गणपती

Submitted by सुनिल परचुरे on 10 August, 2009 - 07:57

तुमचे दर्शन घेता अश्टविनायका
अंतरंगि मन सदा मारते तुम्हालाच हाका
तुमचि बाह्य रुपे भिन्नभिन्न
तरि अंतरंगि एकच व्रुत्ति
मानवाला सुजाण सकारात्मक
विचार देण्याचि प्रव्रुत्ति
अवतार घेताना तुम्हाला आवडले
मानवाचे शरिर
पण त्याच्या डोक्यावर तुमचा अविश्वास
म्हणुनच शांत अतिहुशार हत्तिच्या
डोक्यावर तुम्हि दाखवलास विश्वास
सुश्टाला हाताने आशिर्वादहि देता
दुश्टाला सोंडेने सणसणित झटकाहि देता
ह्य रुपगुणांमुळेच तुम्हि मला आपल्यातले-
आमच्यातले वाट्ता
आपल्या दोघातले अंतर वाढ्ले तर तो देव होतो
पण आपल्यात अंतरच नसल्याने माझ्या
रोमारोमात -श्वासात असल्याचे आश्वासता
मि - प्रत्येकाने आपल्यातल्या ह्या
विनायकाला जागवले तर
नक्किच माणसाच्या रुपातला गणेश
आपल्याला आशिर्वाद देइल.

गुलमोहर: