पुस्तक

अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
तारीख/वेळ: 
25 August, 2012 - 11:00 to 18:00
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 

पुस्तक-परिचय - 'ईट प्रे लव्ह' , 'कमिटेड'

Submitted by ललिता-प्रीति on 25 May, 2012 - 00:22

ईट प्रे लव्ह

‘ईट प्रे लव्ह’ या शीर्षकावरून हे पुस्तक म्हणजे एखाद्या स्वच्छंदी, आनंदी आयुष्याची कहाणी असावी असे वाटते. पण ‘सुसान बॉवेलला......... बारा हजार मैलांवरूनही ती मला सतत आधार देत राहिली.’ या अर्पणपत्रिकेच्या मजकुरामुळे या समजुतीला लगोलग धक्का बसतो आणि वाचकाची उत्सुकता चाळवली जाते.
सुरूवातीच्या मनोगताला लेखिका ‘जपमाळेचा १०९वा मणी’ म्हणते आणि एक सूक्ष्मशी आध्यामिक डूब देऊनच पुस्तकाची सुरूवात करते.

गोतावळा - आनंद यादव

Submitted by आशूडी on 15 May, 2012 - 15:45

अगदी खरं सांगायचं म्हणजे या पुस्तकाबद्दल काहीही माहीती नसताना अचानकपणे हातात पडलेलं पुस्तक, आनंद यादवांची इतर काही पुस्तकं या आधी वाचली असल्यानं थोडीफार कल्पना मनात आधीच तयार झालेली. परंतु, त्या सर्व कल्पनांना उभा आडवा छेद देत पुस्तकाची पानं उलटत जातात. 'गोतावळा' म्हणजे काय हे आजपर्यंत आपल्याला समजलेलंच नव्हतं अशी स्पष्ट जाणीव करुन देत हे पुस्तक संपतं. सुरुवातीपासून सुरुवात करायची तर सुरुवात अशी काही नाहीच. तेच ते रहाटगाडगं वर्षानुवर्ष चालू असतं. चालू राहणार अशी आपल्याला खात्री असते. पण एक दिवशी अचानक त्याला खीळ बसणार आहे किंवा ते आचके देत थांबणार आहे असं आपल्याला समजलं तर?

विषय: 

पुस्तक परिचय - 'स्नो'

Submitted by ललिता-प्रीति on 26 March, 2012 - 00:42

तुर्की सामाजिक संघर्षाचे गोठलेले बर्फ

'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' - श्री. सुमेध वडावाला (रिसबूड)

Submitted by चिनूक्स on 19 March, 2012 - 00:13

खरा भारत हा खेड्यांमध्ये वसला आहे, असं आपण कायम ऐकत असतो, वाचत असतो. मात्र या खर्‍या भारताकडे अजून सरकारचंच पुरेसं लक्ष गेलेलं नाही, तर बड्या कंपन्यांना तरी हा भारत कसा माहीत असणार? भारतातल्या शहरांबाहेर राहणार्‍या अवाढव्य लोकसंख्येपर्यंत पोहोचायचं कसं, हा प्रश्न त्यामुळे मोठ्या कंपन्यांना कायमच भेडसावत आलेला आहे. कारण या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जी सखोल माहिती हवी, तीच मुळात उपलब्ध नाही. ही माहिती मिळवणं हे भारतासारख्या खंडप्राय देशात महाकठीण.

कविता महाजन अभिनंदन!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'भिन्न' सारखे नवीन काहीतरी पुस्तक वाचून मला ते पुस्तक विचार करायला प्रवृत्त करणारे वाटले. फक्त पुस्तक लिहिण हे एकवेळ सोप काम असेल पण जे लिहिल तस आयुष्य जगण हे फार अवघड काम आहे. 'भिन्न' वाचून कविता महाजनांविषयी मला फार आदर वाटायला लागला. नंतर फेसबुवकर त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांचे लेखन मला जादू सारखे संमोहित करुन टाकणारे वाटू लागले. त्यांचे शब्द आणि वाक्य अतिशय तरल असतात म्हणून पदोपदी सवड मिळाली की माझी गाडी त्यांच्या वॉलवर जाते. अलिकडे त्यांची 'कुहु' पाहिली. त्यांच्या 'कविता' त्यांचे नाव सार्थ करतात. आज वाचले...

विषय: 
प्रकार: 

डॅन ब्राऊन यांच्या पुस्तकांबद्दल गप्पा

Submitted by किमया देवलसी on 1 February, 2012 - 06:36

हॅरी पॉटरच्या जे. के. रोल्लिन्ग्बाईन्सारखे आणखी एक वेड लावणारे लेखक म्हणजे डेन ब्राउन. यांची सगळीच पुस्तके. विशेषतः "द दा विन्सी कोड " एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेउन जातात. पुस्तकात विषयाच्या अनुषंगाने येणारी चित्रांबद्दल, एखाद्या संस्थेबाबत, धर्म , आचार विचार, आजचे तंत्रज्ञान (द डिसेप्शन पौइन्ट) या संदर्भात येणारी माहिती त्या त्या विषयात आपल्याला हळूवारपणे नेउन सोडते. या पुस्तकांबद्दल, या लेखकाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

टीपः या विषयावर आणखी कुठे चर्चा झाली असेल तर जरूर कळवावे मी माझे लिखाण तिथेच हलवेल.

विषय: 

'राग दरबारी'

Submitted by लसावि on 16 December, 2011 - 04:29

अनेक वर्षे हे पुस्तक घरात होते पण वाचायचा योग आला नाही. पण काही दिवसापूर्वी 'राग दरबारीचे लेखक श्रीलाल शुक्ल यांचे निधन' अशी बातमी आली आणि बघूया तरी काय आहे ते या विचाराने वाचायला घेतले.

'शहर का किनारा, जिसे छोडते ही भारतीय देहातों का महासागर शुरु होता है' या पहिल्या वाक्यातच या पुस्तकाने माझ्यावर जो कब्जा मिळवला तो शेवटपर्यंत.

या पुस्तकची भाषा हा त्याचा सर्वात धमाल भाग आहे. वन-लायनर पंचेस, झणझणीत म्हणी आणि सणसणीत उपहास; काही उदाहरणे पहा
'उस ट्रक को देखते ही पता चलता था की उसका जनम सिर्फ सडकोंपे बलात्कार करने के लिए हुआ है'

विषय: 

'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' - मुक्ता मनोहर

Submitted by चिनूक्स on 14 December, 2011 - 13:04

बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.

पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'

Submitted by ललिता-प्रीति on 27 November, 2011 - 06:15

दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे वाचता येईल.

----------

२६/११बद्द्ल सर्वकाही

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पुस्तक