भाषा

देशभक्त

Submitted by सखा on 6 October, 2013 - 03:00

सर्वत्र कचरा
दोष दुसऱ्याचा
दोष कचऱ्याचा
हमखास

खावे नि थुंकावे
जोरात बोलावे
जणू कि भांडावे
सार्वत्रिक

सिग्नल तोडावे
हॉर्न वाजवावे
शत्रू समजावे
इतरास

मधेच घुसाकी
रांग हि कुणाची?
आपुल्या बापाची
समजावी

निवडून द्यावे
गुन्हेगार नेते
भुरटे चोरटे
बिनधास्त

देशभक्त मीच
बाकी सारे नीच
अंतरी सदाच
भाव हाच

-सत्यजित खारकर

विषय: 

राधा प्यारी..

Submitted by रमा. on 1 October, 2013 - 06:03

राधा प्यारी..

कान्हाच्या या अनेक गोपी
तरी वाटते राधा प्यारी
प्रेम सखी ती, प्राण सखी ती
राधा, राधा, राधा न्यारी

रंग रंगतो, खेळ खेळतो
राधेला या छेड छेडतो
रंगुनी साऱ्या क्रीडांमधूनी
परी असे ही श्वेत बावरी

राधेने त्या चंग बांधला
छळतो मजला श्याम सावळा
पाहतेच मी कसा राहतो
माझ्याविन तो गोपमुरारी

राधेवाचून कसल्या क्रीडा
कसले गोकूळ, मनभर पीडा
करमेना जीव कृष्णाचा हा
राधेचाही प्राण उरावरी

शब्दखुणा: 

जय मराठी!

Submitted by सखा on 25 September, 2013 - 19:07

मराठी मधुर भव्या
चतुर सतेज दिव्यां

सरस अती सुकाव्या
मनोरम सरस श्रव्या

सरस लय छंद वृत्त
सुप्रसन्न बहुत चित्त

सगुणा सतप्रेम रूपा
सरस्वती नीज कृपा

वीरांगना चंडिका
थोर मराठी भाषा

-सत्यजित खारकर

विषय: 

बाळ उभा र्‍हायला .....

Submitted by पुरंदरे शशांक on 25 September, 2013 - 00:30

बाळ उभा र्‍हायला .....

उभा उभा र्‍हाय र्‍हाय
आधाराला काय काय

टाका टाका एकेक पाय
मज्जा मज्जा येते काय

डुगु डुगु चाले कसा
छान छोटा बदकु जसा

पडे कसा बुदकन
हसु येई खुदकन

साहित्य आणि कलाकृती पाठवण्याविषयी सूचना आणि नियम

Submitted by संपादक on 23 September, 2013 - 02:27

हितगुज दिवाळी अंक २०१३

bullet 2_0.jpgलेखन पाठवण्यासाठी सूचना आणि नियमbullet 2_0.jpg

१. आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा.

२. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य दिलेल्या तारखेला पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारा वाजेपर्यंत संपादक मंडळाकडे पोहोचायला हवे.

कृपया नोंद घ्या:

शेमलेस लव्ह बर्डस

Submitted by सखा on 16 September, 2013 - 22:36

पाडगावकरांची "प्रेम म्हणजे प्रेम असतं"
कविता आमचे सर अगदी
तल्लीन होवून शिकवतात.

तुमचं अन आमचं सेSSम असतं
म्हणताना "ते" दिवस आठवून सरजी
कधी भावूक तर कधी लाले लाल होतात

लेकांनो अर्धं अर्धं चोकोलेट खाल्लं आहे का कधी?
पावसात सोबतीने भिजला आहेत का कधी?
अरे तुमच्या पिढीला बुडलेली होडी कळणार कशी?
लाटां वर बेभान होवून नाचणं शिका आधी

मायबोली गणेशोत्सव २०१३ -उपक्रम - बाप्पाला पत्र - प्रवेशिका - १५ (mrsbarve)

Submitted by संयोजक on 16 September, 2013 - 03:40

मायबोली आयडी: mrsbarve
पाल्ल्याचे नाव : सानिका (वय १० वर्षे)

mrs barve letter.png

मायबोलीच्या या उपक्रमामुळे सानिकाचा मराठी लिहिण्याचा थोडा सराव झाला. मसुदा तिचाच आहे .मागच्याच महिन्यात आठ दिवसात मराठी लिहू वाचू शिकली आहे.थोडे वाचते आणि लिहिण्याचा आता सराव करेल.बाप्पाला पत्र लिहिताना तिला खूप मजा आली.

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १४ (संदीप घोणे)

Submitted by संयोजक on 15 September, 2013 - 01:50

मायबोली आयडी - संदीप घोणे
पाल्याचे नाव - तन्मय घोणे
वय - १० वर्षे

ghone.png

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १३ (गायत्री१३)

Submitted by संयोजक on 14 September, 2013 - 23:12

आयडी: गायत्री१३
पाल्याचे नाव: श्रिया
वयः ७ वर्षे

gayatree13.JPGgayatree13l.JPG

श्रियाच्या शाळेत मराठी लिहायला शिकवायला याच वर्षी सुरुवात झाली आहे. तिला अजून सगळी मुळक्षरे लिहिता येत नाहीत. तसेच, बाराखडी/जोडाक्षरे इ. ची तोंडओळख होती पण लिहिता येत नव्हतं. मायबोलीच्या या उपक्रमामुळे तिला खूपच मराठी लिहिता यायला लागलं. संयोजकांना मनापासून धन्यवाद

सर्व छोट्यांच्या पत्रांना - बाप्पांकडून एक खास उत्तर -

Submitted by पुरंदरे शशांक on 13 September, 2013 - 01:44

बाप्पांकडून एक खास पत्र -

त्याच्या सार्‍या लाडक्या छोट्या दोस्तांना -

बाप्पांना सगळ्या छोट्यांनी लिहिलेली पत्रे फार फार आवडली. मग ते उंदीरमामाला काय म्हणाले -

गोड गोड ही पिल्ले सगळी
लिहिती झाली कशी पहा
गोड गोड पत्रातील गोष्टी
ऐक जरा उंदीरमामा

चला उठा हो मामा तुम्ही
झटकन व्हा तय्यार कसे
जाऊ घराघरामधुनि अन्
पत्र वाचुया सुंदरसे

जगामधील प्रश्नांची सार्‍या
उकल हवी रे "अवनीश"ला
एक गोडुली हाका मारे
किती मस्त वाटे "गणुल्या"

"ऋचा" विचारी कसा असशी रे
भातुकली ती देऊ तिला
आवडते का चिज मूषका

Pages

Subscribe to RSS - भाषा