प्रवास

सिंदोळा !

Submitted by Yo.Rocks on 6 October, 2011 - 13:04

रविवारची पहाट बर्‍याचजणांना माहीतच नसते.. रविवार उजाडावा तरी कसा.. तर डोळे उघडतील तेव्हा सूर्यदेवाची किरणे प्रखर झालेली असतील.. भलामोठा आssळस अशे अनेक आळस देत उठायचे.. घडयाळाकडे ढुंकूनही नाही बघायचे.. आज कसलीच घाई नाही म्हणत टिव्ही लावून वृत्तपत्र चाळत बसायचे.. चहाचे घुटके अगदी दिमाखात घेत किचनमध्ये तयार असलेल्या नाश्त्याचा अंदाज घ्यायचा इति इति...

बेळगाव, गोकाक, गोकर्ण, मुरूडेश्वर परीसरातील भटकंती

Submitted by जिप्सी on 3 October, 2011 - 09:58

आम्ही काही मित्र ४ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर (८ दिवस) पर्यंत उत्तर कर्नाटक फिरायला जाणार आहोत. बेळगावमध्ये (खानापूर) मित्राचे घर (आणि स्वतःची गाडी) असल्याने तेथे एक दिवस राहून बेळगाव, गोकाक, गोकर्ण, सिरसी, मुरूडेश्वर फिरण्याचा मानस आहे. तरी या परीसरात न चुकता पहावी अशी अशी काही ठिकाणे असतील तर जरूर सांगा. तसेच या ट्रिपचा रफ प्लान दिला तरी चालेल (म्हणजे कुठले ठिकाण पहिले करायचे ते).

१. मुरूडेश्वरसाठी किती दिवस राखुन ठेवावेत?
२. येथील चांगल्या हॉटेलची कॉन्टॅक्ट्स आहेत का?
३. रस्ते चांगल्या स्थितीत आहेत का?
४. रात्रीची ड्रायव्हिंग करणे सेफ आहे का?

'इगतपुरी' ट्रीप साठी माहिती हवी आहे

Submitted by रंगासेठ on 8 September, 2011 - 08:54

आम्ही मित्र मिळून 'इगतपुरी' ची एक दिवसाची ट्रीप करायची योजना बनवतोय. आम्ही पुण्याहून संध्याकाळी 'सिन्नर'ला बसने निघणार. रात्री सिन्नरला मुक्काम करणार. दुसर्‍या दिवशी सकाळी तिकडे एका मित्राला घेऊन इगतपुरीला फिरून त्याच दिवशी पुण्याला परत बसने (रात्री) येणार असा प्लॅन आहे.

तर इगतपुरीत एका दिवसात पाहण्यासारखी ठिकाणांबद्दल माहिती हवी आहे.
तसेच सिन्नर मध्ये कुणी कॅब भाड्याने देणारी कंपनी असेल तर त्याचीही माहिती हवी आहे. कारण पुण्याहून कॅब घेऊन ट्रीप करणे परवडणार नाही.

धन्यवाद.

प्रांत/गाव: 

हानामी (花見) : साकुरा

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 7 September, 2011 - 07:03

हानामी (花見) : साकुरा

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत, मित्र-परिवारासोबत जीवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

साकुरा

सिद्धगड : दोघांची भ्रमणगाथा !

Submitted by Yo.Rocks on 29 August, 2011 - 17:25

मनात कितीही ठरवले तरी प्रत्यक्षात ते उतरणे बरेचदा कठीण होउन बसते.. सिद्धगडाबद्दलही तेच झाले.. पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे धबधबे पोटाशी बारगळणारा हा गड यंदाच्या पावसात तरी सर करण्याचे ठरवले होते.. पण काही जमत नव्हते..शेवटी जायच्या आदल्यादिवशी ठरले एकदाचे.. मी आणि जो (गिरीश जोशी).. पण दुकट्याने ट्रेक करणे धोक्याचे त्यात हा जंगलाने वेढलेला गड असे ऐकून होतो सो पुन्हा संध्याकाळी हा ट्रेक रद्द करण्याचे मनात आले.. तीला सांगितले तर तीसुद्धा 'नाही जायचे' करू लागली.. म्हटले जाउदे नको करूया ट्रेक !! तोच पुन्हा जो चा फोन आला.. " यो, चल रे जाउ.. रिस्क न घेता जिथपर्यंत जमेल तितके जाउ. नि परत येऊ..

मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)

Submitted by पाषाणभेद on 26 August, 2011 - 00:43

मोटरसायकल: बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc

शब्दखुणा: 

सह्याद्रीनवल ..... सांदण दरी

Submitted by रोहित ..एक मावळा on 20 August, 2011 - 10:03

राकट .. कणखर सह्याद्री ...
आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री .....
खोलच खोल दर्‍या-खोर्‍यांचा सह्याद्री ...
काळजाचा ठोका चुकविणार्‍या कोकणकडांचा सह्याद्री...
निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री.....
सह्याद्री
... बस्स नावात सगळ सामावलेल आहे.

आयुष्य म्हणजे

Submitted by सारन्ग on 6 August, 2011 - 02:52

आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी
आयुष्य म्हणजे जीवाधानचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वतच्या हातावर पेललेला तुमचा भर
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर
आयुष्य म्हणजे पावनखिंड , हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा
आयुष्य म्हणजे एक रात्र , चार मित्र , नानेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी

रसग्रहण स्पर्धा - झुळूक अमेरिकन तोर्‍याची - लेखक - शरद वर्दे

Submitted by मंजूडी on 4 August, 2011 - 03:49

आधी शिक्षणानिमित्त, संशोधनानिमित्त, व्यवसायानिमित्त एखादी सदिच्छा भेट, नोकरीसाठी असलेल्या तुरळक संधीतील एखादी पटकावून वगैरे परदेशी जाणार्‍यांच्या तुलनेत, आता ग्लोबलायजेशनमुळे प्रचंड वाढ झाली आहे. आयटीक्षेत्राने तर परदेशवारीची दारे सताड उघडलेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकांपासून परदेशवारी दुर्मीळ राहिलेली नाही. तरीही आपल्याकडे अजूनही 'फॉरीन रीटर्न्ड' माणसाकडे भक्तीभावाने पाहिलं जातं.

लॉर्ड्सची जादू!

Submitted by फारएण्ड on 21 July, 2011 - 13:56

"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा.

Pages

Subscribe to RSS - प्रवास