भाषा

श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४

Submitted by पुरंदरे शशांक on 30 November, 2013 - 11:12

श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४

तत्वज्ञ म्हणून माऊली एखादा विषय कसा सुरेख दृष्टांत, उपमा, उदाहरणे देऊन सांगतात ते पाहूया..

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ||४७-अ. १८||

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ -गीताई॥

अगा आपुला हा स्वधर्मु| आचरणीं जरी विषमु|
तरी पाहावा तो परिणामु| फळेल जेणें ||९२३|| ...... (विषम = कठीण, अवघड, परिणाम=शेवटी)
अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरुपी मोठे फळ प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे.

माकडाची मज्जा

Submitted by पुरंदरे शशांक on 29 November, 2013 - 00:24

माकडाची मज्जा

माकडभाऊ हूप हूप हूप
झाडावर बसले जाऊन चुप

बघायला जमली गर्दी खूप
मुले ओरडली शेपटीला तूप

वेफर्स वाजता कुर कुर कुर
उतरले खाली सुर सुर सुर

वेफर्स घेतले हातातून ओढून
ठेवले गालात नीट दडवून

पहातात नीट निरखून निरखून
ठेवलाय का खाऊ कोणी लपवून

गंमत एक झाली अशी
फुटला फुगा फटदिशी

आवाज ऐकून मोठासा
घेतला झाडाचा आडोसा

फुटता फुगे फटाफाट
पळाले भाऊ धूम चकाट

मुले ओरडली थांबा ओ.. भाऊ
अजून थोडे वेफर्स देऊ ????

शब्दखुणा: 

तोतो तोतो करु या छान ......

Submitted by पुरंदरे शशांक on 28 November, 2013 - 04:03

तोतो तोतो करु या छान ......

चला चला लौकर तो तो करु
छान छान काजळ-तिटी लाऊ

रडायचं नाही बरं का गं बये
उग्गाच हसून दाखवते काये

डोळे मिटा पट पट पट
साबण लाऊ चट चट चट

नको गं रडू सोनू-बाळा
तो बघ गेला उडाला काव्ळा

आटपा लवकर जायचंय ना भूर्र....
किती बै चाल्लीये हिची कुर्कुर

"अगं ए बये चल लौकर
किती हा खेळ सार्‍या घरभर
स्कूलबस येईल इतक्यात बघ
वाजेल हॉर्न पँ पँ मग....
सोड त्या बाहुलीला ठेव खाली
तोतोचा खेळ खेळा संध्याकाळी..."

खास मुलांसाठीचे उपक्रम

Submitted by मी नताशा on 25 November, 2013 - 00:09

हल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३

Submitted by पुरंदरे शशांक on 24 November, 2013 - 22:09

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३

मागील भागात आपण पाहिले की श्री ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. म्हणजेच इथे वाचकाच्या ह्रदयात सद्भाव असणे खूप गरजेचे आहे. भावपूर्ण, हळुवार अंतःकरणानेच हा ग्रंथ वाचावा, नव्हे तो अनुभवावा असे स्वतः माऊलींनीच सांगितले आहे.

आता माऊली किती रसिकतेने काय काय लिहितात ते पाहू ..... अध्याय पहिला - महाभारतकार व्यासांचे गुणगौरव माऊली करताहेत -

नाना कथारूपें भारती| प्रकटली असे त्रिजगतीं|
आविष्करोनि महामतीं| व्यासाचिये ||३२|| ...................(भारती = महाभारत)

म्हणौनि हा काव्यांरावो| ग्रंथ गुरुवतीचा ठावो|

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

Submitted by पुरंदरे शशांक on 18 November, 2013 - 02:26

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत

स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष न मावे
म्हणूनि वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे

अशा अतिशय सार्थ शब्दात पांवसच्या स्वामी स्वरुपानंदांनी माऊलींचे सुरेख वर्णन केले आहे. माऊली हे योग्यांचे योगी, विरक्त, तत्वज्ञ, संतश्रेष्ठ, गुरुंचे गुरु, सत्कविवर इतकेच काय प्रत्यक्ष भगवंतच....

अशा या अतिशय पवित्र माऊलींचे स्मरण करायचे ते ज्ञानेश्वरी वाचून, ज्ञानेश्वरी अभ्यासून .....

मटणकरी

Submitted by सखा on 14 November, 2013 - 11:41

एक कोंबडी तुरु-तुरु
निघाली नखऱ्यात
गॉगल घालून म्हणे
दुनिया गेली खुराड्यात

बघतेच कोण करतं
माझी चिकनकरी
टाळक्यात अंडी फोडीन
लावून हात पहा तरी

पाहून कोंबडीचा आवेश
एक मेंढी जागीच थिजली
हार्टफेल होवून खटाक मेली
मटणकरीत रुपांतरीत झाली

-सत्यजित खारकर

विषय: 

तीर्थ क्षेत्र

Submitted by पुरंदरे शशांक on 10 November, 2013 - 22:02

तीर्थ क्षेत्र

सद्गुरु दाविती | मार्ग तो नेमका | नेतसे जो निका | मोक्षालागी ||

करिता सत्कर्मे | टाकूनि अहंता | गोडी ती चाखिता | सगुणाची ||

द्वेष मत्सरादि | जातसे जळून | येतसे भरुन | सद्भावना ||

मनाचा आरिसा | होताचि निर्मळ | प्रगटे तत्काळ | आत्मबिंब ||

प्रकाशात त्याच्या | उजळे जीवन | कृतार्थ पावन | पुण्यरुप ||

तीर्थ क्षेत्र ऐसे | सहज लाभता | धावाधाव वृथा | सांडावी गा ||

व्हावे आपणचि | पावन ऐसेच | कळो आले साच | गुरुकृपे ||

शब्दखुणा: 

spanish शिकायचे आहे ???

Submitted by गुलमोहोर on 6 November, 2013 - 14:53

नमस्कार, मला spanish शिकायचे आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी. खूप सारे websites वाचून काढले. सुरुवात कशी करावी grammar की pronunciation कळत नाही आहे. मी या आधी foreign language शिकले नाही आहे. ३-४ महिने सध्या आराम आहे म्हणून वेळ घालवण्यासाठी शिकायचे आहे आत्तातरी. जे कोणी लंडन based आहे त्यांनी मार्गदर्शन करावे?? आधी कोणी foreign language शिकताना कसे step -wise approach केले, मार्गदर्शन करावे.

विषय: 

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

Submitted by निमिष_सोनार on 29 October, 2013 - 03:55

आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

बरेचदा आपल्याला दोन प्रश्न भेडसावत असतात.
म्हणजे खाली दिलेल्या या दोन प्रश्नांबाबत आपण "विचार" करतो:
लोक काय विचार करतील?
लोक काय म्हणतील?

मला असे वाटते की लोक काय विचार करतील याचा विचारही आपणच केला तर लोकांना विचार करायला काहीही उरणार नाही आणि आपल्याला काय विचार करायचा आहे तेच मात्र राहून जाईल आणि त्यामुळे आपण मात्र लोकांच्या विचारपद्धतीचे गुलाम होवून जाऊ.

लोकांना त्यांच्या पद्धतीने विचार करू द्या.
आपण आपल्या पद्धतीने विचार करा.

Pages

Subscribe to RSS - भाषा