अट्टाहास

Submitted by vedangandhaa on 5 August, 2009 - 06:53

वैराण वाळव॑ट कापीत
अमुर्त ध्येया॑चा वेध घेत
काही॑च लागत नसताना हाती
मन उदास होते ,तरीही
जगन्याचा हा व्रुथा अट्टाहास...........
व्यवहारी जगात
जीवाची झालेली काहीली
रणरण उन्हाच्या वाफा
तहानेने व्याकुळ होउन
टाकलेल्या धापा...
शैशवचे निरागस स्वप्न
मावळलेले असतानही
जगन्याचा हा व्रुथा अट्टाहास...........
भावना॑ची कोमलता
ना अ॑तरत्म्याची एकत्मता..
आपणच ओढवलेले मरण
स्वहाताने रचलेले
सरण भवितव्याचे..
जगही करते या
वेडेपणाच उफास्...........तरीही
जगन्याचा हा व्रुथा अट्टाहास...........

राधा कुलकर्णी(वेदनग॑धा)

गुलमोहर: 

छान