क्षेत्र

Submitted by कौतुक शिरोडकर on 4 August, 2009 - 09:33

एक थेंब दुसर्‍यास म्हणाला,"सांभाळून...
कालच वाफ सांगून गेलीय...
आपला नेम चुकतोय म्हणून.
लोक ठणाणा करताहेत.
नेमके तलावक्षेत्रातच आपण पडत नाही म्हणे.
तसा दुसरा म्हणाला,"सोड रे...
आपण कुठेही जरा जरी पडलो तरी तलाव होतोच.
त्यांना म्हणावं तुम्ही तुमची क्षेत्रे आणि
क्षेत्रफळे बदलून घ्या. कळलं ? आता येऊ मी ?

आम्ही आमच्या कविता कुठे टाकायच्या. कै च्या कै मध्ये तरी जागा असु दे आमच्यासाठी! Wink