गुरुदक्षिणा

Submitted by सुनिल परचुरे on 10 August, 2009 - 06:56

गुरुदक्षिणा
“May I Come In ?”केबिनचे दार हळूच किलकिलत शब्द आले. डॉ. अनिल आता अगदी थकले होते. रात्रिचे ९.३० वाजत आले होते. आज सकाळपासून दोन ऑपरेशन्स झाली होती. परत संध्याकाळी पेशंटची कन्सल्टिंग रुममध्ये ही गर्दी. आता ह्या शेवटच्या पेशंटला तपासून तो निघणार होता.
` Yes - Come In` पेशंटला तपासतांना वळून तो म्हणाला, त्या बरोबर दार उघडून 45च्या आसपासची एक व्यक्ति आत आली.
`ओs s कदम सर ! आपण आणि या वेळी ? अहो या न आत या, तुम्हाला आत यायला परवानगी कशाला हवी सर ! बसा हं`,
`अरे हो - हो बसतो. मी आत येतांना विचार करत होतो की आता तु एवढा मोठा हार्टस्पेशॅलिस्ट झालास, म्हटले मला ओळखतो की नाहीस?` खुर्चीवर बसत सर म्हणाले.
`अहो तुम्हाला मी विसरु शकेन अस वाटल तरी कस ? पण सर दोन मिनिट थांबाल का ? ह्या एवढया पेशंटला तपासतो, मग आपण बोलु - चालेल ? तो पर्यत बाहेर बसून जरा थंडगार ध्यानं - अरे रमेश ह्यांना एक कोड्रींगची बाटली दे बघु`.
शाळेतला अनिल आता प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. अनिल परांजपे झाला होता.
`O.K.हे बघा कामत काही काळजी करु नका. ही मी औषध लिहून देतो ति आठवडाभर घ्या. मग नंतर याल तेव्हा आपण नक्की काय ते ठरवु. आता शांत व्हा कसलाही वेडावाकडा विचार मनात आणुच नका, ठीक आहे?` डॉ. अनिल म्हणाले.
पेशंट गेल्यावर रुममध्ये येणा-या कदम सरांना अनिलने हातानेच बसा म्हणून खुण केली.
`अहो इतक्या वर्षानी तुम्ही मला दिसताय, खरच मला मनापासून बर वाटल, आपली शाळा आता बरीच मोठी झाल्याचे ऐकले. आम्ही शाळेत होतो तेव्हा फक्त तळमजला होता, आता म्हणे दुमजली इमारत झाली आहे`, अनिलने विचारले.
`अरे हो - दिवसें दिवस ही इमारतही पुरेनाशी झाली आहे. पण बाकी काही म्हणा हं - काही काही वर्षांचया बँचेस लक्षात राहतात नां, त्यातलीच एक तुमची बॅच. त्यातला तु एवढा मोठा डॉक्टर झालास - नाव कमावलस` कदम सर म्हणाले.
`अहो - ही सगळी तुमची कृपा. सर माणसाच्या मनात काही श्रध्दास्थान असतात. त्यातलेच् एक तुम्ही आहात. आज जो काही मी ताठ मानेने वावरतोय त्याच श्रेय तुम्हालाही आहे. ते मोगरे सर - देशमुख सर - देशपांडे बाई - अजून सगळे आहेत नां शाळेत ?` अनिलने विचारले.
`अरे आम्ही शिक्षक माणस, कुठे दुसरीकडे जाणार ? `हसत हसत कदम सर म्हणाले` हं आता मी व्हॉइस प्रिन्सिपॉल झालो आहे. ठीक चाललय`,
`खरच पण त्यावेळी जे मनावर संस्कार झाले न त्याचा फार खोलवर परिणाम झालाय, त्याचे फायदे आता दिसतात. तेव्हा वाटायचे हे सर कडक आहेत. ते सर मारकुटे आहेत - सर तो आमच्या वर्गातला करण पाटील ज्याला तुम्ही ढ म्हणायचात तो आता अमेरीकेत इंजिनियर म्हणून गेलाय, खरच सर आता मागे वळुन पाहिल तर वाटते की शाळेतले दिवस किती छान होते, अनिल भडाभडा बोलत होता.
आणि शाळेत असतांना वाटायच - मोठ होण किती चांगल, अभ्यास नाही कि शाळा नाही, हसता हसता कदम सर खुर्चीत रेलले.
`हो हो अगदी खर आहे सर, अहो मी पण विसरलो. नुसता गप्पाच मारत बसलोय - तुम्हाला काय होतय सर - नाहीतर गप्पांच्या नादात माझा अजय होऊन जायचा.
अजय घेऊन जायचा म्हणजे ?
