साहित्य

डासा चाव रे, ढेकणा चाव रे

Submitted by राजे विडंबनश्री on 8 February, 2013 - 08:07

डासा चाव रे, ढेकणा चाव रे
तुझ्या चावण्याचे किती गुण गाऊ रे
पण, अलगद आम्हाला चाव रे

मला निद्रेची धुंदी असू दे
जाग न येता डंख तुझा डसू दे

माझा घोरण्यात सुस्तावला गाव रे
रक्त शोषून मार तू ताव रे

- राजे विडंबनश्री

शब्दखुणा: 

जात आहे... भेटण्याची वेळ कळवाया तिला

Submitted by वैवकु on 7 February, 2013 - 07:19

जात आहे भेटण्याची वेळ कळवाया तिला
व्वा सबब !! ...भेटायच्या आधीच भेटाया तिला...

एकदा हातातला गजरा करूनी हुंगतो
एकदा मी बनवतो कानातला फाया तिला

भरजरी दिलखेच आणिक लाघवी आहे म्हणुन
मी तिच्यासम काफिया केलाय 'शेराया' तिला

कोणत्याही भावनेचा ड्रेस पेहरला तरी
ओढणी असते हवी हसरीच ओढाया तिला

जाणिवा फुलपाखरागत हालक्याफुलक्या तिच्या
मीपणा माझा कसा जमणार पेलाया तिला

विठ्ठलाचा शेर ऐकवताक्षणी बेभानुदे
वेड माझे लागुदे ..अपुलेच वाटाया तिला

__________________________________________

आयुष्याची सहल

Submitted by शाबुत on 6 February, 2013 - 05:28

सहल

उपभोग...
आणि फक्त उपभोग
भेटलं नाही तर
ओरबडुन घेण्याची वुत्ती वाढतेय
आपल्याला कोण विचारणार?
अशीच समाजाची धारणा झाली
कारण
माणसं आता सहलीला
आल्यासारखं आयुष्य जगतायत
माणसाचा जन्म आता उत्सव झाला
मोठा वाढदिवस
मोठं लग्न
शेवटी मोठं मरण.

या मोठापणासाठीच
जो-तो झुरतोय-झगळतोय
हे मोठेपण म्हणजे नक्की काय?
मोठा आवाज
मोठा डोलारा
मागे मोठी गर्दी...
सगळीकडे मोठा झगमटात
क्षणभंगुर...... असला तरी
शेवटी...
मोठ्यात-मोठ्या आकडा
हा खर्चाचा आकडाच ठरवतोय
माणसाचा मोठेपणा
यात
मनाच्या मोठेपणाचा लवलेशही नाही

सगळीकडे कुजक्या
मनाचांच दुर्गध दरवळतोय....
इथेच माणुसकीचा श्वास गुदमतोय

जीवनात माझ्या आलीस जशी तू...

Submitted by अ. अ. जोशी on 3 February, 2013 - 09:23

जीवनात माझ्या आलीस जशी तू
कल्पनेत माझ्या होतीस जशी तू

पाश सैल झाले माझ्या सलगीचे
बंधनात त्याच्या गेलीस जशी तू

मीच राखले वेडे भान दिसाचे
कात टाकण्या कासावीस जशी तू

येत कोवळ्या किरणां बाज रुपेरी
प्रीत आज हृदयीं नेलीस जशी तू

मोर स्वागता आहे सज्ज वसंता
रोज रातच्या तैनातीस जशी तू

जुनी गझल... (२००७)

