माझाही झब्बू.. To be or not to be..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मधे bsk चा लेख वाचत असताना मला माझ्या ब्लॉग वरच्या ह्या जून्या लेखाची आठवण झाली. मी STL हून परत जायच्या आधी १/२ महिने लिहिला होता... त्यामूळे एक झब्बू माझ्याकडूनही.... Happy

भारतात परत जाण्याबद्द्ल जेव्हा जेव्हा चर्चा चालू होतात तेव्हा दर वेळी भयंकर द्विधा मनस्थिती होते... माझ्या दोन मनांचं जणू डिबेट च चालू होतं.. हे दुसर मन वास्तविक फार शांत आणि passive आहे.. फक्त निर्णय घ्यायच्या वेळीच मुसंडी मारून वर येतं... मग तो निर्णय अगदी भारतात परत जाण्याइतका महत्त्वाचा असो की Burger King मधे खायचं का Tacobell मधे इतका trivial असो..
एक मन म्हणतं.. "कशाला जायचय परत ? इथे सगळं settled आहे.. घर चांगलं आहे.. मित्र मैत्रिणी आहेत.... रहा की गप्प पणे.. " पण मग दुसरं मन म्हणतं.. "भारतात काय गोष्टी settled नाहियेत ? तिथे तर ह्या पेक्षा मोठं घर आहे.. बाईक आहे.. गाडी आहे.. इथले नाही पण बाकीचे मित्र मैत्रिणी आहेतच की.."
मग पहिलं मन म्हणतं... "काम पण सुरळीत चाललय... चांगला role आहे.. जबाबदार्या आहेत... आजूबाजूचे लोक खूष आहेत.." दुसरं मन म्हणतं... "अरे जबाबदार्यांचं काय.. घ्यायची तयारी असली की त्या येतातच आपोआप...आणि करायची इछा असलेल्याला काम द्यायला लोकं तयारच असतात.."
पहिलं मन तरीही कामाचा विचार करतच राहातं.. "ह्या प्रोजेक्ट मधे सुरुवातीपासून असल्याने सगळंच माहिती आहे.... अगदी टिम पासून applications पर्यंत.." दुसरं मन म्हणतं " त्याने काय फरक पडतोय... आपल्या comfort झोन मधून कधितरी बाहेर पडायलाच पाहिजे... नाहितर challenges घ्यायची सवय हळूहळू बंद होते... मेंदू गंजेल तुझा अशाने..."
पहिलं मन तरी त्याचा हेका सोडत नाही... '"इथल्या टिम बरोबर चांगला रॅपो जमलाय... इथला बॉस तर मिटींग मधे म्हणाला पण की "as everything is well settled and there are no issues, we conveniently forget about your project" ... आणि team lead पण बोंबाबोंब करेल.." दुसरं मन हसून म्हणतं.. "ह्या अश्या स्तुतीने गुददुल्या होणं सहाजिक आहे... पण शेवटी ते मॅनेजर आहेत... प्रोजेक्ट टिम मॅनेज करणं त्यांच काम आहे... चालत्या गाड्याला खिळ घालणं कोणाला आवडेल... तुझा एक Junior team member दुसर्या टिम मधे गेला तेव्हा तू नव्हती आदळ आपट केलीस?? पण त्याच्याशिवाय आज सगळं चालू आहेच ना? आणि इथली टिम काल पर्यंत दिपक ला requirements आणि issues पाठवत होती.. आज तुला पाठवत्ये.. उद्या आणखी कोणाला... whatz the big deal?"
पहिलं मन अचानक track बदलून personal गोष्टींकडे वळतं.. '"पण मला इथली life style आवडते... स्वत:चं काम वेळेवर करा आणि बाकीच्या वेळी enjoy करा... '" दुसरं मन म्हणतं '"हो?? मग दिवाळी/गणपतीत दिवस दिवस eskal आणि maharashtratimes वरच्या बातम्या वाचून आपली हौस का भगवतोस? ते सगळं miss नाही करतं.."
"अरे त्या वेळेला सुट्टी घेऊन जाऊन यायचं भारतात इव्हडं काय त्यात?"
दुसर्या मना कडे उत्तर तयारच असतं.. '"येणारी दिवाळी ही भारताबाहेरची चौथी दिवाळी असेल असं तू परवाच कोणाला तरी सांगत होतास... !!!!!"
पहिलं मन विचार करून म्हणतं.. "पण इथलं YMCA, week end ची potlucks, late night hang outs..हे सगळं भारतात कसं मिळणार ?"
