प्रवास

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा]

Submitted by मी-भास्कर on 16 February, 2013 - 02:10

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा-नाशिक]
abhibhaMandir.jpgAbhinavBharatMandir.jpgswatantrylaxmi.jpgस्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला- भगूर]
हा ११ डिसेंबर २०१२ ला मायबोलीवर प्रकाशित केला होता. त्याची लिंक :-

'चांदवड'च्या मुलखात :भाग १: किल्ले राजधेर

Submitted by Yo.Rocks on 10 February, 2013 - 12:50

नाशिक जिल्ह्यात ट्रेक करायचे तर सह्याद्रीच्या विविध डोंगररांगा समोर येतात... सिलबरी-डोलबरी डोंगररांग, त्र्यंबक-अंजनेरी डोंगररांग, अजंठा-सातमाळा रांग.. प्रत्येक डोंगररांगेने आपापली दिशा निवडून बस्तान बसवलेले.. प्रत्येक रांगेचे शिखर आभाळाला भिडलेले नि विस्तार बघावा तर अगदी दिमाखदार ! अशाच रांगामधील एक आडवी पसरलेली डोंगररांग 'चांदवड रेंज' म्हणून ओळखली जाते.. खरेतर 'सातमाळा' रांगेचाच हा टोकाकडचा भाग गणला जातो... 'सुरगणा' ह्या तालुक्यापासून सुरु झालेली ही रांग 'चांदवड' या तालुक्यात येउन संपते.. पुढे हीच रांग मनमाडजवळील अंकाईपर्यंत विस्तारत जाते..

फॉल २०१२ - शॅननडोह व्हॅली आणि व्हर्जिनीया कंट्रीसाइड

Submitted by तन्मय शेंडे on 7 February, 2013 - 23:33

२०१२च्या ऑटम सीझन मध्ये फॉल कलर बघायला कुठे जायच, हा खरच मोठा प्रश्न होता. बराच कीस पाडला यावर कारण
- बरेच पर्याय होते फॉल कलर बघायचे (त्यात मला सगळेच बघावेसे वाटत होते Happy )
- बॉस सुट्टी देतोय का नाही.
- आणि बदलणारं फॉल कॅलेंडर (एक-दोन दिवस मागे- पुढे झाले तर झाडांचे खराटे बघायला मिळणार याची भीती)

अनुभूती -२

Submitted by प्रज्ञा९ on 4 February, 2013 - 07:10

पहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे! तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.

अनुभूती -१

Submitted by प्रज्ञा९ on 3 February, 2013 - 12:35

गेल्या आठवड्यात ३ दिवस सलग मिळालेली सुट्टी अनपेक्षित धनलाभासारखी 'लाभली' मला! आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्‍या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो! सासुबाईंनी सुचवलं ठिकाण, आणि बरेच दिवस मनात घोळत होतंच जायचंय म्हणून... मग तयारी केली नि निघालो. घळीतच जास्त वेळ राहून थोडी साधना करावी असा विचार पक्का झाला.

महादजी शिंदे छत्री - वानवडी

Submitted by रंगासेठ on 2 February, 2013 - 04:45

पुण्यात काही काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत जिथे केवळ आज-उद्या कधीतरी जाऊ असं विचार करत कधीच जात नाही. वानवडी येथील पेशवाईतील मातब्बर सरदार 'महादजी शिंदे' यांची समाधी/छत्री आहे. याबद्दल तर पुलंच्या 'बटाट्याची चाळ' मध्येच वाचलं होतं. हडपसरला सहा वर्षं राहून पण कधीच नाही गेलो तिकडे. शेवटी चिंचवडला येण्यापूर्वी इथे भेट द्यायचा योग आला.

माहिती हवी आहे

Submitted by दमहाजन on 1 February, 2013 - 16:31

नमस्कार, मला एक विचारायचे आहे की अमेरिकेत जाताना चेक्ड इन बॅगेजमधे व केबिन बॅगेत काय काय खाऊ व डाळी वै. आपण घेउन जाउ शकतो? मला ३ महिने कामासाठी जायचे आहे तर बेसिक मसाले आणि इतर जरुरी सामान स्वयंपाकासाठी न्यायचे आहे. मी वेस्ट कोस्ट ला San Jose जाणार आहे. कस्टमचा काहि त्रास न होता नेता येइल असे सामान मला सुचवा.

विषय: 
शब्दखुणा: 

भूतान बद्दल माहिती हवी आहे

Submitted by भानुप्रिया on 31 January, 2013 - 04:47

नमस्कार!

जुलै १५ नंतर भूतान ला जाण्याचा विचार आहे, पण टिपिकल ट्रिप करायची नाहीये! हनीमूनसाठी जाणार आहे. आम्हा दोघांनाही टूरिस्ट टॅग असलेल्या जागा सोडून जरा ऑफ-बीट ठिकाणं बघायची आहेत. शांत निसर्ग हवा आहे, फोटोग्राफी करायची आहे, लोकल मार्केट बघायचं आहे आणि तिथली जीवनशैली जवळून अनुभवायची आहे!

कोणाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा!

धन्स इन अ‍ॅड्व्हान्स!! Happy

लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 30 January, 2013 - 20:18

दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397

एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)

Submitted by केदार on 25 January, 2013 - 05:48

एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)
लेखक : अ‍ॅलिस अल्बेनिया

अ‍ॅलिस एक ब्रिटिश पत्रकार, जी भारत-पाक मध्ये काही वर्षे राहिली आहे, तिला सिंधू नदी झपाटून टाकते आणि त्यातूनच तिचा सिंधूच्या समुद्रमिलनापासून ते उगमापर्यंतचा प्रवास चालू होतो. लेखिका अत्यंत जिद्दीने हा खडतर प्रवास पूर्ण करते व अत्यंत सुंदर अनुभव आपल्यासमोर उभा करते आणि आपणही सिंधूयात्रेचे प्रवासी होतो, आणि सिंधूचे पुढे (खरे तर उगमाकडे) काय होते आहे ही उत्कंठा वाढते. मग त्यासोबत येतात, सिंधू नदीपर्यंत पोचलेले अलेक्झँडर, नदी पार करणारा महंमद घौरी आणि बाबर, नदिकिनारील योद्धासन्यासी गुरु नानक आणि नदीचा प्रवास.

Pages

Subscribe to RSS - प्रवास