साहित्य

तडका - प्रखरणातले प्रकरणं,...

Submitted by vishal maske on 1 July, 2015 - 11:14

प्रखरणातले प्रकरणं,...

कुणाचे गार पडलेले आहेत
कुणाचे मात्र तापले आहेत
अन् एका-एकाचे प्रकरणं
इथे अजुनही रापले आहेत

कधी बिनबुडाचे आरोपही
रंगवले तर रंगत असतात
अन् वेग-वेगळ्या तर्‍हेनं
कुतुहलांना टांगत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

ये रे ये रे पावसा,...

Submitted by vishal maske on 1 July, 2015 - 09:14

ये रे ये रे पावसा,...

केली होती पेरणी,ठेऊन तुझ्यावर भरवसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||धृ||
उन्हामधी राबुन राबुन
पै-पै जमा केली होती
जमीन भेगाळलेलीच होती
पण आशा मात्र ओली होती
वाटलं होतं मनामधी,मीळल तुझा वसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||१||
पहिल्या पावसाचं स्वागत कराया
मानवजात आनंदी झाली होती
तुझे पेपराला फोटो अन्
टि.व्ही.ला बातमी दिली होती
सांग आता तु,का रागवलास असा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||२||
पहिलं कर्ज फिटलं नव्हतं
पण दुसरं कर्ज काढलं होतं
अन् कमी पडलेल्या पैश्यांसाठी
बायकोचं दागिणं मोडलं होतं
उगावणार्‍या सुखालाही,नको टाकु फासा

तडका - पिक

Submitted by vishal maske on 30 June, 2015 - 23:27

पिक

पावसाळ्याचं अमिश दाखवुन
पावसानं दडी मारलेली आहे
पावसाळ्यातच पावसाची चिंता
मना-मनात वाढलेली आहे

विश्वास ठेऊन निसर्गावर
कर्जाचं दु:ख भोगलं आहे
पण पाण्याविना शेतामधी
पिक करपु लागलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अतिशहाणे,...

Submitted by vishal maske on 30 June, 2015 - 10:40

अतिशहाणे,...

स्वत:ला शहाणा समजल्यास
माणूस अतिशहाणा होतो
अति शहाणपणा दाखवताना
माणूस अतिलहाना होतो

दुसर्‍यांचे शहाणपण पाहताना
त्यांची बुध्दी आखडली जाते
अन् अतिशहाणपणाची री मात्र
इथे वारंवार ओढली जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हे लक्षात असु द्या,...

Submitted by vishal maske on 29 June, 2015 - 22:54

हे लक्षात असु द्या,...

कुणी सत्य म्हणत असतात
कुणी असत्य म्हणत असतात
आपली छाप टिकवण्यासाठी
दोन्ही वारे झुण-झुणत असतात

मात्र आरोप-प्रत्यारोप करताना
औकातीत औकात असाव्यात
अन् अवमानाच्या हद्दी सुध्दा
नैतिकतेच्याच आत असाव्यात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निषेध,...

Submitted by vishal maske on 29 June, 2015 - 11:24

निषेध,...

कुणी आनंद घेत असतात
कुणाला इजा भेटत असतात
एकाच प्रकरणात कधी-कधी
दोन्हीही बाजु थाटत असतात

कधी कुणाच्या वागण्याचा
कुणाच्या मनाला छेद असतो
तर न पटणार्‍या गोष्टींचा
कधी प्रकर्षाने निषेध असतो,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निषेध,...

Submitted by vishal maske on 29 June, 2015 - 11:23

निषेध,...

कुणी आनंद घेत असतात
कुणाला इजा भेटत असतात
एकाच प्रकरणात कधी-कधी
दोन्हीही बाजु थाटत असतात

कधी कुणाच्या वागण्याचा
कुणाच्या मनाला छेद असतो
तर न पटणार्‍या गोष्टींचा
कधी प्रकर्षाने निषेध असतो,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - स्री जन्मा,...

Submitted by vishal maske on 28 June, 2015 - 21:17

स्री जन्मा,...

स्री जन्माचा हेवा होतो
समाजातुन पुन्हा-पुन्हा
जगण्याआधीच मरण्याचा
सांगा तीचा काय गुन्हा,.?

वारंवार पाहिला आहे
स्री-पुरूषांतील दुजेपणा
अन् स्रीयांनीही केला आहे
कधी स्रीयांचाच खुजेपणा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पावसा,...

Submitted by vishal maske on 28 June, 2015 - 11:11

पावसा,...

मना-मनात वाढणारी
प्रतिक्षेची उंचाई आहे
जिकडे-तिकडे आता
पावसाची टंचाई आहे

आकाशयात्री ढग सुध्दा
ना अपेक्षीत बरसले आहेत
अन् शेता-शेतातील अंकुर
पाण्यासाठी तरसले आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कधी-कधी,...!

Submitted by vishal maske on 27 June, 2015 - 21:42

कधी-कधी,...!

विचारपुर्वक बोलायच्या गोष्टी
विचारपुर्वक ना बोलल्या जातात
मात्र बोलुन झालेल्या गोष्टींवर
सुटकेच्या उचक्या ढाळल्या जातात

आपल्या बोलण्याच्या परिणामांचा
आपल्यावरतीच तर भार असतो
मात्र कधी आपल्या वक्तव्यावरून
आपलाच पलटवार असतो,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - साहित्य