दुसरं मन लगेच म्हणतं.. "YMCA तून परत आल्यावर स्वत:च्या स्वैपाक स्वत: करायला किती जिवावर येतं त्याचं काय? potluck झाल्यावर साफसफाई करण्यासाठी कामवाल्या बाई असत्या तर किती बरं झालं असतं असं वाटतं त्याचं काय? आणि late night hangouts बद्द्ल म्हणायचं तर भारतात असताना किती week ends ना रात्री लवकर घरी आला होतास? आणि घरी होणारे लाड, निरज निशांत बरोबर खेळणं, घरातली बाग एव्हडच काय पण पूण्याचं ऑफिस देखिल तू इथे miss करतोसच ना.. आणि एकदा settle झाल्यावर हे सगळं हळूहळू कमी होतच..."
"ते खरं आहे.. पण तिथल्या त्या मराठी मालिका, तेच ते जातिचं राजकारण, ऑफिस ला पोचायला लागणारा तास भर वेळ, काही काही अति irritating आणि तरीही सहन करावे लागणारे नातेवाईक, 'लोग क्या कहेंगे' चं pressure हे सगळं इथे नाहिये ना...."
ह्यावर मात्र दुसर्या मनाकडे काही उत्तर नसतं... ते confuse झाल्यचं बघून पहिलं मन आपले बालिश इमले बांधू लागतं...
"जर दोन्ही कडच्या चांगल्या गोष्टी घेऊन तिसरं वेगळंच जग निर्माण झालं तर.. म्हणजे मी सकाळी उठीन तेव्हा माझा southmoor मधल्या खोलीत असेन... म्हणजे खिडकी बाहेर दिसणारं lush green lawn, सुंदर झाडं.. माझं table, त्यावरची lampshade... आणि त्याच्या बाजूच्या अनेक perfumes च्या बाटल्या... मग मी जेव्हा आवरून बाहेर येईन तेव्हा आमच्या पूण्याच्या किचन टेबल वर असेन.. आई मला चहा आणि breakfast देईल.. आणि डब्बा सुद्धा....चहा पिताना मी बाबांकडून सकाळ काढून घेऊन त्यामधल्या पूणेरी बातम्या वाचेन आणि त्यांना मी निघेपर्यंत TOI वाचायला लावेन.. आज्जी ची पूजेची तयारी चालू असेल.. वहिनी ऑफिसच्या तयारीत खालीवर पळापळ करत असेल आणि दादा तिला त्रास देत असेल... नुकतेच उठलेले निरज निशांत तिथे बसून दूध पित असतील... निघताना मी निशांत ची काहितरी खोडी काढेन आणि मग तो मोठ्याने भोकाड पसरेल... Happy घरातून बाहेर पडून मी माझी Camry काढेन आणि I-55 वर drive करून १५ मिनिटात downtown मधे पोचेन... ऑफिस मधे माझा पूण्याचा ग्रुप असेल.. आणि lunch ला कॅंटिनमधे आम्ही खूप टवाळक्या करू... ऑफिस मधे मी आणि बाकीची लोकंही कामाच्या वेळी dedicatedly कामच करतिल आणि सगळे वेळेवर घरी जातिल... घरी येईन परत येईन तेव्हा सगळे नुकतेच परतलेले असतिल.. TV वर कोणतही cartoon किंवा मराठी मालिका चालू नसेल आणि आम्ही चहा पिताना एकत्र बसून गप्पा मारू... तेव्हा आम्ही फक्त आमच्याच घरातले सगळे जण असू.. कोणिही unwanted नातेवाईक हजर नसतिल किंवा त्यांचे फोन ही आलेले नसतिल... तितक्यात कौशिक आणि चंदनाचा फोन येईल मग आम्ही soouthmoor मधे थोडावेळ टेनिस किंवा बॅडमिंटन खेळू आणि नंतर YMCA त जाऊ... घरी येऊन मी shower घेईन तो पर्यंत गरम जेवण तयार असेल.. जेवणानंतर गौतम रश्मी किंवा विनोद चा फोन येईन आणि मग आम्ही stake n shake किंवा Denny's मधे जाऊन shake किंवा ice cream खाऊ... ते करताना ऑफिस मधल्या गॉसिप discuss करून खूSSप ह्सू आणि दंगा करू...
घरी येईपर्यंत आई, वहिनी आणि निशांत सोडून सगळे झोपलेले असतिल आणि बोबलकांदा निशांत मला "काका तू 'भोप्पा' नाही का अजून??" असं विचारेल.. Lol मग आई तिचं लिखाणं करत बसेल आणि मी तिथेच बसून laptop वर timepass करेन...
तोपर्यंत दुसरं मन भानावर येऊन म्हणतं.. "साहेब कल्पनांच्या भरार्या मारणं बंद करा आणि manager आणि senior project manager बरोबरच्या मिटींग च्या तयारीला लागा... जे होणार नाही त्याचा विचार करत बसून वेळ घालवण्यापेक्षा जे उद्या करायचं आहे त्याची तयारी करा.."
पहिलं मन सारे विचार झटकून कामाला लागतं आणि दुसरं मन आता काही काम न उरल्याने परत passive mode मधे निघून जातं.. "To be or not to be ? चा प्रश्ण शेवटी अनुत्तरितच रहातो... !

