मायबोलीचं नूतनीकरण पूर्ण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचं नूतनीकरण पूर्ण झालं आहे. हे फक्त अंतर्गत प्रणालीचं नूतनीकरण असल्याने सभासदांच्या नेहेमीच्या वापरावर (User experience) काही फरक होऊ नये.
नूतनीकरणाचा एक अगोदर लक्षात न आलेला परिणाम (side effect) म्हणजे तुमची विचारपूस आता सदस्यखात्यात गेली आहे. ती पूर्वीसारखी कशी दाखवता येईल यावर प्रयत्न चालू आहेत.

जर तुम्हाला काही बदल/अडचणी जाणवल्या तर त्या आम्हाला कळवा.

विषय: 
प्रकार: 

बदल चांगला आहे. आटोपशीर झालंय, पण विचारपूस पहिली माझे सदस्यत्वच्या खाली होती तेव्हा प्रतिसाद आलेला लगेच कळायचा. कोणतेही पान उघडले असेल तरी आपल्या विपुच्या पुढे कंसात आलेल्या आकड्यावरून आम्हाला लगेच समजायचे. आता त्यासाठी खात्यात जावे लागणार.

उजव्या हाताला आपल्या आयडी खाली नेहमीप्रमाणे 'माझी विचारपूस' आता ह्या पुढे न दिसता, माझ्या सदस्यत्वावर टिचकी मारल्यावरच दिसणार का?

ते 'नवीन लेखन' किंवा 'माझ्यासाठी नविन' किंवा 'मायबोलीवर नविन' पानावर बीबी च्या नावाखाली किती नविन पोस्ट्स आहेत ते दिसतं तिकडे आकडा आणि नविन यांत स्पेस दिसत नाही .. हे "18नवीन" असं दिसतं .. वाचायला त्रास होतो .. ते दुरुस्त करता येईल का?

नमस्कार,

वि.पु मधे प्रतिसाद दिला तर तो माझ्याच वि.पु मधे दिसतोय. ज्याना प्रतिसाद दिलाय त्यांच्या वि.पु. त दिसत नाहिये....????

अजुन एक... पुर्वी न वाचलेले/नविन पोस्ट इंडेक्स मधे त्या त्या धाग्याखाली बोल्ड दिसायचे (विरंगुळा, पाककृती इ. इ.). आता प्रत्येक धागा उघडावा लागतो त्याशिवाय काही नविन पोस्ट आलेत का हे कळत नाही. पुर्वीची सिस्टिम चांगली होती.

आहारशास्त्र आणि पाककला मधे पुर्वी नविन पाककृती पुढे 'नविन' असे लिहीलेले असायचे. आता नाही.

'हितगुज-विषयानुसार' चा इंडेक्स पण विस्कळीत वाटतो... शोधायला जरा अवघड आहे.

हा प्रॉब्लेम सर्वांनाच आहे की मलाच नीट दिसत नाहिये???

माफ करा, खुप तक्रारी झाल्या. मी तिकडे तुमच्या वि.पु. मधे पण लिहीलय.

आगाऊ (इन अ‍ॅडवान्स) धन्यवाद, देवनागरीतुन-इंग्रजी लिपीत लिहायच कस? वरती चौकोन दिसत नाहिये Sad

नूतनीकरणाचे दिसणारे परिणाम हे मुद्दाम केलेले नसून आमच्या नजरेतून सुटलेले परीणाम आहेत. ते पूर्ववत करण्याचे काम चालू आहे. जरूर इथे सांगा म्हणजे दुरुस्त्या करता येतील.
@Tillu
पाऊलखुणा मधे पूर्वीसारखे दोन भाग (लेखन+प्रतिक्रिया, फक्त लेखन) केले आहेत.

विपू मधे प्रतिसाद देताना केलेली सोय आवडली. पण एका ओळीतच प्रतिसाद देता येतोय. आणि तो प्रतिसाद दुसर्‍याच्या विपूत न जाता माझ्याच विपूत दिसतोय.

मला 'नवीन लेखन' पानावर पुढीलप्रमाणे चौकोन दिसत आहेत. हे फक्त काही शीर्षकांपुढेच दिसत आहेत -

screen_0.jpg

Your virtual face or picture साठी मी एक animated GIF file upload केली आहे. पुर्वी ती व्यवस्थित हलताना दिसायची, आता एक स्थिर प्रतिमा दिसते. असे का ?

