अफगाणी काबूली पुलाव

Submitted by मनःस्विनी on 4 August, 2009 - 13:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी long grain सुवासिक बासमती तांदूळ,
earth balacne veg spread, (नाहीतर शुद्ध तूप) २ चमचे,
लांब पातळ किसलेले गाजर पाव वाटी,
सोनेरी रेसीन्स,
सफेद कांदा अगदी पातळ लांब चिरलेला.(सफेद कांदाच चांगला),
१ चमचा घट्ट दही,
१ चमचा पिस्ता काप लांब कापलेले,
१ चमचा सुखे जर्दाळू लांब कापलेले,

१ वाटी पेक्षा किंचित कमी चिकन ब्रॉथ/मटण ब्रॉथ/ वेज ब्रॉथ्.(नसेलच काही तर साधे गरम पाणी). भात अतिशाय मोकळा झाला पाहीजे.

अफगाणी पुलाव मसाला:
२-३ लहान सुके तेजपत्ता पाने,
२ मोठ्या सोललेल्या वेलचीचे आतले दाणे,
१ लांब पातळ दालचिनीची काडी(१ इंचाची काडी),
१-२ (ज्यास्त नको हां) लवंगा,
३-४ केसर काड्या,
१/४ चमचा जीरे,
पाव पेक्षा कमी शहाजीरे,(हे हवेच),
सफेद मिरीच(काळी मिरी नकोच) पाव चमचा,(मी नाही टाकत, तिखट लागते मला),
पाव चमच्यापेक्षा जरा कमी किसलेले जायफळ,
पाव पेक्षा कमीच सुके किसलेले आले(सुंठवडा )
सुकलेला थाईम १/४ चमचा नाहीतर सुकलेली लिंबूची सालीचा चुरा,(हे जरी नाही घातले तरी ठीक पण एक वेगळी चव लागते ती येणार नाही. फार काही नुकसान नाहीये) Happy
जायफळ, सुके किसलेले आले, लिंबू सालीचा चुरा भाजु नये. बाकी वरचे सर्व जिन्नस मस्त परतून घ्यायचे. एकदम बारीक वाटून चाळून घ्यायचे. करे पर्यन्त हवाबंद डब्यात ठेवायचे. हा मसाला मग pie वगैरेत वापरू शकता. नाहीतर पाया सूप, निहारी वगैरे.
बेसीकली अफगाणी लोक तिखट असे काहीच बनवत नाहीत. फक्त खूप फ्लेवर येणारे मसाले घालतात. त्यामुळे हा गरम मसाला सारखा बनणार व लागणार नाही ह्याची काळजी घेवून तसेच प्रमाण घ्यायचे. भात एकदम सुगंधी व मस्त लागतो ह्या मसाल्यामुळे. Happy

क्रमवार पाककृती: 

तांदूळ अर्धा तास भिजत घालून ठेवायचा. मग चाळणीत निथळून ठेवायचा. आता तूप/वेज स्प्रेड गरम करून आधी गाजर व रेसीन्स मस्त परतून पेपर टॉवेल वर निथळायचे. त्यातच कांदा अगदी रंग न बदलता परतायचा जो पर्यन्त translucent होत नाही. मग त्यात एक चिमटीभर साखर टाकायची.(मी नाही घालत). कांदा कॅरामलाय्ज होतो ह्यामुळे. मग ह्यात वरच्या मसाल्याचा एक चमचा टाकून मस्त तूपात परतून घ्यायचे. नुसता घमघमाट सुटतो ताज्या मसाल्याचा. मग भात ५ एक मिनीटे परतून घ्यायचा. तुटला नाही पाहीजे.
मग एक चमचा दही टाकून परतायचे. मग तो पर्यन्त उकळत असलेले पाणी/ब्रॉथ टाकायचे. आधी जरा उकळी येवु द्यायची १० मिनीटे खदखदा. मग चवीप्रमाणे मिठ वगैरे घालून (जर ब्रॉथ असेल तर मिठ चेक करा) झाकण लावून मंद गॅस करून शिजू द्यावा १० मिनीटे. झाल्यावर गाजर्,रेसीन्स्,पिस्ते वगैरे वगैरे टाकून सजवायचे. हुश्श... झाला तयार.
अफगाणी लोक हा भात चिकन तंदूरी, दही ह्याबरोबर खातात. बदाबदा दही खातात/पितात हे लोक चिकन्/मटणाच्या डिशेश बरोबर. Happy मला सुरुवातीला विचित्र वाटायचे. पण मी ही खाते आता घाबरत घाबरत. Happy
पण एकदम मस्त घरगूती दही असते घरी कोणी अफगाणीने बोलवले असेल तर. Happy

