साहित्य

प्रकाशन सोहळा..

Submitted by प्राजु on 16 January, 2013 - 06:19

नमस्कार मंडळी,
नमस्कार,
माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.

विषय: 

शेंदूर

Submitted by निंबुडा on 16 January, 2013 - 04:02

शेंदराने माखलेली मूर्ती पाहिलीत का कधी?
लेपावर लेप..
पुटांवरती पुटं..
आणि मग झाकले जाते
आतल्या मूर्तीचे मूळ रुप, रंग
सुंदर, रेखीव आकाराचे रुपांतर होते
एका ओबढ धोबड आकारात
..
..
..
तसाच वेदनांचा शेंदूर फासत जाते नियती
आणि तुम्ही मला विचारता,
आधीची 'तू' कुठे हरवलीस?

शब्दखुणा: 

अवतार

Submitted by शैलेंद्रसिंह on 15 January, 2013 - 22:52

महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....

शब्दखुणा: 

१ फेब्रुवारीपासून गुलमोहरात झालेले बदल

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 14:47

दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.

लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः

आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)

गाय वासरू छाप गोमुत्र

भारतीय

डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)

गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)

देवपूरकर

या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.

==========================

आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १

Submitted by टीम गोवा on 14 January, 2013 - 07:17

आज आलो नेमका शुद्धीत मी ..तरही-हझल

Submitted by वैवकु रीटर्न्स on 14 January, 2013 - 04:24

जी तुझी खाल्लीय थोबाडीत मी
आज आलो नेमका शुद्धीत मी

मूगदाळीचीच तू केलीस होय्
साबुदाणा शोधतोय् खिचडीत मी

ऐकवत नाही तुझे हे घोरणे
म्हणुन म्हणतो झोपुका गच्चीत मी

"एकटा बेडर" म्हणवतो या जगी
फक्त माझ्या बायकोला भीत मी

शेर माझे ठेवतो चखणा म्हणुन
अन् तिचे प्रतिसाद बस्तो पीत मी

पाठ मॅट्रिकचा मला अभ्यासक्रम्
असुनि नसल्यासारखा नववीत मी
_____________________________

.. नेमका शुद्धीत मी (तरही)

Submitted by वैवकु on 12 January, 2013 - 11:52

___________________
दिलेला तरह जसाच्या तस पाळण्याचे अनेक प्रयत्न केले पण मला हवे तसे जमलेच नाही मग जरासा बदल केला आहे .....आणि आलो नेमका शुद्धीत मी
क्षमस्व!
__________________

एवढासा राहिलो शिलकीत मी
आणि आलो नेमका शुद्धीत मी

मी असा अन् मी तसा.... म्हणतेस तू
तो कसा नाही मला माहीत 'मी'

हे तुझे आकाशही सामावते
त्या, मनाच्या सानुल्या खिडकीत मी

भार स्वप्नांचा उरी ...झुकलो पुढे
वाकलो नाही तसा पाठीत मी

उफ् ! मला पोचायचे होते जिथे
तेथुनी चढलोय ह्या गाडीत मी

चिपळूणचे शरद पवारांचे भाषण

Submitted by pkarandikar50 on 12 January, 2013 - 10:00

शरद पवारांचे रोखठोक भाषण.

आपल्या आजवरच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात शरद पवारांनी अनेक सभा-संमेलनातून उत्तम भाषणे केलीत. त्यापैकी काही मोजक्या भाषणांमध्ये, चिपळूणच्या साहित्य संमेलनातील उदघाटनपर भाषणाचा क्रम वरचा राहील. आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर कराडला भरलेल्या साहित्य संमेलनात कै. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख आजही गौरवाने केला जातो. तसाच पवारांच्या चिपळूणच्या भाषणाचाही उल्लेख यापुढे वरचेवर होत राहील यात शंका नाही.

विषय: 

लहान मुलांसाठीची पुस्तके

Submitted by सायली on 11 January, 2013 - 09:57

माझी मुलगी २ महिन्यांनी ८ वर्षांची होईल. तिला मी सध्या रात्री तोत्तोचान वाचुन दाखवत आहे. रोज एक गोष्ट याप्रमाणे. ती आणि मी ते खुप एन्जॉय करतोय. आणि मला जे तिला त्यातुन सांगायचे आहे ते पण तिला समजतयं, पण आता ते संपत आलयं.
अकबर बिरबल , तेनालीराम किंवा तत्सम वाचतच असतो आम्ही. ती आंग्ल माध्यमाच्या शाळेत जाते. आणि जे काही तिला वाचता येईल ते ती वाचतेच. अजुन थोडी मोठी झाली की मला तिला 'लंपन'(चारही पुस्तकं) वाचुन दाखवायला आवडेल.
पण आता तिला वाचुन दाखवावं असं काहीतरी वेगळं सुचवावं यासाठी हा धागा.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य