विषय: 
प्रकार: 

अडम, छान लिहिलं आहेस. मी वाचलं होतं तुझ्या ब्लॉगवर.. पण इथे नुसतेच झब्बू नाही टाकायचे, खास काहीतरी 'ओरीजिनल' येऊ द्या की राव.... Happy

छान लिहिलंयस अ‍डम... तिसर्‍या दुनियेची कल्पना मस्त आहे..

.

सही रे भाय, सही!!
अनेकांच्या मनातलं लिहिलं असशील बघ.. Happy

---
$

अ‍ॅडम, प्रामाणिक लिखाण एकदम. Happy

पुन्हा एकदा सगळ्यांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद .. Happy

मंजू, प्वाईंट नोटेड.. Happy

ए मंजे, त्याने झब्बू लिहीलेय खरे, पण झब्बू कसा असेल हा! त्यानी खूप आधीच लिहीले होते हे ब्लॉगवर राईट ?
म्हणजे ओरिजनलच आहे त्याचेही लेखन..
शिर्षकातले झब्बू काढून टाकले की झाले!

www.bhagyashree.co.cc/

अड्मा, छान लिहीलय्...अमेरीकेतल्या ७ वर्षांच्या (फक्त) आयुष्यात ७०० वेळेला तरी ह्या विषयावर मित्रांशी वाद, चर्चा झाल्यात्...नेहमी स्केअर १ हून सुरू होणारं चर्चेचं गुर्हाळ २ -३ तासांच्या चर्चे नंतर परत स्केअर १ लाच येऊन थांबतं...नोकरी लागली की लगेच पहील्या वर्षीच ३ बेडरूम हाऊस घेतलेले गुलटी मित्र बघीतलं की वाटलं हे लोकं किती सुखी आहेत, अमेरीकेत ह्यांनी पहीलं पाऊल टाकतानाच त्यांनी ठरवलेलं असतं की आता परत जाणे नाही....आणि एक आम्ही अजुनही कुठलीही मोठी खरेदी करताना एक मन सांगतं "इथे लाँग टर्म राहायचं नसेल तर कशाला एवढी इनवेस्टमेंट करायची"....
एनीवे आज पर्यंत मला तुझ्या सारख्या ईन्फोसीस किंवा टिसीएस तर्फे आलेल्या लोकांचा खुप हेवा वाटायचा....की ह्यांचं एक बरं आहे...प्रोजेक्ट साठी कंपनीनी सांगितलं जा की जायचं, कंपनीनी सांगितलं परत या की परत जायचं....स्वताच्या मनानी निर्णय घ्याय्ची भानगडच नाही....बट लूक्स लाईक दॅट्स नॉट द केस्...तुही आमच्या सारखा द्विधा मनस्थीतीत जातोस की...

अगं भाग्यश्री, माझी ही कायमची तक्रार आहे की तो फक्त त्याच्या ब्लॉगवर लिहितो. इथे फारसं लिहित नाही. म्हणजे दिवाळी अंकातल्या लेखानंतर तर त्याने मायबोलीवर काही लिहिलंच नाहीये. त्या अर्थी ओरीजिनल म्हटलं मी.. म्हणजे इथे लिहून त्याने त्याच्या ब्लॉगवर लिंक द्यावी असं गं. Happy

इथे राहणारया प्रत्येक व्यक्तिची कदाचित हीच व्यथा आहे, ती तू छान शब्दात नमूद केली आहेस. एनी काइंड औफ चेंज इज डिफिकल्ट इन लाईफ.

Pages