अधिक टिपा: 

१.भात मोकळा, दाणा न तुटता करायचा. काही लोक आणखी ब्रॉउन रंग यायला भात चाळणीत निथळत असताना परतायच्या आधीच मसाल लावून ठेवतात.
२.मसाला ताजाच छान लागतो.
३.काही लोक डोक्याला कटकट नको म्हणून रेडीमेड फक्त all spice घालतात. पण तो ब्रॉउन रंग व ऑथेंटीक चव येत नाही.
४.आणखी छान चव वेज,चिकन वा मटण ब्रोथ ने अ‍ॅड होते. पण काही नुस्कानी नाही घातले तर. Happy
५.तूप/बटर मात्र बदाबदा ओततात. तेव्हा तुम्ही जपून तूप ओता. दही असतेच ते अ‍ॅड करते तेव्हा तूप जपून. तुम्हाला आवडत असेल गुटगुटीतपणा स्वताचा तर खा. Happy

माहितीचा स्रोत: 
गेल्या वर्षी इदीला एका अफगाणी मैत्रीणीकडे खाल्ला. तसे मी भाताचे पदार्थ कमीच खाते(नाहीच खात) पण इतका खमंग वास आल्यावर एक एक चमचा करत वाटीभर खाल्ला. दुसर्‍या दिवशी सकाळ पर्यन्त भूक नाही लागली मला एवढा जड भात खाल्ल्यावर. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

वा अगदी जिग्स कालरा सार्खी पाकक्रुती दिली आहे डीटेल वारी. मी एक ड्च अवन विकत घेत्ले आहे ते या भाताला एकदम योग्य आहे. करून बघते. मसाला पन मस्त वाट्तो आहे.

छान आहे रेसिपी मनु.
निवांत वेळ मिळाला की करुन पाहणार. (तुला एक तास लागत असेल, मला कमीत कमी २ तास लागतील) Wink

अग पुर्ण रेसीपीला एक तास नाही. तांदूळ भिजत घालण्यापासूनचा तास लिहिला आहे. तेव्हा तांदूळ भिजेपर्यन्त तू कापाकापी करु शकतेस. Happy

आ. स्व. पु. बाफ मध्ये स्व. पु. बद्दलच्या लोकांच्या टिप्स परत एकदा रिव्हाइज करायला पाहिजेत. अभ्यास कमी पडतोय.
मी विचार केला होता तांदूळ भिजेपर्यंत टिव्ही पाहावा ;).

काल परत एकदा हा पुलाव केला. गेल्या वेळेस केलेला तेव्हा दही नव्हते, चिकन ब्रॉथ नव्हता. यावेळेला दोन्ही गोष्टी होत्या.

खरेतर दुसरा एक भाताचा प्रकार करायचे ठरवले होते पण लेकिने त्याला विरोध केला आणि अफगाणी भाताची फर्माईश केली. गेल्या वेळी केलेला तेव्हा तिला भारी आवडलेला हा प्रकार. यावेळची चवही तिला आवडली. सोबत चिकनची किंवा मटणाची घट्ट ग्रेवी केली तर अजुन मजा येते.