मुक्तस्रोत(Open Source)

तडका - चव सत्य-असत्याची

Submitted by vishal maske on 7 July, 2015 - 10:33

चव सत्य-असत्याची

सत्य झाकु पहाणारांना कधी
असत्यही वाटत असतं गोडवं
अन् सत्याची बाजु घेणारांना
कधी सत्यही वाटु लागतं कडवं

सत्य-असत्याच्या सत्यापनाला
कधी वैचारिकतेचेही पेव असते
मात्र आप-आपल्या आवडीनुसार
सत्य-असत्याची चव असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - घोटाळ्यांच्या वेटोळ्यांत

Submitted by vishal maske on 6 July, 2015 - 23:27

घोटाळ्यांच्या वेटोळ्यांत

वाढत्या घोटाळी समस्यांचेही
आता घोटाळे येऊ लागतील
"घ रे घोटाळ्याचे" समजण्याचे
समज प्रचलित होऊ लागतील

प्रत्येक-प्रत्येक घोटाळ्यामुळे
विकासाची सीमा बारगळली जाते
अन् घोटाळ्यांच्या वेटोळ्यांमध्ये
सामान्य जनता होरपळली जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - इमानदारी

Submitted by vishal maske on 6 July, 2015 - 11:09

इमानदारी

बोगसबाजीच्या आधारानं
वाढत असतात गद्दार
कसा होईल सांगा इथे
इमानदारीचा उद्दार,...?

या गद्दारांच्या वागण्यातुन
नीयतीही तडकली आहे
अन् कित्तेकांची इमानदारी
बेइमानीतच अडकली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शिक्षण

Submitted by vishal maske on 5 July, 2015 - 23:30

शिक्षण

शाळा आणि कॉलेजकडून
संधीचा फायदा साधला जातो
अतिरिक्त शुल्काचा बोजा
विद्यार्थ्यांच्यावर लादला जातो

विद्यार्थ्यांचे भांडवल करणे
उपद्रवी लक्षण होऊ लागले
शिक्षणात बाजार करता-करता
बाजारात शिक्षण जाऊ लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - किसानी जगणं

Submitted by vishal maske on 5 July, 2015 - 11:31

किसानी जगणं

शेतातील पिकाचे अस्तित्व
अंतिम टप्प्यात गेले आहे
जगण्याची आस आहे पण
मरणाचे संकट आले आहे

पिकाकडं पाहण्यासाठी आता
मनात बळ ना उरलेलं आहे
अन् शेता-शेतातील अंकुरासह
किसानी जगणं हरलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विद्यार्थी

Submitted by vishal maske on 5 July, 2015 - 00:41

विद्यार्थी

दिवसें-दिवस शिक्षणातही
अमुलाग्र बदल होऊ लागले
शिक्षणाकडे जात असताना
शिक्षण दारात येऊ लागले

ओझे पेलताना दप्तराचे
जोमा-जोमाने नटू लागले
अन् दप्तराच्या भव्यतेपुढे
विद्यार्थी खुजे वाटू लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सेल्फी,...

Submitted by vishal maske on 4 July, 2015 - 11:08

सेल्फी,...

फॅशन म्हणा,व्यसन म्हणा
सेल्फीचा वापर वाढतो आहे
लहानांपासुन थोरांपर्यंतही
सेल्फी लोकप्रिय होतो आहे

जरी काढलेल्या सेल्फीमुळे
सेल्फी काढणारा खुश असतो
तरीही मात्र प्रत्येक सेल्फी
हा केवळ सेल्फीश असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गोडी शिक्षणाची,..

Submitted by vishal maske on 3 July, 2015 - 22:19

गोडी शिक्षणाची,...

आता शाळाबाह्य विद्यार्थ्यांचीही
शाळेत टोळी बसायला पाहिजे
मात्र शिक्षण घेण्यासाठी सुध्दा
मनी आवड असायला पाहिजे

आता शिक्षणाची महती इथे
घरा-घरात कळायला हवी
अन् शिक्षणाची गोडी सदैव
शिक्षणातुनच मिळायला हवी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पावसाळी उन्हाळा,...

Submitted by vishal maske on 3 July, 2015 - 11:13

पावसाळी उन्हाळा,...

पावसाळा असला तरीही
हा पावसाळा वाटत नाही
पावसाचा पडलेला खंड
आता मनाला पटत नाही

आता या नैसर्गिक विद्रोहाने
निसर्गाचीही अवकळा आहे
अन् पावसाळ्याच्या नावाने
हा पावसाळी उन्हाळा आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - योजना,...

Submitted by vishal maske on 2 July, 2015 - 23:20

योजना,...

नविन असो की जुनी असो
घोटाळ्यात अडकली जाते
लाभार्थ्यांपर्यंत येण्याआधीच
कधी योजना तडकली जाते

गरजुवंतांच्या गरजेसाठीच
कुणी योजना घेऊन येतात
पण लाभार्थी राहतात बाजुला
योजना दुसरेच खाऊन जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)