हि नवीन विपू कशी चालते आता? नवीन कोणी पोस्ट केली विपूत तर कळणार कशी?
नवीन माबो जरा डोळ्याला वेगळी वाटतेय. Happy

'अजून वाचायचंय' मध्ये वाचून झालेले बाफही दिसत आहेत. आधी जर 'सिंहगड रोड' वर २ नवीन मेसेजेस असतील, तर ते वाचून झाल्यानंतर तो बाफ 'अजून..' मध्ये दिसायचा नाही. आता दिसत रहातो (उगाचच).
यामुळे 'अजून वाचायचंय' मध्ये मी सहभागी असलेल्या एकाही ग्रूपमध्ये नवीन मेसेज नसला, तरी भली मोठी यादी तेवढी दिसत रहाते. यात आधीसारखा बदल करता येईल का?

मलाही पूनमसारखचं दिसतय, अजुन वाचायचं मध्ये माझ्यासाठी नवीन मध्ये वाचून झालेले बाफही दिसत आहेत. ग्रुपमध्ये नविन आणि माझ्यासाठि नवीन हे दोन्ही सारखचं दिसतय.

हो विपु खरतर आधीसारखीच हवी होती..एकतर प्रतिसाद दिला तरी तो माझ्याच विपुत दिसतो...

आणि अजुन एक सिग्नेचर टाकताच येत नाहीये का? की आता टाकताच येणार नाही..?

अजुन सरावले नाही माबो च्या नविन रुपाला म्हणुन त्रास होत असावा

विचारपुस आलीये ते लवकर कळतच नाही. आधी मायबोली उघडल्याबरोबर कळायचे.
तसेच, सदस्यत्वाच्या पानावर व्यक्तिचे आवडीचे वाक्य आधी दिसते . मग त्या व्यक्तिच्या आवडीनिवडी,टोपणनांव आणि शेवटी नांव ! नांव खरे तर वर असायला हवे ना.
सिग्नेचर आता स्टोअर करता येणार नाही का ?
मी माझ्या सदस्यत्व मधे संपादन मधे जाऊन कांही बदल केला तर खाली टॅबवर 'प्रतिसाद द्या' असे दाखवते. जे आधी बहुधा 'बदल साठवा' असं होतं...त्या 'प्रतिसाद द्या' वर क्लिक केल्यावरही तेच पेज दिसत राहते!

प्रतिसाद देताना,'हेल्प' वर टिचकी मारल्यावर सगळी बाराखडी इंग्रजी मधुन कशी टाइप करावी याची सूची होती.आता ती दिसत नाही्. हा बदल पुर्वनियोजीत होता का?
मी मा.बो. वर नविन असल्यामुळे असेल कदाचित ,पण प्रतिसाद देताना खुप मदत मिळायची त्या सुची मुळे.
ती सोय परत करता येइल का?

१. काही पानांवर, 'प्रतिसाद द्या' व 'प्रतिसाद तपासा' ऐवजी 'Save' आणि 'Preview' दिसतेय. (गजाली)

२. 'प्रतिसाद द्या' व 'प्रतिसाद तपासा' यांचा क्रम चुकला आहे का? आधी 'प्रतिसाद तपासा' व नंतर 'प्रतिसाद द्या' हवे का?

३. प्रतिसाद न तपासता थेट संदेश पाठवल्यावर पटकन 'पोस्ट' होतेय. पण प्रतिसाद तपासा हा पर्याय निवडल्यावर पान हळू होतेय असे वाटले.

पाकृ वर गेल्यावर नवीन पाकृ दिसत नाहीत. कधीच्या आधीच्या जुन्या दिसतात ज्यांना रीस्पोन्स पण जुनाच आहे. indexing गेलेय का?

हा नवीन फॉन्ट पण खूप लहान वाटतो डोळ्याला. ऑफीसमध्ये चोरून वाचताना त्रास होतो. Happy

अ‍ॅड्मिन, अहो ती विचारपुशीची लिंक मुख्य पानावर दिसत नाहीये. विपुमध्ये कोणी कधी लिहिलं कळतच नाही... कृपया ती लिंक पुन्हा मुख्य पानावर आणावी.

स्माईली टाकायची सोप्पी सोय करा ना.....इथेच वर बोल्ड,इटॅलीक वगैरे मध्येच स्माईली टाकायची व्यवस्था करा प्लीज.

Pages