समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

Vivahasathi 'sammati' ha mahatvacha mudda asto. Jar Kutra- manjar sahi karu shakle aani pudhe jodidarachya ajarpanat tyachya drushtine yogya nirnay (ekhade operation karave ki nahi etc etc) deu shakle tar tyanchyashi lagna hi theekch aahe. Sadhyachya paristhitit he shakya nahi. Pudhe jar vidnyanane ase 'decision maker and informed consenters' kutre manjar bail gadhav banavale tar tyanchyashi lagna ha prashn yeil. Sadhya ha mudda lagoo hot nahi.

सिमन्तीनी, मी सगळ्याना प्रश्न विचारला होता. अगो नी उत्तर दिले, तुम्ह्नी स्पष्टीकरण दिलेत.

मला "कुठे चुकतोय" या प्रश्नाचे उत्तर मिळाले. धन्यवाद.

सुलु, हो माझे उत्तर सगळ्यांना उद्देशून होते. तुम्हाला वैयक्तिकरित्या नाही Happy

माझाही अभ्यास नाहीये ह्या विषयावर पण जेवढे वाचले आहे, डॉक्यूमेंटरीज बघितल्या आहेत त्यावरुन आणि कॉलेजमध्ये माझी एक अतिशय चांगली मैत्रिण समलिंगी होती तिच्यावरुन वर जे काही लिहिले आहे त्यात काहीही तथ्य नाही असे मला वाटते.

<केवळ समलैगिंकाना बहुतांश समाज नीट जगू देत नाही म्हणून समलैंगिकताच नैसर्गिक कशी ? >
या दोन वाक्यांचा संबंध 'म्हणून' या शब्दाने कसा काय जुळतो?
"समलैंगिकता नैसर्गिक नाही (असे काहींना वाटते) म्हबून बहुतांश समाज त्यांना नीट जगू देत नाही," असे म्हणले तर ठीक. पण उलट?

भरत मयेकर,
बरोबर प्रश्न. खरंय.
हे लिहिताना विचार असा होता की समलैंगिकता जर इतकी नैसर्गिक होती/आहे तर इतकी शतके लपवून ठेवायची काहीच गरज नव्हती/नाही. त्याच्या ओव्या गायचीही गरज नव्हती किंवा त्याला शिव्या द्यायचीही. केवळ काही पशु-पक्षी-वनस्पती समलैंगिक भोग घेतात (तेही गरज असेल तरच) म्हणून मनुष्याचे समलैंगिक वर्तन नैसर्गिक ठरत नाही.( माझे मत)
तसे बरेच फरक आपण आपल्यात आणि पशु-वनस्पती यांत सांगतो पण आपापल्या arguments च्या convenience साठी! Same holds true for proving similarities!

हे लिहिले कारण मूळ लेखाचा उद्देश ध्यानात न घेता प्रत्येक वाक्य खोडत केवळ समलैंगिक लोकांना एक मनुष्य म्हणून जगू देत नाहीत या वस्तुस्थितीच्या विरोधात मूळ मुद्द्यला बगल दिली गेली असे वाटले. लेखात भले ढीगाने चुका असतील पण काय उद्देशाने लिहिलेय ते पहायला हवे होते असे वाटतेय.

तुमचे वाक्य - << "समलैंगिकता नैसर्गिक नाही (असे काहींना वाटते) म्हबून बहुतांश समाज त्यांना नीट जगू देत नाही," असे म्हणले तर ठीक. पण उलट?>>
आता यातच विरोधाभास नाही का? जर 'काहींना' एखादी गोष्ट अनैसर्गिक वाटते तर बहुतांश समाज विरोध का करेल?

शेवटी नैसर्गिक्-अनैसर्गिक जर सापेक्षच मानले तर मी वर लिहिलेले सगळे समाजाला ( ज्यात आपण सर्व आलो) मान्य व्हायला हवे. ते होणार का? तुम्हला ते मान्य असेल का? केवळ arguments sake साठी हो/नाही म्हणू नका. विचार करा! ( सगळ्यानाच!)

उद्या पशु-पक्षी जसे उघयावर संभोग करतात तशी माणसं रस्त्यावर उतरून संभोग करायला लागली तर त्यालाही नैसर्गिक म्हणायचे का? जरी संभोग ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी, कोण कोणाबरोबर कधी कुठे किती संभोग करतोय त्याला तरी समाजाची चौकट लावाल की नाही एक मनुष्य म्हणून?

