भाषा

म्मं म्मं, म्मं म्मं

Submitted by पुरंदरे शशांक on 22 February, 2013 - 23:32

म्मं म्मं, म्मं म्मं

वरण-भाताची शिट्टी झाली
बाळाची कळी खुलली खुलली

फोडणी खमंग तडतडली
आणा आणा सोनूची ताटली

आमटी-भात तुपाची धार
मधून आंबट टमाटु सार

चिऊचे घास काऊचे घास
म्मं म्मं होईल खासम खास

पापा थोडा घुटुक घुटुक
चूळ भरा खुळुक खुळुक

एक येता ढेकर मस्त
ढाराढुर्र गुडुप सुस्त....

hugry.JPG

शब्दखुणा: 

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस

Submitted by पिशी अबोली on 21 February, 2013 - 12:44

आज युनेस्कोने जाहीर केलेला 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस'. बांगलादेशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

विषय: 
शब्दखुणा: 

आमचें गोंय - भाग ११- कोंकणी भाषा: इतिहास आणि आज

Submitted by टीम गोवा on 17 February, 2013 - 23:49

सदिच्छा ..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 06:22

सदिच्छा ..

असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||

लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||

मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||

स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||

असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||

हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||

शब्दखुणा: 

मराठी भाषा दिवस २०१३ - लहान मुलांसाठी कार्यक्रम - सा. न. वि. वि.

Submitted by संयोजक on 13 February, 2013 - 02:26

sa_na__vi__vi.jpg

पत्र! दोनच शब्द, आठवणींच्या झुल्यावर नेऊन बसवणारे. पण आजच्या ईमेल आणि मोबाईलच्या जमान्यात पत्रलेखन मागेच पडले आहे. आपण लहान असताना पत्र लिहायची 'पद्धत' होती आणि त्या पद्धतीतही तिची तिची एक गंमत होती. त्याच गंमतीचा अनुभव आपण आपल्या मुलांनाही देऊया का?

'मराठी भाषा दिवस, २०१३'च्या निमित्ताने आजीआजोबा आणि त्यांच्या प्रिय नातवंडांमध्ये बांधूया एक गोड पूल.. आपल्या पाल्यांना त्यांच्या आजी-आजोबांना पत्र लिहायचे आहे, कोणत्याही विषयावर, कितीही लांबलचक..

या उपक्रमाचे काही नियम :

आमुची माय मराठी

Submitted by यःकश्चित on 6 February, 2013 - 08:57

आमुची माय मराठी

================================

हलकीच आलेली श्रावणाची सर
गुलाबी पहाटेचे जसे धुके धुसर
महाराष्ट्राला पडलेले स्वप्न निळसर
मायमराठी ममत्वाचा स्पर्श ओलसर...!

सह्याद्रीच्या कुशीमध्ये जिचे जन्मस्थान
गडावरच्या तोफा जश्या उंचावूनी मान
कोकणच्या बागेतील हिरवे नारळाचे पान
कोकीळकंठातील एक स्वप्नसुरेल तान...!

तुतारीची तान जशी वाजे दशदिशा
जगी राज्य करण्या असे अभिलाषा
महाराष्ट्राची शान असे मराठी भाषा
सर्वांहुनी महान असे मराठी भाषा.....!!!

- यःकश्चित

शब्दखुणा: 

ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

२०१२ च्या उपक्रमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेखः http://diwali.upakram.org/node/191

ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण

'मराठीमध्ये काही राम राहिलेला नाही' असे बरेचदा ऐकायला मिळते. मराठीचा प्रसार व्हायला हवा, मराठी जिवंत रहायला हवी वगैरे पण. हा जीव वेगवेगळे लोक मराठीत वेगवेगळ्या प्रकारे ओतू पाहतात. मराठी बाण्याची गरज का आहे, याबद्दल मतभेद आहेत. पण ती गरज आहे यावर मराठी न वापरणार्‍या लोकांचे सोडून इतरांचे एकमत आहे. आमच्या मते, मराठीकडे होतकरूंना आकर्षित करण्याकरता कसरती वापरायला हव्या (अर्थात शाब्दिक). शब्दखेळच नव्हे तर आवश्यकता भासल्यास (आणि ती आहेच) शब्दच्छलही योजावा.

विषय: 
प्रकार: 

विनोदी कथा सादरीकरण

Submitted by बेफ़िकीर on 1 February, 2013 - 01:15

मॉडर्न कॉलेज मराठी विभाग आयोजीत व पुणे विद्यापीठ पुरस्कृत:

मराठी विनोदी कथा: स्वरूप आणि सादरीकरण

या राज्यस्तरीय चर्चासत्रात, मंगळवार दिनांक ५ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी २.३० ते ४.०० या दरम्यान निवडक विनोदी कथांचे मुक्त सादरीकरण हा कार्यक्रम आहे.

वक्ते:

स्वाती महाळंक
भूषण कटककर
वैशाली मोहिते व इतर

स्थळ - मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

(हे चर्चासत्र दिनांक चार व पाच असे दोन दिवस असून यात विनोदी कथांचे स्वरूप, विनोदी कथांचे लेखन, रंगमंचीय सादरीकरण हेही उपक्रम समाविष्ट आहेत)

रस असल्यास व शक्य असल्यास जरूर यावे.

संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++

Pages

Subscribe to RSS - भाषा