच्याशी बोलण्याआधी माहिती असावी म्हणुन म्हटले इथे विचारावे.

आपले अनुभव/मते कृपया शेअर कराल का?

धन्यवाद.

पुदुचेरी

Submitted by lampan on 8 April, 2011 - 22:40

ह्या ठिकाणी काहीतरी लिहीण्याची संधी किंवा वेळ ही तब्बल ३ वर्षांनी येतीये :-), चालायचंच. गेली ३ वर्षे आयुष्यातल्या मोठ्या बदलाशी हातमिळवणी करण्यात गेली. Considering the total life span this seems negligible but as of now it is significant. मध्ये १-२ दा छोट्या छोट्या ट्रिप्स केल्याही पण लिहिण्याजोगं असं फारसं काही नव्हतं त्यामध्ये आणि माझ्यामते त्या ट्रिप्स नव्हत्याच. ट्रेकला जाउन तर तब्बल ६ वर्ष झाली आहेत. ह्यासगळ्यामुळे जीवाची नुसती घालमेल चालु होती. छोट्याश्या कारणाने राग अनावर होणे.

मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे?

Submitted by झी on 23 March, 2011 - 20:41

मी पहिल्यांदाच एकटी भारतात जाणार आहे. त्यात मुंबई -पुणे हा प्रवासही एकटीने करायचा आहे.कोणाला मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे हे माहीती आहे का? फ्लाईट मध्यरात्री पोचले तर सकाळ पर्यंत एअरपोर्ट वर थांबायचे का (एकटी आहे म्हणुन) की रात्रीच टॅक्सी /बस मिळते? आता मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) जाण्यासाठी जायला साधारण किती वेळ लागतो?

तीन कोनांची टोपी चढविलेला.... तिकोना

Submitted by रोहित ..एक मावळा on 14 March, 2011 - 13:33

१७ डिसेंबर,स्थळ: ठाणे स्टेशन.... "अरे सुट्टी नाही मिळणार आणि वैयक्तिक कारणांमुळे पियुष पण येऊ शकणार नाही." गोपिचा फोन आला.

श्रीलंकेला कसे जायचे?

Submitted by शरद on 20 February, 2011 - 04:03

मी, माझे कुटुम्ब १० ते १६ एप्रिल २०११ दरम्यान श्रीलंकेची ट्रिप करण्याच्या विचारात आहोत. कुणी मदत करू शकेल काय? होटेल्स, प्रवास साधने, खर्च, प्रेक्षणिय स्थळे वगैरे माहिती आणि तिथे गेल्यानंतर मदत हवी आहे. काय करावे कुणी सांगू शकेल काय?

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : संपूर्णम !

Submitted by Yo.Rocks on 10 February, 2011 - 15:55

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग ३ : लक्ष्यवेध !

Submitted by Yo.Rocks on 6 February, 2011 - 14:07

केरळ प्रवास

Submitted by शर्मिला फडके on 4 February, 2011 - 07:14

केरळमधे स्वतंत्रपणे प्रवास करायचा आहे. दहा ते बारा दिवस.
हा प्रवास कसा प्लॅन करावा याबद्दल काही मार्गदर्शन कोणी करु शकेल का?
काय काय अगदी पाहिलच पाहिजे? कुठून कसं जाणं सोयिस्कर पडेल? खाणंपिणं, खरेदीबद्दल काही टीप्स? केरळमधल्या इकोटुरिझमचा काय अनुभव?

Pages

Subscribe to RSS - प्रवास