माझेही मित्र, colleagues समलिंगी आहेत. Bi-Sexual आहेत. बाहेरून छान आहेत. हुशार आहेत पण तरी देखील कुठे तरी कधी तरी त्यांचा interest, opposite sex मधून नाहिसा झालाय असं वाटतं आणि मला नाही वाटत हे नैसर्गिक रित्या झालं आहे. त्याना समजून घ्यायची गरज आहे आणि जमंलं तर परत opposite sex मधे interest कसा निर्माण होईल ते पहायची.

मला वैद्यकीय संशोधनाचे दाखले कृपया देऊ नका. परस्पर्-विरोधी संशोधनं दाखले देऊन लोकं नोबेल घेऊन गेली आहेत पूर्वी. तेव्हा जमल्यास common sense वापरा.

तेव्हा जमल्यास common sense वापरा. <<
सेम टू यू..
बेडरूममधे दोन माणसे परस्पर संमतीने जे करतात त्याबद्दल त्या दोन माणसांपैकी एकाचाही जोडीदार नसलेल्या तिसर्‍याने ओरड करायची काहीही गरज नाही.

>>तेव्हा जमल्यास common sense वापरा. <<
अनुमोदन,

>>बेडरूममधे दोन माणसे परस्पर संमतीने जे करतात त्याबद्दल त्या दोन माणसांपैकी एकाचाही जोडीदार नसलेल्या तिसर्‍याने ओरड करायची काहीही गरज नाही.

अतिशय दुर्दैवी विचार, ज्याने समाजाचे आरोग्य (शारिरिक, मानसिक) धोक्यात येऊ शकते अशा गोष्टींना लोक एवढा जोरदार पाठिंबा कसा काय देऊ शकतात देव जाणे.

२००९ चा लेख आत्ता वर आलाय...

समलैंगिकता हा समाजाला भेडसावणारा इतका भयाण प्रश्न नाही. त्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे समाजाचे आरोग्य वगैरे कसे काय धोक्यात येऊ शकते? भिन्नलैंगिकता समाजामधे कायम असेलच. फक्त काही व्यक्ती या समलैंगिक आहेत म्हणून त्यांना दुजाभावाने वागणून देणे चुकीचे आहे. आपल्याला भिन्नलैंगिकता जितकी नैसर्गिक वाटते तितकीच त्यांना समलैंगिकता. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक चॉइसला स्विकारणे आणि त्यांना विशेष वागणूक न देणे इतकेच अपेक्षित आहे.

अनैसर्गिक आणि विकृत गोष्टी आहेत या.>> कशावरून??? उद्या समलैंगिकांच्या हाती जर हे जग गेलं आणि त्यांनी भिन्नलैंगिकता ही अनैसर्गिक आणि विकृत आहे असं जाहीर केलं तर मुकाटपणे मान्य कराल का??

महेश,
समलैंगकता नैसर्गिक आहे, हे या विषयावर संशोधन करणार्‍या बहुतेक सर्व शास्त्रज्ञांनी आता मान्य केलं आहे. 'गे जीन' असतो/ असू शकतो, हेही आता मान्य झालं आहे. समलैंगिकता ही आईकडून मुलाकडे येते, असाही अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. या विषयावरचे शोधनिबंध गेली सातआठ वर्षं नामांकित जर्नलांमध्ये प्रसिद्धही होत आहेत.
भारतात सध्या सुप्रीम कोर्टात कलम ३७७ रद्द करावं, यासाठी खटला सुरू आहे. समलैंगिक मुलांचे पालक या खटल्यात या कलमाविरुद्ध उभे आहेत. अनेक शास्त्रज्ञांचं संशोधनही पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहेत.

एखादी व्यक्ती तिच्या शयनगृहात काय करते, हा तिचा वैयक्तिक मामला आहे. त्यात कोणीही दखल देऊ शकत नाही. तसं कोणी करत असेल, तर ती खरी विकृती.

तुम्ही काहीही म्हणा किंवा शास्त्रज्ञ काहीही म्हणोत, पण हे अतिशय चुकीचे आणि विकृत आहे. Angry
निव्वळ मानसिक विकृती !!!

>>त्यांनी भिन्नलैंगिकता ही अनैसर्गिक आणि विकृत आहे असं जाहीर केलं तर मुकाटपणे मान्य कराल का??
या जरतरच्या गोष्टी आहेत, आत्ता आहे का तसे ???

