साहित्य

सुस्ती..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

घड्याळात बाराचे ठोके
दिवे अजून न विझलेले
वाहणार्‍या रस्त्यावरचे
निऑन आकाशात पोचलेले

हे शहर दाटीवाटीने भरलेले
चोवीस तास व्यस्त-व्यापलेले
सर्द दुलईतील झोप सोडून
कागदांच्या ओझ्यानी वाकलेले

येईल हळूच जरा वेळानी
लगबगीची ती प्रभात रोजची
अन सुरू होईल वर्दळ पुन्हा
चेहर्‍याचेहर्‍यावर दिसेल सुस्ती!

- बी

विषय: 
प्रकार: 

दुसरा आरसा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रात्रीच्या कभिन्न काळोखात
प्रकाशाचा आधार न घेता
तो खरं प्रतिबिंबं दाखवितो,
ते इतकं प्रखर असतं की
पापण्या झुकुनं जाव्यात

मग त्याला विन्मुख होऊन
पुन्हा सवयीच्या आरशात
मी माझं नखशिखांत रुप
न्याहाळत बसतो.. पण छे!

विषय: 
प्रकार: 

निरुत्तर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आपल्यातील आपण जेंव्हा पोटचा गोळा म्हणून
जन्म देणार्‍या आईसारखे नसतो,
पालनपोषण करणार्‍या बापासारखे नसतो,
नऊ मास एकाच उदरात वाढलेल्या
सख्ख्या भावंडांसारखेही नसतो,
सगे-सोयरे-प्रियजन ह्यांच्या पैकी

विषय: 
प्रकार: 

नेफ्रतीती

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मी शाळेत असताना शाळेत होण्यार्‍या स्नेहसम्मेलनातील सांस्कृतीक कार्यक्रमात जमेल तितक्या स्पर्धामधे आणि कार्यक्रमात भाग घेण्याचा प्रयत्न करायचो.

विषय: 
प्रकार: 

अपवादानेच...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कधी कधी अपवादानेच
करडा वर्तमानकाळ
गुलाबी गुलाबी होतो..

'मग हे स्वप्नं तर नाही,
कदाचित संपलं तर नाही,
मधेच जर भंगून गेलं तर
आपण विंधणार तर नाही'

ह्याचचं सारं दु:ख होऊन
मिसळून जातो रोजचाच,
करडा करडा रंग..

-बी

विषय: 
प्रकार: 

वर्‍हाळ (वर्‍हाड)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कोकण संपून मुंबई आली
मुंबई संपून खांदेश आले
मराठवाडयाची सिमा स्पर्शून
वर्‍हाळ आले..वर्‍हाळ आले

कापसाच्या बोंडाचे
काळ्याभोर जमिनीचे
रणरणत्या उन्हाचे
पाण्याच्या दुर्भिक्षाचे
खंगलेल्या बळीराजाचे

विषय: 
प्रकार: 

आधुनिक व्यथा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

ती कवा भाईर जात्ये
अन कवा घर्‍हात येत्ये
तिचा काई ठावठिकाना न्हाय
आयटीत नोकरी धरल्यापासून
घर्‍हात तिचे पाय न्हाय.

सट्व्या काम्पुटरच्या माग्ये
ती हात धुवून लागली हाय
नवरा गेला खडड्यात अन
लेकरा-बाळाकढंही लक्ष न्हाय.

विषय: 

उंचावरून...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सुदैवाने ह्या आकाशाइतकं नाही
पण, 'पुढे काय? पुढे काय?'
असं सारखं म्हणता म्हणता
उंचावर आल्यासारखं वाटतं
परत खाली उतरायच्या पायर्‍या
त्या तर कुठेच दिसत नाही
जो तो दिसतो आहे फक्त
आणखी वरची पायरी रचताना

खाली हरवले आहेत की

विषय: 
प्रकार: 

धो धो पाऊस

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

दुधाळ काचेच्या तावदानातून
रप रप कोसळणार्‍या पावसाकडे
टक लावून पाहत असताना
मलाही माझ्या डोळयातलं आभाळ
रिकामं करून टाकावसं वाटतं..

पण ह्या आभाळासारखा
ढगांचा गडगडाट नको आहे,
विजांचा कडकडाट नको आहे,

विषय: 
प्रकार: 

रमणी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

ते प्रहर नक्की कुठले होते, हे त्यालाही आता स्मरत नाही
उषा म्हणाली, 'तुला नाद होता माझ्या किलबिलणार्‍या पाखरांचा'
संध्या म्हणाली, 'तुला नाद होता माझ्या कुसुंबी प्रकाशाचा'

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य