जिवंत ज्वालामुखी- कांगो-आफ्रिका

Submitted by नरेन on 9 August, 2009 - 09:15

माझा मोठा भाऊ आर्मी ऑफिसर आहे.त्याने कांगो- आफ्रिका येथुन हा फोटो मेल केलेला आहे. हा जगातील ज्वालामुखी सुमारे १०० वर्षा पासुन असाच (जिवंत) चालु आहे. म्हणुन आपल्या सर्वांसाठी -

Volcano_Congo.jpg

गुलमोहर: 

>>हा जगातील एकमेव ज्वालामुखी १०० वर्षा
अम्म्म..
जगात असे बरेच जिवंत ज्वालामुखी आहेत. इटलीमध्ये एटना (Mount Etna) पर्वतावरचा ज्वालामुखी ३००० (तीन हजार) वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत आहे. स्त्रोम्बोली (Stromboli) नावाचा दुसरा जिवंत ज्वालामुखी पण इटलीमध्येच आहे. व्हॅन्वाटू बेटावरचे (Vanautu) दोन ज्वालामुखी गेली ८०० वर्षांपासून जिवंत आहेत आणि त्यांचे सतत स्फोटही होत आहेत.
हवाई बेटावरचा किलावेया (Kilauea) ज्वालामुखी त्याच्या वाहत्या लाव्हासाठी (जो समुद्रात जाऊन मिळतो आणि सतत तिथल्या भूभागामध्ये भर घालतो) प्रसिद्ध आहे.
अजूनही बरेच आहेत. थोडा शोध घेतल्यास कळेलच. चित्रातला ज्वालामुखी हा काँगोमधला १८८२ पासून जिवंत असलेला निअरागाँगो नावाचा ज्वालामुखी आहे. २००२ मध्ये याच्या स्फोटामुळे जवळच्या शहरांतून ४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं होतं आणि बरेच लोक विषारी वायूंमुळे मेले होते.

क्ष आणि सर्वांना धन्यवाद,
विषेशतः अनुजींचे.
त्यांचे मार्गदर्शनाने मी हे चित्र टाकु शकलो.
आपल्या प्रतिक्रिया वाचुन आनंद वाटला.
मी भारतात आहे आणि भाऊ १ महिन्यापुर्वीच तेथे गेला. त्याला जी माहिती तिथल्या लोकांकडुन मिळाली ती त्याने मला दिली. म्हणुन कदाचित अस झाले असावे. आता मी ते दुरुस्त केल आहे. Happy