<तुम्ही काहीही म्हणा किंवा शास्त्रज्ञ काहीही म्हणोत, पण हे अतिशय चुकीचे आणि विकृत आहे. >

मग हरकत नाही. शास्त्रीय सत्य तुम्हांला नाकारायचं असेल, तर तसं. तुमच्या मतांचा प्रतिवाद करण्यात अर्थ नाही, हे वेळीच कळलं. Happy

नीधप, चिनुक्स,

आता समलैंगिक लोकांचे विवाह होवू लागले आहेत. ते फक्त बेडरूम मधे परस्पर संमतीने होत आहेत का? होणार आहेत का? ते लोक समाजात हे उघडपणे सांगणार नाहीयेत का? ते मुलं पैदा करणार नाहीयेत का? मुलं झाली तर चार भिंतींमधेच रहाणार आहेत का? ती बाकी मुलांबरोबर मिसळणार नाहीयेत का? त्यांच्या समलैंगिक माता-माता किंवा पिता-पित्यांचा विषय आजुबाजुच्या लोकांनी आणि ज्याना समजही नाही अशा लहान मुलांनी पोक्त पणे समजून घ्यायचाय का?
बेडरूम मधे किंवा चार भिंतींमधे परस्पर संमतीने लोक बरेच काही करतात. आणि त्यानी वाट्टेल ते करावे. प्रश्न येतोय ते इतके उघडपणे होवू लागल्यावर त्याचा समाजाने स्विकार करावा का याचा.
तसे चार भिंती मधे राहून रेव पार्टीज पण होतात की! त्यांच्यावर आजूबाजूचा समाज कधी ओरडतो ते लक्षात घ्या.
मी आधीच म्हटले होते की कृपया शास्त्राचे दाखले देवू नका. विज्ञान पण evolve होतेय. केवळ विज्ञान उद्या उलटे सांगते म्हणून तुम्ही तुमचे विचार लगेच बदलणार का? मी यालाच common sense म्हणतोय.
मी समलैंगिकतेच्या विरुद्ध नाही. समलैंगिक लोकाना एक माणूस म्हणून दुजा भाव द्यायच्यची विरुद्धच आहे. पण याचा अर्थ समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि मी समाजाचा घटक म्हणून तिचा स्विकार करावा असा होत नाही.
ज्याला हवे त्याने चार भिंतीमधे जसे हवे तसे ज्याच्याशी हवे तसा संभोग करावा. त्याना आनंद मिळतोय तर मलाही आनंद आहे. फक्त मग समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि 'समाजाने' त्याचा स्विकार करावा याच्यावर प्रश्न उठवतो आहे.

शास्त्रीय सत्य तुम्हांला नाकारायचं असेल, तर तसं. तुमच्या मतांचा प्रतिवाद करण्यात अर्थ नाही, हे वेळीच कळलं. <<<
+ १०००००००
अगदी अपेक्षित होता महेश यांचा अप्रोच. त्यांना वाटतं म्हणून यापलिकडे काहीही कारण नाही त्यांच्याकडे.

आता समलैंगिक लोकांचे विवाह होवू लागले आहेत. ते फक्त बेडरूम मधे परस्पर संमतीने होत आहेत का? होणार आहेत का? <<<
विवाह परस्परसंमतीनेच होणारेत. आईवडिलांनी ठरवले आणि कंपलसरी केले म्हणून केले असे होणार नाहीत. विवाहातील शरीरसंबंधांची कृती ते बेडरूममधेच करणारेत.
ते लोक समाजात हे उघडपणे सांगणार नाहीयेत का?<<
मग?
ते मुलं पैदा करणार नाहीयेत का? मुलं झाली तर चार भिंतींमधेच रहाणार आहेत का? ती बाकी मुलांबरोबर मिसळणार नाहीयेत का? त्यांच्या समलैंगिक माता-माता किंवा पिता-पित्यांचा विषय आजुबाजुच्या लोकांनी आणि ज्याना समजही नाही अशा लहान मुलांनी पोक्त पणे समजून घ्यायचाय का? <<<
अहो हे ऑलरेडी होतंय आणि छानपद्धतीने होतंय. लहान मुलांना काहींना आई-बाबा असतात, काहींना आई-आई असतात आणि काहींना बाबा-बाबा असतात हे समजणे अगदी सोपे जाते. मात्र पालक आडमुठे असतील तर ते हे विकृत आहे इत्यादी विष पेरू शकतात.

