साहित्य

मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
तारीख/वेळ: 
6 January, 2011 - 21:00 to 15 January, 2011 - 21:00
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 

ऑनलाईन प्रदीर्घ लिखाण वाचताना

Submitted by सांजसंध्या on 24 December, 2010 - 13:56

हल्ली बरेच जण ऑनलाईन पुस्तकं वगैरे वाचतात. मला मात्र आजही पुस्तक हातात धरून वाचायला आवडतं. पुस्तक, मासिक असं काहीही. एक तर ते जवळ बाळगता येतं. डोळ्याला उजेडाचा त्रास नाही. लोळत वाचता येतं. सगळ्यातमहत्वाचां म्हणजे दीर्घ कथा असेल तर कुठपर्यंत आलीय कथा हे पान क्रमांक पाहून किंवा मार्कर, पेन, पेन्सिल असं काहीही ठेवून लक्षात ठेवता येतं. थोड्या वेळानं मग पुढची कथा कंटिन्यू करता येते.

'तुटलेले पंख' - अम्बई, अनुवाद - सविता दामले

Submitted by चिनूक्स on 21 December, 2010 - 04:49

विभावरी शिरुरकरांपासून मेघना पेठ्यांपर्यंत असंख्य लेखिकांनी मराठीत भरघोस लेखन केलं असलं तरी इतर भारतीय भाषांमधलं स्त्रीसाहित्य मराठीत फारसं आलेलं नाही. हे ध्यानी घेऊन मनोविकास प्रकाशनानं 'भारतीय लेखिका' ही मालिका प्रसिद्ध केली आहे. या मालिकेअंतर्गत आतापर्यंत तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. अकरा पुस्तकं लवकरच प्रकाशित होतील. सेन्सॉरशिपला धुडकावून लावणार्‍या या लेखनात लैंगिकता, राजकारण, पर्यावरण, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांचा थेट वेध घेतला आहे, जाणार आहे.

कोकण सहलीच्या निमित्ताने

Submitted by नरेंद्र गोळे on 21 December, 2010 - 01:28

डिसेंबर २०१० च्या ११, १२ आणि १३ तारखांना आम्हा सगळ्यांना वेळ होता. कोकणात सहल करण्याची इच्छा होती. हवामान स्वच्छ होते. म्हणून, (चालकाव्यतिरिक्त) १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून आम्ही नऊ जण मजेत कोकण फिरून आलो. त्यानिमित्ताने आमच्या माहितीत जी भर पडली तिचे हे संकलन आहे.

'मुक्तांगणची गोष्ट' - डॉ. अनिल अवचट

Submitted by चिनूक्स on 28 November, 2010 - 23:38

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.

चांगले 'साहित्य' / 'चांगला' वाचक म्हणजे काय ?

Submitted by Adm on 22 November, 2010 - 21:34

'मी वाचलेलं पुस्तक' बाफवर सुरु झालेली चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा.
चांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय ? अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का?

मेघना भुस्कुटेने टाकलेल्या पोस्टवरून ही चर्चा सुरु झाली.

अवचटांबद्दलची ही एक प्रतिक्रिया वाचनात आली. मला ती बेहद्द आवडली आणि पटली. काहीशी कडवट असूनही.
http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/10/blog-post_29.html

विषय: 
शब्दखुणा: 

अक्षर अंगण

Submitted by ट्यागो on 19 November, 2010 - 23:15

अक्षर अंगण

८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढल्या महिन्यात ठाणे येथे भरत आहे. उणापुरा एकच महिना बाकी आहे. जोरदार तयारी चालू आहे. आणि बहरते आहे एक सुंदर अक्षर अंगण. या अंगणात तुमचे हार्दिक म्हणतात तसं स्वागत आहे.

काय आहे हे अक्षर अंगण?

विषय: 

ई- पुस्तक

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आंतरजालावर भटकताना 'सहा सोनेरी पाने' हे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक सापडले.
दिलेल्या दुव्यावर गेलात तर, हे पुस्तक उतरवून घेण्यास उपलब्ध आहे.

प्रकार: 

मायबोली दिवाळी अंक

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने यावर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंकांची स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केली आहे.तरी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिवाळी अंक संपादक-प्रकाशक यांनी स्पर्धा-प्रदर्शनासाठी अंकाच्या २ प्रती दि.२०-२१ नोव्हे. २०१० पर्यंत शिंदेवाडी महापालिका शाळा, पालव मार्ग, दादर - पूर्व मुंबई - ४०० ०१४ येथे पाठवाव्यात असे आवाहन प्रमुख कार्यवाह रमेश सांगळे करीत आहे.

आपला माबोचा अंक आपण ह्यांना द्यावा म्हणून हे इथे लिहिले आहे.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य