ठाऊक आहे मला.....

Submitted by nikhil_jv on 6 August, 2009 - 06:28

ठाऊक आहे मला.....
तुला आवडत नाही प्रेम
मग तू प्रेम नको करुस
विश्वास माझ्यावर ठेव

ठाऊक आहे मला.....
तू बोलत नाहीस जास्त
मग तू बोलु नकोस माझ्याशी
मला हवय तुझे हास्य

ठाऊक आहे मला.....
तुला दुखवायच नसते कुणा
पण वागु नकोस असे
जे लागेल माझ्या मना

ठाऊक आहे मला.....
तुला सर्वाची आहे तमा
मग सर्वाना खूश ठेवताना
नको लाथाडुस माझ्या प्रेमा

ठाऊक आहे मला.....
तू घरच्या विरोधात नाही जाणार
मग तू त्यांच्या सुखासाठी
कधी लग्नच नाही करणार?

गुलमोहर: