साहित्य

नाटक काय ? हम्म्म... (बालगीत)

Submitted by सत्यजित on 19 April, 2013 - 00:56

मुसूमुसू मुसूमुसू रडतंय कोण ?
हातांमागे दडतंय कोण
दोन बोंटाचा झाला कोन
गुपचुप बघतात डोळे दोन

कुठुनी आला राज कुमार
बोटां वरती होऊन स्वार
दुडुदुडु दुडुदुडु पळू लागता
खुदकन झाले रडू पसार

गुदुगुदु गुदुगुदु गुदगुल्या
खुदूखुदू खुदूखुदू खुदखुदल्या

नाटSSSक काय ? हम्म्म...

-सत्यजित.

घर पहावे बांधून .. - अंतिम

Submitted by मुरारी on 18 April, 2013 - 09:29

भाग १ :- http://www.maayboli.com/node/42509

वत्सला बाई संपलेला दुधाचा ग्लास घेऊन औषध आणायला बाहेर गेल्या.. ती हि थोडीशी मागे सरकली, तेवढ्यात आत्त्याने झपाट्याने पुढे सरकून तिचा हात दाबला.. " माझं घर आहे, तू.... निघून जा.. घर पाहावे बांधून ... घर निघून जा .. तुला पाहावे बांधून .... मला नाय जायचं .. बांधून टाकेन .. सगळ्यांना बांधेन ..माझं घर .. माझं घर माझ घर .. तोंडातल्या बोळक्यातून जीभ वळवळत होती, तोंडावरच्या शिरा ताणल्या गेलेल्या होत्या.. अत्त्या जवळजवळ सरकत होती
ती जोरात ओरडून कशीबशी बाहेर आली. आत्त्या बोळक्या तोंडाने हसत होती.

विषय: 

बाजार हवा आहे

Submitted by वैवकु on 17 April, 2013 - 10:48

देईन मला मी जो आकार हवा आहे
आतून तुझा आधी आधार हवा आहे

शेजेत जरी आपण एकाच निजाया, पण...
नुसताच तुला माझा शेजार हवा आहे

सोडून दिली नाही पण घेतसुधा नाही
सुचवेल मला कविता तो बार हवा आहे

कित्येक दिवस मीही सुट्टी न दिली त्यांना
माझ्यातिल दु:खांना रविवार हवा आहे

दमलोय अता पुरता पूर्तीत पुराण्यांच्या
नसतील नवी स्वप्ने तो पार हवा आहे

भेटेल तुला कोणी माझ्यासम ना मृत्यो
देहात तुझा ज्याला आजार हवा आहे

विक्रीसहि विठ्ठल मी काढीन कधी माझा
पण त्याकरिता काळा बाजार हवा आहे

घर पहावे बांधून .. - १

Submitted by मुरारी on 17 April, 2013 - 07:55

गर्दीने भरून सांडणाऱ्या स्टेशन मधून ती कशीबशी बाहेर पडली, आणि तीच तिलाच हायसं वाटलं. हातातली पिशवी सावरत ती एका कडेला सावलीत उभी राहिली, पिशवीतून पाण्याची बाटली काढून अर्धी संपवल्यावरच तिच्या जीवात जीव आला. रुमालाने चेहरा सारखा करत तिने आईला फोन करून सुखरूप उतरल्याचे सांगितले. पण अजूनही प्रवास संपलेला नव्हता, एक महत्वाचा टप्पा पार पडला एवढेच,प्रचंड गर्दीनेच ती दडपून गेलेली होती,

कसे नि कुठून ???

Submitted by पुरंदरे शशांक on 17 April, 2013 - 05:46

कसे नि कुठून ???

उंच उंच आकाशात ढग येतात कुठून ?
ढगात या एवढाल्या पाणी भरतात कुठून ?

पाणीवाले ढेरपोटे ढग कसे पळतात ?
ढकलाढकली करताना दंगा किती करतात ?

वीज कशी चमकते काळ्या ढगातून ?
पाणी कसे पडते बदाबदा त्यातून ?

ढग तर काळा काळा दिसतो किती दुरुन ?
पांढर्‍या शुभ्र गारा पडतात कशा त्यातून ??

