बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...

बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...

Submitted by पुरंदरे शशांक on 7 October, 2012 - 23:35

बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...

हत्तीचं पिल्लू गेलं नाचत नाचत बागेमधे
खेळत होती मुलं तिथे, खूप खूप मजेमधे

झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम पाहून
हे खेळू का ते खेळू, दमले विचार करुन

झोपाळ्यावर बसताच, आला की तो खाली
घसरगुंडी तर काय, पार पार सपाट झाली

सी-सॉवर ठेवताच पाय, फळी गेली मोडून
पिल्लू बिचारे रुसले, नि बसले कोपर्‍यात जाउन

मुलं म्हणाली सोड रे, लपाछपी मस्त खेळू
लप पटकन कुठे तरी आलाच तो बघ मागे बाळू

झाडामागे लपे आपले पिल्लू साधे भोळे
पुढुन दिस्ते सोंड, तर मागे आंग सग्ळे

पिल्लावर आले राज्य, मिटले त्याने डोळे
दोन मिण्टात शोधून सगळे भिडू बाद केले

Subscribe to RSS - बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...