भाषा

सत्संगती

Submitted by पुरंदरे शशांक on 27 March, 2013 - 23:09

सत्संगती

श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||

न लगे जावया | अन्य पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||

व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||

अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||

लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||

(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

शब्दखुणा: 

धन्य तुका देखियला...

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2013 - 05:20

धन्य तुका देखियला...

लळा इतुका लागला
करमेना विठ्ठलासी
धाडी विमान देहूसी
राही आता वैकुंठासी

भक्ति-वैराग्याच्या खुणा
अंगी ठाकल्या रोकड्या
देव स्वर्गींचे धाऊनी
घाली तुम्हा पायघड्या

मूर्तिमंत ब्रह्मरस
तुम्हाआंगी सामावला
शब्द कल्लोळ तेजाचे
वाटे वेद मुखे आला

माय-मराठी आपुली
धन्य धन्य तुवा केली
जन्म घेऊ वारंवार
तुम्हा शब्दांचीच भुली

धन्य संताजी मैतर
गाथाशब्द स्थिर केला
धन्य महाराष्ट्र भूमि
धन्य तुका देखियला

बाळ गुणाचं....

Submitted by पुरंदरे शशांक on 24 March, 2013 - 23:13

बाळ गुणाचं....

चिटकु पिटकु ........ नक्टु नक्टु
जिभ्लु लाल लाल ........ चुटकु चुटकु

काय काय बघ्ता ...... टुक्कु टुक्कु
चाल चाल करा ....... लुट्टु लुट्टु

भुर्रऽ म्हण्ताच ...... चमकलं हासु
हातपाय हल्वत ..... कित्ती नाचू

म्मं म्मं म्हणताच ..... मिटकु मिटकु
डेरकं भरताच ....... डोळे मिट्टु

बाळ गुणाचं .... सोनाटक्कु
कित्ती गोग्गोड .... चिक्कु पिक्कु

शब्दखुणा: 

जरा दूर जाऊ

Submitted by जो_एस on 19 March, 2013 - 01:10

जरा दूर जाऊ जनां पासुनी
नशीबास ताडू दिवा घासुनी

चला हस्तरेषा नव्या काढुया
मिटाव्या कशा पण जुन्या घासुनी?

विरे आठवांचा मनोरा तशी
पुढे वाट लागे दिसाया सुनी

जगाचा कसा गूण छायेसही
मला टाळते ती तमी हासुनी

जरा सत्यवाचा कुणी बोलला
पहातात सारेच आवासुनी

कळे भांडणाऱ्यांस ना शेवटी
सुरूवात झाली कशा पासुनी

खरा तोच ठरतो जगाच्या मते
असत्यास सांगेल जो ठासुनी

असा दगड कोणी, न चिंता करा
बना देव, शेंदूर घ्या फासुनी

नसे देव होणे सुखाचे तसे
अधी लागते घ्यायला तासुनी

सुधीर

शब्दखुणा: 

लपाछपी

Submitted by पुरंदरे शशांक on 17 March, 2013 - 03:59

लपाछपी

चला चला खेळू या गं
लपाछपी तू गं मी गं

लपणार आधी मीच
लवकर डोळे मीट

पटापटा लपा लपा
शोधेन मी बाळ माझा

इथे नाही तिथे नाही
कुठे गेला बाई बाई

थकले मी शोधताना
कुठे गेला माझा कान्हा

हळुहळु पावलांनी
बाळ येई तो मागुनी

रेशमाचे मऊ हात
गळा गुंफितात गोफ

मांडीवरी बसे कान्हा
मैया मैया म्हणे पुन्हा

अवखळ कान्हा पाही
पूर यमुनेला येई

शब्दखुणा: 

श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2013 - 06:15

श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

एकंदरीत तुकोबांचे सगळे जीवनच आगळे-वेगळे. त्यांचे गाथेमधील अभंग जर कोणी वाचायला घेतले तर लक्षात येते की त्यांचे अवघे मनच जणू त्यांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडले आहे - आणि ते ही कुठलाच अभिनिवेश न बाळगता - सरळ नि थेट....

वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....

कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....

कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...

राधा - वेणू

Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2013 - 01:33

राधा - वेणू

कालिंदी जळ झुळझुळ झुळझुळ
मुरलीरव तो सुस्वर मंजुळ
अशा अवेळी या डोहावर
कोण निघाली इतुकी झरझर

वस्त्र उतरले खांद्यावरचे
नयनींचे ओघळले काजळ
गालावरती सुकलेले ते
किती काळचे अश्रू निश्चळ

काठावर नसताना कोणी
अंतरात का भासचि केवळ
मिटता डोळे पुन्हा उमटला
बासुरी स्वर तो मंजुळ मंजुळ

मिटूनी डोळे बैसे राधा
अंतरात ती मूर्ति सावळ
कान्हा नसता पावा कुठुनी
जमले बघण्या अवघे गोकुळ

शब्दखुणा: 

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

Submitted by अविनाश१ on 8 March, 2013 - 04:42

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

Submitted by अविनाश१ on 8 March, 2013 - 04:42

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

नस्ती विवंचना !!

Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2013 - 03:50

नस्ती विवंचना !!

कवितेत त्यांच्या नेहेमीच वसंत मस्त फुललेला
मला सतत काट्यांचा घोर का लागलेला ??

असतात तिथे फुलबागा छान छान सजलेल्या
दिस्तात मला झोपडपट्ट्या घाणीने भरलेल्या !!

उंची कपडे, बंगले-गाड्या, बीचवरती संध्याकाळ...
सिग्नलपाशी चेहरा कुट्ट हावभरला सदाकाळ !!

जगात त्यांच्या एकूणएक मस्तीतच गुरफटलेला
मीच एक करंटा नस्त्या विवंचनेत पडलेला .....

Pages

Subscribe to RSS - भाषा