किती प्रश्न विचारशील कसे नि कुठून...
खा जरा गारा नि ये मस्त भिजून ....

शब्दखुणा: 

चालला आहे कशाचा खल इथे

Submitted by तिलकधारी on 16 April, 2013 - 09:37

आर्त श्वासांची किती धांदल इथे
चालला आहे कशाचा खल इथे

तेच वलयांकीत होते नेमके
वागले जे रोज उच्छृंखल इथे

बघ विठ्याने माळ माझी घातली
भक्त नाही एवढा अट्टल इथे

गप्प बसण्याचे हजारो फायदे
पण नको लढवूस ही शक्कल इथे

एवढा काटा कसा आला असा?
स्पर्शुनी गेले कुणी कोमल इथे

हे तुझ्या दारात भुरटे केवढे
काढवेना ईश्वरा चप्पल इथे

वानवा आहे सुगंधाची तुझ्या
सोड आता रेशमी कुंतल इथे

विषय: 

गेला विठ्ठल

Submitted by वैवकु on 16 April, 2013 - 06:38

नेला विठ्ठल ......गेला विठ्ठल

सावळकाळा हेला विठ्ठल
दारूभरला पेला विठ्ठल
जोड्याभवती शेला विठ्ठल
सांगा ...कोणी केला विठ्ठल?

आई गेली...
मेला विठ्ठल !!!

आई गेली......मेला विठ्ठल !!!

आहेत तोवर पाहून घ्या

Submitted by जो_एस on 16 April, 2013 - 06:22

आहेत तोवर पाहून घ्या
झाडं,... रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या
आहेत तोवर पाहून घ्या

झाडं तोडून प्रगती होते
विकासाला गती येते
परत एकदा विकासाची
व्याख्या तेवढी करून घ्या
आहेत तोवर……

झाडं तोडा रोलर फिरवा
स्टेडियम बिल्डींग सेझ उगवा
सगळ्यात आधी श्वासासाठी
मास्क तेवढा करून घ्या
आहेत तोवर …..

एकेकाळी पृथ्वी वरती
लहान मोठी झाडं होती
फोटो सहित इतिहासात
नोंद मात्र करून घ्या
आहेत तोवर…..

“झाडं लावा झाडं जगवा”
कागदावरती लिहून घ्या
त्या कागदांनी येताजाता
कृती विसंगत झाकुन घ्या
आहेत तोवर…..

प्रोजेक्ट लिहून भागणार नाही
कायदे करून वाचणार नाही

शब्दखुणा: 

अक्षय नाते...

Submitted by पुरंदरे शशांक on 16 April, 2013 - 01:09

अक्षय नाते...

इथेच आहे कृष्ण अजुनही
राधासखीही इथेच रुळली
देहाची आसक्ती सुटता
मधुराभक्ति तरी गवसली

दिव्यप्रेम हे जीवाशिवाचे
अजून फुलते असे धरेवर
गाथेमधुनी कधी बरसते
ज्ञानेशाच्या ओवीतून झरझर

राजघराणे त्यागून मीरा
वाट चालते वृंदावनची
लोभावून हरि धावत मागे
जनाईसंगे शेण्या वेची

समर्पणाची मस्ती आगळी
'माझे-मीपण' काही नुरते
देवभक्त ते एकचि होता
कान्हा-राधा अक्षय नाते...

शब्दखुणा: 

असा मी कसा मी निराळा निराळा

Submitted by उद्दाम हसेन on 15 April, 2013 - 14:39

नसे ओळखीचा तुझ्या मी जगाला
मशीदी मधे शोधतो विट्ठलाला

तुझ्याशी अबोला करायास जाता
तुझ्या लोचनांनी हसावे कशाला

मना रे, कशाला जळावे पुन्हा तू
पुन्हा आसवांनो जरा या घराला

नका कुंडलांनो दिवे मालवू रे
तिच्या सावलीला बघा घात झाला

कशाला पुरावा कशाला दुरावा
पहा, माफ केले तरी मी तुम्हांला *

तिचा शेर प्रत्येक जेथे असावा
करू द्या अशी शायरी शायराला **

असा मी कसा मी निराळा निराळा
स्वतः मीच धिक्कारतो रे स्वतःला

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला

- Kiran..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य