प्रवास

गडाचं नाव 'गडगडा'

Submitted by Yo.Rocks on 25 April, 2013 - 13:24

''भटकंतीचे वेड लागले, की मग त्याला काळा-वेळाचे, ऋतू-हंगामाचे बंधन उरत नाही. मनाला वाटेल तेव्हा आणि शरीराला झेपेल तसे 'सॅक' घ्यायची आणि चालू पडायचे असेच अनेकांचे होते...." इति लोकसत्तामधील अभिजीत बेल्हेकर नामक लेखकाच्या भटकंतीवरील लेखातील ओळी वाचल्या.. नि मला 'ऑफबीट' ग्रुपची प्रिती अँड गँग आठवली..ही गँग जवळपास प्रत्येक विकांताला 'हा' ना 'तो' डोंगर, घाटरस्ता पालथा घालण्यात मग्नच असते... ह्यांचा कितीही हेवा वाटला तरी कमीच... इथे तर आमचा ट्रेकयोग जुळून येण्यात बर्‍याच अडचणी येत होत्या..

आमची काशीयात्रा!!

Submitted by मी_आर्या on 25 April, 2013 - 07:59

नमस्कार,
मागे काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे या नावाचा धागा टाकला होता. त्यावर आलेले प्रतिसाद,सुचना मनात घोळवत ८एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत काशीयात्रेला जाउन आलो. अलाहाबाद, विंध्याचल व शेवटी काशी असा प्रवास होता.
त्याचा थोडक्यात वृत्तांत असा.
यात्रेची तयारी नोव्हे.१२पासुनच सुरु होती. जाने.१३ मधे ट्रेन बुकींग केले. ज्ञानगंगा एक्स्प्रेस २४तासात अलाहाबादला पोचवते असं ऐकुन तीचं रिझर्वेशन केलं.
८ एप्रिल १३(सोमवार)
स्थळ: पुणे

गोवा आणि गोव्या जवळ काय काय पहावं ?

Submitted by _प्राची_ on 23 April, 2013 - 03:44

आम्ही कुटुंबीय येत्या उन्हाळ्यात गोवा सहलीला जाणार आहोत. सावंतवाडीस मुक्काम करून गोवा व आसपास च्या काही जागा बघण्याचा मानस आहे.
गोव्यात काय काय बघावं ? काही अपरिचित सुन्दर ठिकाणे ठाऊक असल्यास सांगाल का ?
गोव्यातील देवळांबद्दल मागे इथे उल्लेख वाचेले होते. मला शान्तादूर्गाच फक्त माहिती आहे. अजून कोणकोणती देवळे आहेत ?
खाण्यासाठी कोणत्या खास जागा आहेत का ? कोणते विशेष पदार्थ ?
गोव्याजवळ अजून काय काय पाहण्यासारखे आहे ?

विषय: 
शब्दखुणा: 

लेह लडाख - २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट

Submitted by जिप्सी on 17 April, 2013 - 01:27


(फोटो साभार - मार्को पोलो (चंदन))

"पुन्हा ढग दाटुन येतात....पुन्हा आठवणी जाग्या होतात" या प्रमाणेच "पुन्हा मार्च-एप्रिल येतो आणि पुन्हा लेहवारीचा प्लान सुरु होतो". Happy गेल्या वर्षीचा बेत फिसकटल्याने या वर्षी लेह वारी फत्ते करायचीच असे ठरले. त्याप्रमाणे बेत ठरला. मायबोलीकर इंद्रधनुष्य, गिरीविहार, मी आणि माझा एक मित्र तयार झालो आहे.

प्लान खालील प्रमाणे:
दिनांकः २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट (१० दिवस - ९ ऑगस्ट बँक हॉलीडे आहे)

विषय: 

बोटिंगचा मनसोक्त अनुभव : थेरगाव बोट क्लब

Submitted by ferfatka on 15 April, 2013 - 10:17

थेरगाव बोट क्‍लब

DSCN2362.jpg

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या काही पर्यटक प्रकल्पांमधील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून थेरगाव येथील बोट क्लब नावारुपाला येऊ लागला आहे. सुमारे 5 एकरावर पसरलेल्या या बागे शेजारी वाहणा:या पवना नदीत पर्यटकांना बोटिंगचाही मनसोक्त अनुभव घेता येऊ लागला आहे. त्या विषयी...

थेरगाव :

H1B Visa 2013

Submitted by शांत on 15 April, 2013 - 02:16

बघून जरा आश्चर्य वाटले ….
ह्या विषयावर विषयावर आपल्या मायबोलीवर कशी चर्चा नाहीये ते …
१) ८५ हजार विसा साठी ह्यावेळी १२४ हजार अप्लिकेशन्स
२) २००८ नंतर प्रथम "लॉटरी"
३) सर्वात विशेष म्हणजे USCIS ने ह्यावेळी अजूनही बरेच details दिले नहित… जसे की २०K साठी एकूण किती अप्लिकेशन्स आले आणि ६५ K साठी किती …

तर मित्रानो काय चालू आहे ह्यावेळी … इथेही काही राजकारण (I square act)???

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

Submitted by ferfatka on 10 April, 2013 - 08:46

अंड्याचे फंडे ५ - शर्यत

Submitted by अंड्या on 7 April, 2013 - 09:20

मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.

पुण्याच्या जवळ गेट टुगेदर करता ठिकाण

Submitted by मो on 3 April, 2013 - 13:58

शाळेच्या गेट टुगेदर करता पुण्याच्या आसपास (साधारण १-१:३० तासांवर) काही ठिकाणं आहेत का? उन्हाळा खूप असल्याने आउटडोअर अ‍ॅक्टिव्हीटीज अवघड आहेत, त्यामुळे तशी ठिकाणं नाही सुचवली तरी चालतील. वॉटर पार्क पण नको.

निवांत, पंचवीस एक लोकांना सामावून घेईल अशी जागा हवी आहे.

मला सिंहगड रोडवरचं अभिरुची फार्म्स माहिती होतं, पण ते बंद झालं असं ऐकलं. गोखले मळ्याबद्दल पण ऐकलय. त्याबद्दल माहिती मिळेल का?

विषय: 

विकट गड अर्थात किल्ले पेब

Submitted by मुरारी on 29 March, 2013 - 05:10

धूळवडीच्या सुट्टीच निमित्त साधून एका दिवसात करता येण्याजोगा विकटगड सर करायचे ठरले. सोबत मिपाकर किसन,सौरभ आणि अल्पेश, चिन्मय होते. भयंकर तापणार्या उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून पहाटेच निघायचे ठरले.

१. धुक्यात हरवलेले ठाकुर्ली स्टेशन

A

Pages

Subscribe to RSS - प्रवास