भाषा

चला, ओळखा...

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2014 - 22:08

चला, ओळखा...

चला चला चला
लौकर ओळखा
खेळ गमतीचा
किती अनोखा

चला चला चला
डोळे मिटा जरा
आणि आता असे
हात पुढे करा

डोळे किलकिले
करायचे नाही
फटीतून त्यांच्या
मुळी पहायचे नाही

हातावर आहे
खाऊ मऊ मऊ ?
का कडक आहे जरा
ओळखा ओळखा भाऊ ?

ओळखा ओळखा पाहू
कसा आहे खाऊ
नाकाला विचारा
सांग जरा भाऊ

गोड का खमंग
सांग की रे वेड्या
नाकपुड्या कशा
मारतात उड्या

डोळे मिटून अशी
गंमत तरी करु
दम्ला नाकदादा
विचार कर करु

जाऊ द्या त्याला
जीभेलाच धरु
येईल का सांगता
तिला विचारु

आंबट नि चिंबट
येता जीभेवर
अंग थरथरे
पार आतवर

जीभ मारी मिटक्या
चुटुक चुटुक
हे तर आपले

शब्दखुणा: 

चाल चाल बाळा ....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2014 - 01:22

चाल चाल बाळा ....

चला चला चला
पाय टाका जरा
सोनु मोठी राणी (सोनु मोठा राजा)
काय तिचा तोरा (काय त्याचा तोरा) Happy

पाऊल एकेक
उचला अस्सेच
थोडे थोडे पुढे
टाका हलकेच

डुगडुगु डुगडुगु
होतीये गाडी
जरा गडबडे
मागे पुढे थोडी

कशी आता झाली
हळुहळु चाली
मजा किती किती
द्या बै टाळी....

शब्दखुणा: 

चिम्णुताई चिम्णुताई

Submitted by पुरंदरे शशांक on 12 January, 2014 - 00:46

चिम्णुताई चिम्णुताई
कुठेच कशा दिसत नाही ?
चिवचिव चिवचिव गोडशी
कानावरती येत नाही ??

या लवकर इकडे बाई
घर देईन मेणाचे
पाऊस येता जोराचा
गळ्णार नाही एवढुस्से

कंटाळलात भाताला ?
खाऊ देईन छानसा
टिपता येईल चिव्चिवताना
शेवचकली खमंगसा

ये जरा लवकर बाई
तुझ्याशिवाय करमत नाही
अंगणात जाऊन बस्लं तरी
बाळ आमचं जेवत नाही

चिवचिव चिवचिव ऐकल्यावर
बाळ धावेल अंगणभर
म्ममं म्ममं होईल मग
ही अशी भराभर .......

माय-लेकी ....

Submitted by पुरंदरे शशांक on 7 January, 2014 - 06:02

माय-लेकी ....

भातुकली भातुकली अस्ते काय ??
चूल बोळकी अजून काय काय ??

गंम्मत तुझ्या लहान्पणाची
सांग ना आई, जरा जराशी ...

बार्बीसारखी अस्ते का ठकी ?
खेळत होता आणि कोणाशी ?

डोळे पुस्तेस का गं बाई ?
आठव्ली का तुलाही आई ?

ये माझ्या मांडीवर टेक जराशी
म्हणेन मी अंगाई येईल तश्शी ....

"आहेस माझी गुणाची खरी
झालीये माझीच आई आजतरी.."

शब्दखुणा: 

समस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 7 January, 2014 - 05:27

समस्या आणि उपाय

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात. या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.

भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणूका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.

    माकडगाणे ........

    Submitted by पुरंदरे शशांक on 31 December, 2013 - 06:10

    माकडगाणे ........

    माकड होते झाडावर
    उड्या मारी भराभर

    इकडून तिकडून फांदीवर
    कधी खाली कधी वर

    शेपूट राही वरचेवर
    कधी सोडी सैलसर

    गिरकी घेते हातावर
    थांबत नाही क्षणभर

    खाऊ दिसता जमिनीवर
    खाली येते सरसरसर

    खाऊ घेऊन मूठभर
    भरभर जाते झाडावर

    जाऊन बसते फांदीवर
    दात विचकते वरचेवर

    केस किती ते अंगभर
    खाजवते खरखरखर

    सरसर सरसर झाडावर
    माकड फिरते भरभरभर ......

    index.jpg

    माझी काही स्वप्ने -१

    Submitted by विजय देशमुख on 30 December, 2013 - 22:05

    प्रत्येकाला स्वप्ने पडतात. त्यात त्याला फारसं काहीच करावं लागत नाही. त्याबद्दल आधी एका धाग्यात http://www.maayboli.com/node/44262 लिहिलं होतं.

    पण जी स्वप्ने जागेपणी बघितल्या जातात, मग ती पूर्ण करणे स्वतःच्या हातात असो किंवा दुसर्‍याच्या, त्या स्वप्नांना एक विशेष अर्थही असतो, असं मला वाटतं. त्यातलीच काही स्वप्ने. कधी ती अचानक कोणीतरी पुर्ण करतो, तर काही अजुनही अधुरीच.

    उमा कुलकर्णी यांचं व्याख्यान

    Submitted by ललिता-प्रीति on 30 December, 2013 - 02:19

    वर्तमानपत्राच्या पुरवणीच्या एखाद्या पानावर कोपर्‍यात स्थानिक कार्यक्रमांची माहिती देणारी यादी बर्‍याचदा येते. ती वाचून त्यातल्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी शिवून गेला, तरी मनाला बरं वाटतं. प्रत्यक्षात तसं फार क्वचित घडतं, हे देखील तितकंच खरं. त्याच यादीत गेल्या शुक्रवारी ‘लेखक-वाचक थेट भेट. उमा कुलकर्णी यांचे व्याख्यान’ या मथळ्यावर माझी नजर पडली. मथळ्यामुळेच खालचा मजकूर लक्षपूर्वक वाचला गेला. कार्यक्रम दुसर्‍या दिवशी संध्याकाळी होता. ठाण्यातच होता. वेळही जमण्यासारखी होती.

    श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....

    Submitted by पुरंदरे शशांक on 25 December, 2013 - 02:31

    श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....

    अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोगः

    ज्ञानेश्वरीत नवव्या अध्यायाला विशेष महत्व आहे. स्वतः माऊलींनीच त्याचे गुणगान गायले आहे. असे म्हणतात की जेव्हा माऊलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा नवव्या अध्याय म्हणत म्हणतच ते त्या पायर्‍या उतरत होते - इतका हा अध्याय त्यांच्या आवडीचा होता.

    दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला या नवव्या अध्यायाचे महात्म्य सांगणार्‍या या गोड ओव्या पहा -

    श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ६ - एक वेगळा पैलू.

    Submitted by पुरंदरे शशांक on 18 December, 2013 - 10:56

    श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ६ - एक वेगळा पैलू.

    श्री ज्ञानेश्वर महाराज हे नक्की होते तरी कोण ?
    योगी ? का भक्त ? का तत्वज्ञानी ? का कविश्रेष्ठ ? का विरक्त संत ? का ज्ञानराज ???

    माझ्यामते तर ते या सगळ्या गोष्टी मिळून तयार झालेले आणि या सगळ्या विशेषणांच्याही पलिकडले एक अद्भुत रसायन होते .....

    Pages

    Subscribe to RSS - भाषा