साहित्य

तडका - घोटाळे

Submitted by vishal maske on 24 June, 2015 - 10:55

घोटाळे

ज्याच्या-त्याच्या कार्यासाठी
ज्याचे-त्याचे कक्ष असते
अन् कुठे काय खाता येते
यावर सर्वांचे लक्ष असते

जिथे विकास करायचा तिथे
भ्रष्टाचारी बिंब वाजत आहेत
अन् विकासापेक्षाही जास्त
इथे घोटाळे गाजत आहेत,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सत्संग महिमा

Submitted by पुरंदरे शशांक on 23 June, 2015 - 23:41

सत्संग महिमा

चित्ता व्यापुनिया | नाना दोष तण |
होत ना प्रसन्न | कदाकाळी ||

तीर्थ सत्कर्माचे | शुद्ध करीतसे |
चित्त अनायासे | साधु संगे ||

संतसंगतीने | दोष निवारता |
अपार शांतता | लाभतसे ||

सहज उच्चार | विठ्ठल नामाचा |
गाभारी मनाच्या | घुमतसे ||

चित्त होते लय | पूर्ण चैतन्यात |
सुख बरसत | अमृताचे ||

अमृताचे पुत्र | तुम्ही आम्ही सारे |
गर्जती अपारे | साधुसंत ||

घ्यावे आकळोनि | परमार्थ सार |
नमवोनि शिर | संतांपायी ||

हरि ॐ तत् सत् ||

तडका - ती दारू नव्हे,...!

Submitted by vishal maske on 23 June, 2015 - 23:13

ती दारू नव्हे,...!

न पिणाराला कळले तरीही
पिणाराला ना कळले आहेत
दारू पिल्याच्या कारणावरच
आजवर कित्तेक मेले आहेत

दारू बंदीची मागणी होताच
पुन्हा नविनच झाकण आहे
ती दारू नव्हतीच म्हणत
दारूची पाठराखण आहे,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दारू बंदी,...!

Submitted by vishal maske on 23 June, 2015 - 11:06

दारू बंदी,...!

कुणी पावले उचलले तर
कुणाचे पावले कुचलले
अन् दारूबंदीचे निर्णय
इथे वारंवार कोसळले

दारू बंद होतच नाही
याचे कारण बोधायला हवे
अन् दारू कुठे बनते आहे
याचे ठिकाण शोधायला हवे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सत्य-असत्य,...

Submitted by vishal maske on 22 June, 2015 - 22:33

सत्य-असत्य,...

सत्यावरती पडदा घालुन
असत्य बाहेर काढले जाते
न्यायासाठीचे सत्य मात्र
सर्रास इथे पीडले जाते

मना-मनात दडेल अशी
असत्याची खोड असते
मात्र सत्याच्या पावर पुढे
असत्याची भांडाफोड असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शिक्षणाच्या बाबतीत,...

Submitted by vishal maske on 22 June, 2015 - 10:57

शिक्षणाच्या बाबतीत,...

एका मागुन एक प्रकरणं
आता उघडकीस येऊ लागले
अन् शिक्षणमंत्र्यांनाही कुणी
पदवी प्रकरणांत गोवु लागले

करायचे म्हणून आरोप नसावेत
त्यात सत्यापनाची अस्सल असावी
"शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे"
त्यामध्ये बनावटी भेसळ नसावी,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विषारी दारू,...!

Submitted by vishal maske on 21 June, 2015 - 22:19

विषारी दारू,...!

त्यांच्या मृत्युच्या कारणांची
दारूत नोंद कुठे करतात,...?
जे माणसं दारू पिल्याने
रोज-रोज इथे मरतात,...!

जिथे परिणाम तात्काळ
तिथेच फक्त दोष आहे
मात्र दारूमध्ये विष नाही
दारू हेच विष आहे,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माना-पानात,...

Submitted by vishal maske on 21 June, 2015 - 10:42

माना-पानात,...

आता माना-पानाचे प्रकरणं
भलतेच वाढलेले आहेत
मान-पान देण्या-घेण्यासाठी
इथे समरही घडलेले आहेत

कुणी रूसलेले असतात तर
कुणी भलतेच फूगत असतात
अन् माना-पानासाठी आपलेही
कधी विरोधात वागत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

ग्रुप अॅडमीन

Submitted by vishal maske on 21 June, 2015 - 09:12

~!!! ग्रुप अॅडमीन !!!~

कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. 9730573783

प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे
कुणीही ग्रुप काढू शकतो
सोशियल मिडीयाने माणसं
प्रत्येकजण जोडू शकतो

ज्याच्या-त्याच्या इच्छेनुसार
ज्याचा-त्याचा वावर असतो
सोशियल मिडीयातील ग्रुप
प्रसारणाची पावर असतो

कुणासाठी कुटूंब असतो
कुणासाठी मात्र गँग असतो
अन् ग्रुपमध्ये वावरतानाही
कुणी भलताच हँग असतो

कुणाला नावडते असतात
कुणाला आवडते असतात
सोशियल मिडीयातील ग्रुप
भलतेच दवडते असतात

नको असलेल्या बाबींचाही
कधी गौप्यस्फोट होऊ शकतो
तर कधी-कधी आपलाच ग्रुप
आपल्या अंगलट येऊ शकतो

तडका - कसरत,...

Submitted by vishal maske on 20 June, 2015 - 20:55

कसरत,...

जिकडे रग असेल तिकडे
प्रत्येकाचाच ओघ असतो
हव्या असलेल्या बाबींचाही
कधी योगा-योग असतो

कुणाचे शरीर ओसरत असते
कुणाचे शरीर पसरत असते
मात्र सशक्त शरीरासाठी
अत्यावश्यक कसरत असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - साहित्य