अहो सर तो आमच्या वर्गात अजय खडसे होता ना तो त्या दिवशी गंमत सांग होता, तो त्याच्या एका लग्नाच बोलावण करण्याकरता त्याच्या् 80 वर्षाच्या आजींकडे गेला. गेल्यावर त्या आजींनी त्यांच्या् दुखण्याचे - सुनेचे जे रडगाणे सुरु केले की तो त्यांच्या घरुन निघुन स्टेशनवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आल की आपण लग्नाच बोलावण करायलाच विसरलो, तस आता होऊ नये म्हणून ...., हसत हसत खुर्चीवरुन उठत अनिल म्हणाला.
अरे बस बस उठु नको, तुझ्याकडे माझे एक दुसरे काम होत. म्हणून मी मुद्दाम आलोय. कदर सर जरा सावरुन बसत म्हणाले.
मी चांगला धडधाकट आहे, तुम्ही मुलच मला म्हणायचा न की ह्या सरांना हृदय आहे की नाही ? काय ओरडतात सारखे. मग मला कसला येणार ऍटक आणि दुखण. मी मी तुझ्याकडे एका खाजगी कामासाठी आलो आहे - अं - बोलु ना ?`
अहो अस काय करता ? तुम्हाला मी कधी नाही म्हणेन कां ?
हे बघ अनिल अस ऐकल की असा एक हार्ट डिसिज आहे की ज्यात व्यक्तिला संसर्ग होईल म्हणून इतरांपासून दूर ठेवतात. त्या रोगाच नांव विसरलो.
हो सर आहे असा रोग, पण तो अगदी क्वचितच होतो. पण त्याचा तुमच्याशी का संबंध ?
हे बघ मला तुला एक विनंती करायची आहे, तुला ठाऊक नसेल, पण अतुल माझा मुलगा आता 10 वीला आहे. काय माझ नशिब आहे माहीत नाही पण एकच मुलगा आणि तो ही अगदी ढ, आतापर्यंत माझ्याच शाळेत होता म्हणून कसातरी इथपर्यंत आणला, तु एवढच काम कर मला एक सर्टिफिकेट फक्त लिहून दे की अतुलला तो रोग झालाय की ज्यामुळे त्याला इतर विद्यार्थ्यांपासून दुर ठेवावे लागेल. बाकीचे मी मॅनेज करीन, पण फक्त एवढे एक सर्टिफिकेट - सरांच्या चेह-यावर अजिजि होती.
एक क्षणभर अनिलला काहीच बोध होईना. कानात विचित्र आवाज ऐकु येऊ लागले. आपण काय ऐकतोय ह्यावरच त्याचा विश्वास बसत नव्हता.
`सर तुम्ही-तुम्ही - तुमच्या मुलासाठी -`
`हे बघ फ्लिज अंडरस्टँड मी - मी इथे व्हाईस प्रिंसीपॉल कदम म्हणून नाही तर एका ढ मुलाचा बाप म्हणुन आलोय. कदमांचा मुलगा नापास होणार ही कल्पनाच मला घाबरवुन सोडते. इतके वर्षे मी त्याला कसाबसा पुढे ढकलत होतो. पुढेही त्याला कुठेतरी टेक्निकल साईडला पाठवीन. पण हल्ली त्यासाठी सुध्दा कमीत कमी 10वी पास लागतो. म्हणून म्हणतो फ्लिज मला एवढे सर्टिफिकेट दिलेस तर माझ्यावर खुप उपकार होती - `दोन्ही हात जोडत कदम सर म्हणाले.
सरांचे प्रत्येक शब्द अनिलच्या कानात गोळीसारखे घुसत होते. त्याच्या प्रत्येक शब्दागणित त्याचा शाळेबद्दलचा, सरांबद्दलचा - संस्काराबद्दलचा अभिमान गळून पडत होता.
`सर तुम्ही तुमच्या स्टुडन्ट्कडून तरी अशि अपेक्षा बाळगायची नाही` -
`हे बघ अनिल - तु माझा विद्यार्थी म्हणून, उलट मी मोठया आशेने आलोय रे` -
`सर - असल सर्टिफिकीट मागण्यापेक्षा तुम्ही मला त्याची शिकवणी घ्यायला सांगितली असतीत तरी मी आनंदाने घेतली असती. नाही सर सॉरी - पण मी असल काही देऊ शकत नाही - गुरुनेच अशी गुरुदक्षिणा मागितल्यावर शिष्य काय देणार` - विमनस्कपणे खुर्चीत बसत अनिल म्हणाला.
`सरांच्या डोळ्यातुन पाणी वाहू लागले - हात जोडत ते म्हणाले
`अनिल खर सांगु - हे डोळ्यात पाणी आहे न त्यातले एका डोळ्यातले आनंदाचे आहेत की माझा शिष्य बावनकशी निघाल्याचे तर दुस-या डोळ्यातील अभागी मुलाच्या बापाच्या दुःखाचे - `कदम सर डोळे पुसतच कन्सल्टिंग रुम बाहेर पडले - अनिल दिगमुठ होऊन नुस्ता पहात राहिला.

गुलमोहर: