प्रवास

योसेमिटी

Submitted by बस्के on 9 July, 2013 - 02:16

पहिल्यांदाच असे भरमसाठ फोटो टाकल्याबद्दल माफी! मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! Happy


रस्ता पाहूनच प्रेमात पडले मी योसेमिटीच्या!

शब्दखुणा: 

जिन्हीवा - स्विजर्लंडचे मायबोलीकर

Submitted by Girish Kulkarni on 8 July, 2013 - 08:35

नमस्कार ...

मला मायबोलीवर जर कोणी जिन्हीवा - स्विजर्लंडचे मायबोलीकर मित्र असतील तर त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

धन्यवाद !

सस्नेह!

विषय: 

रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 7 July, 2013 - 15:02

....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत!!!

Shelarkhind1_DiscoverSahyadri.jpg
(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)

लेह - लडाखची सहल

Submitted by निर्मल on 7 July, 2013 - 10:14

लेह – लडाखची सहल
नुकतीच लडाखची सहल करून आलो. २६ जून ते ५ जुलै. बराच अभ्यास करून सहलीचा कार्यक्रम ठरवला. त्याप्रमाणे आधी श्रीनगर येथे जायचे असे ठरले. तेथे एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कारगील येथे मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी लेहला पोचायचे असे ठरले. तपशीलवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
२६ जून – मुंबई ते श्रीनगर विमानाने.
२७ जून – श्रीनगर ते कारगील रस्त्याने
२८ जून – कारगील ते लेह
२९ जून – विश्रांती, परमीत चे काम आणि स्थानिक स्थलदर्शन
३० जून - स्थानिक स्थलदर्शन
१ जुलै – नुब्रा व्हेली डीस्कीट येथे मुक्काम
२ जुलै – नुब्रा ते लेह
३ जुलै – प्यान्गोंग तलाव
४ जुलै – ३ इडीयट मधील शाळा

विषय: 

"आनंदवारी" || बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल ||

Submitted by जिप्सी on 30 June, 2013 - 05:48

गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्‍त नामात रंगला...

असा हि मुजरा शिवरायांना ,३४०वा शिवराज्याभिषेकसोहळा २०१३

Submitted by मी दुर्गवीर on 23 June, 2013 - 09:40

जय शिवराय रायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.

शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. सर्वत्र आनंदी वातावरण

आपली हक्काचा ट्रेनचा डब्बा १०/०६/२०१३

Submitted by मी दुर्गवीर on 10 June, 2013 - 13:43

आजचा दिवसा भलताच मस्त गेला …
पाऊसाने मस्त मज्जा घेतली आज…
परळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस फक्त दोन तास Proud
आज पाऊस प्रत्येकाला एक गारवा देत होता त्यात सुपर fast धावणारी आमची हक्काची ट्रेन….
एरवी मुबई रेल्वेचे भरभरून कौतुक करणारे व कोणत्याही प्रसंगाला हसत हसत सामोरे मुंबईकर या हि प्रसंगाला तोडगा म्हणून वेगळाच उपाय शोधला .
तोडगा : एक ओळख सत्र मुबईकराची होय एका आजोबांनी सुचवलेली एक भन्नाट कल्पना एकमेकांची ओळख करून घेणे . स्वतः पासून सुरवात करत जवळजवळ ४०,४५ नवीन मित्रांशी माझी आज मैत्री झाली मी माझी ओळखकरून देताना ….

दुर्गविरांची यशस्वी कार्ये : किल्ले सुरगड

Submitted by मी दुर्गवीर on 31 May, 2013 - 10:55

किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .

उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .

ddd_0.jpg

या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले

dddddd_0.jpg

दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........

घोरावडेश्वर

Submitted by ferfatka on 29 May, 2013 - 08:13

कुटुंबकबीला ‘मामाच्या’ गावाला गेल्याने एकटाच होतो. कुठे तरी जवळपास हिंडून यावे असा विचार करत बसलो होतो. ‘काखेत कळसा व गावाला वळसा’ अशीच परिस्थिती माझी झाली. त्यासाठी जुने फोटो अल्बम पाहत होतो. सुमारे १५ वर्षांपूर्वी साध्या रोलच्या कॅमेºयाने काढलेला एक फोटो दिसला. तेथे जाण्याचे पक्के केले. १० वाजता गाडी, पाण्याची बाटली व कॅमेरा घेऊन घराजवळच सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोरावडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो त्या विषयी....

DSCN2981 copy.jpg

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रवास