सांज भरल्या या वेळी,.....!

Submitted by suhas shinde on 1 August, 2009 - 15:16

सांज भरल्या या वेळी .....!!!!
सांज भरल्या या वेळी
मंद वारा माझ्या संगे
हलकेच खुणावती दुरून
अपुर्वेला ढगांची सोंगे
...........................सांज भरल्या या वेळी
किलबिलत पाखरांचे
उड़ते थवे आकाशी
मावळती चा सूर्य तारा
प्रतिबिम्ब ते आभाशी
...........................सांज भरल्या या वेळी

गार गार हवेत या
दर्वळलेले ताटवे
रात रानी च्या तरंगात
सुगंध तुझा आठवे
...........................सांज भरल्या या वेळी

सांज भरल्या या वेळी
भीती वाटते रात होताना
तू अशीच निघून जाते ..अन्
पाउल मागे वळताना.....सांज भरल्या या वेळी
...........................सांज भरल्या या वेळी

गुलमोहर: 

छान.