जगाची रीत ही आहे

जगाची रीत ही आहे

Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 14 December, 2012 - 07:42

केला तर TimePass, घेतला तर ध्यास आहे
कुठे कुणाचा सहवास तर कुठे कुणाचा श्वास आहे

कुठे गुंतलय ह्रुदय, कुठे फक्त खेळ आहे
केला तर व्यवहार, मानलं तर प्रेम आहे

सोडलं तर गप्पा, मानलं तर मनीचं गुज आहे
झाला तर त्रास, ऐकलं तर सुंदर गीत आहे

Break-Up, Relationship ही नाटकं, खरी ती प्रीत आहे
भोग नाही, तर त्याग ही प्रेमाची जीत आहे

ये बाहेर चौकटींच्या, जगाची रीत ही आहे
सोड तुझा ego थोडा, मनात फक्त मी आहे

Subscribe to RSS - जगाची रीत ही आहे