कधीच नाही गणले वास्तव...खयाली तरही

Submitted by वैवकु on 2 February, 2013 - 04:45

कधीच नाही गणले वास्तव कमावलेले
विणत राहिलो विरलेल्या स्वप्नांचे शेले

किती निरागस जगून गेली जुनी माणसे
जिणे आमुचे वासनांमुळे वखवखलेले

मी हसलेले कोणाला पाहवत नसावे
दिले भेट मुखवटे मला त्यांनी रडवेले

चार मुले पण खांद्याला कोणी ना आले
मग त्याचे शेजार्‍यापाजार्‍यांनी केले

तुझ्यातल्या झुंजारपणावर तगलो होतो
तू गेलिस लढते आहे जीवन मेलेले

असून अपुल्यातच नसल्यागत वावरतो तो
म्हणुन तुम्हाला असेल "तो नसतो!" पटलेले

नका बघू कावळा पिंड शिवतो की नाही
अम्ही असू आत्म्यास विठ्याला चाटवलेले

एक भयाण अनुभव .....(गूढ कथा)

Submitted by मी मी on 1 February, 2013 - 07:11

परवा आलेला एक भयाण असामान्य अनुभव .....
कुठल्याश्या अनोळखी, अजिबात आवाज नसणाऱ्या...बिन छपराच्या, आकर्षक यानात बसून
असंख्य माणूस सदृश मेटालिक कपड्यातली लोक भराभर बाहेर पडलीत ......
आकाशातून उतरणाऱ्या छोट्या गोलाकार वस्तूतून खाली आलेल्या सलाखीने...
उत्खनन सुरु केले.....वाऱ्या पेक्षाही प्रचंड वेगाने जागा खणली जात होती.....
आणि टना पेक्षाही प्रचंड वजनाची माती दूर सारली जात होती.....
मी अजूनही हे सर्व बघते आहे...मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना.....
कुठून आलेत हे सर्व?....कोण आहेत?...आपण पूर्वी यांना कधीच कुठे कसे पहिले नाही ?

स्मशान वैराग्य अंतीम.

Submitted by श्रीमत् on 31 January, 2013 - 13:39

"प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एक वर्तुळ बनवुन जगत असतो. माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझी प्रेयसी/प्रियकर, माझी बायको, माझे मित्र, माझी शाळा/कॉलेज, माझे ऑफिस, मासे घरं, माझी गाडी....इति पण आपल्याला हे विसरुण चालणार नाही की "त्या" वर्तुळाची सुरवात पण एका सुक्ष्म बिंदु पासुणच झालेली असते."

स्मशान वैराग्य भाग १
http://www.maayboli.com/node/33314
स्मशान वैराग्य भाग २
http://www.maayboli.com/node/33379

विषय: 

ती वागली कशीही म्हण चांगलीच आहे

Submitted by वैवकु on 31 January, 2013 - 02:43

काहीतरी तिची ही जादूगरीच आहे
माझ्या मनात इच्छा आता तिचीच आहे

ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे

दो शब्द बोलण्याचे काळीज मागते ती
ही बातमी म्हणे की आहे खरीच आहे

कसला असा अबोला रुसवा कश्यामुळे हा
मी प्राण सोडताहे ती चाललीच आहे

हा कायदाच आहे निष्ठूर जिंदगीचा
ती वागली कशीही म्हण चांगलीच आहे

वेदना

Submitted by UlhasBhide on 30 January, 2013 - 03:34

वेदना

एक होता काळ जेव्हा वेदना कुरवाळली
चोचले मी पुरवले अन् वेदना सोकावली

मुक्त करण्या वेदनेला सजवले काव्यातुनी
मुक्त ना आसक्त झाली मन्मनाला ग्रासुनी

वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही ताडले
जू तिच्या मानेवरी मी जीवनाचे लादले

इष्ट आपत्तीप्रमाणे वेदनेला मानले
की म्हणू मी वेदनेला दावणीला बांधले

आज माझ्या वेदनेला मीच देतो वेदना
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना

.... उल्हास भिडे (३०-१-२०१३)

द्विमात्रिक गझल...

Submitted by अ. अ. जोशी on 30 January, 2013 - 00:04

गझलेसाठी सर्वात लहान बहर काय असू शकतो याचा विचार करीत असताना सुचलेली गझल...

धड
पड

फळ
वड

सर
गड

नर
नड

पर
जड

हस
रड

कुल
कड

फुल
झड

चुक
दड

Pages

Subscribe to RSS - साहित्य