>>> बेडरूम मधे किंवा चार भिंतींमधे परस्पर संमतीने लोक बरेच काही करतात. आणि त्यानी वाट्टेल ते करावे. प्रश्न येतोय ते इतके उघडपणे होवू लागल्यावर त्याचा समाजाने स्विकार करावा का याचा. <<<
मी समाजाचा भाग आहे आणि माझ्यासारखे समाजाचे अनेक लोक अत्यंत मोकळेपणाने स्वीकार करतायत. उद्या अजून लोक करतील. त्याला पर्याय नाही.
तुम्ही स्वीकारत नाही म्हणून इतर मूर्ख असं म्हणता येणार नाही.

<ज्याला हवे त्याने चार भिंतीमधे जसे हवे तसे ज्याच्याशी हवे तसा संभोग करावा. त्याना आनंद मिळतोय तर मलाही आनंद आहे. फक्त मग समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि 'समाजाने' त्याचा स्विकार करावा याच्यावर प्रश्न उठवतो आहे.>
म्हणजे एक क्रेझ किंवा खाज म्हणून कोणी लपूनछपून समलैंगिक संबंध ठेवलेले चालतील?( फक्त त्याला नैसर्गिक म्हणून नका आणि मान्यता देऊ नका.)

आँ????

यापेक्षा मला महेश यांची भूमिका बरी वाटली.

>> तुम्ही काहीही म्हणा किंवा शास्त्रज्ञ काहीही म्हणोत, पण हे अतिशय चुकीचे आणि विकृत आहे. राग
>> निव्वळ मानसिक विकृती !!!

मग काय करायचं म्हणता या लोकांचं? जन्मठेप? फाशी? मानसोपचार? खच्चीकरण? काय नक्की?

सुलु ताई, माफ करा,
>>
आता समलैंगिक लोकांचे विवाह होवू लागले आहेत. ते फक्त बेडरूम मधे परस्पर संमतीने होत आहेत का? होणार आहेत का? ते लोक समाजात हे उघडपणे सांगणार नाहीयेत का?<<

हे वाचून राहवले नाही. बोल्ड केलेल्या प्रश्नांबद्दल शंका आहे. विचारू इच्छितो.


ते मुलं पैदा करणार नाहीयेत का?

>> कसे? आय मीन दोन समलिंगी पुरुष मुले कशी काय 'पैदा' करणार? दोन लेस्बियन्स चं समजून घेऊ एकवेळ, आर्टिफिशिय इन्सेमिनेशन वगैरे.

मुलं झाली तर चार भिंतींमधेच रहाणार आहेत का?
>>नाही. पण अशी वेगळ्या पालकांची मुले या भावी समाजाचे घटक असणारेत, अन त्यांच्या कन्सेप्ट्स वेगळ्या असल्याने, कदाचित त्या नव्या समाजाचे नियम देखिल वेगळे असतील?

ती बाकी मुलांबरोबर मिसळणार नाहीयेत का?
ऑफ कोर्स मिसळणार आहेत.

त्यांच्या समलैंगिक माता-माता किंवा पिता-पित्यांचा विषय आजुबाजुच्या लोकांनी आणि ज्याना समजही नाही अशा लहान मुलांनी पोक्त पणे समजून घ्यायचाय का?
इथे सिंगल पेरेंट्स, घटस्फोटित मातापित्यांची मुले, अनाथाश्रमांतून 'टाकून' दिलेली मुले, यांच्या पोक्तपणाचे काय? ती मुले काय करतात?

सुलु,
मी समलैंगिकतेच्या विरुद्ध नाही. समलैंगिक लोकाना एक माणूस म्हणून दुजा भाव द्यायच्यची विरुद्धच आहे. पण याचा अर्थ समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि मी समाजाचा घटक म्हणून तिचा स्विकार करावा असा होत नाही.>>>> ही दोन्ही वाक्य परस्पर विरोधी नाही वाटत का?
जर तुम्ही विरुद्ध नाही अन माणूस म्हणून त्यांना इतरांसारखी वागणूक देऊ शकताय तर मग "मी समाजाचा घटक म्हणून तिचा स्विकार करावा असे नाही" या वाक्यातून कसला स्वीकार न करण्याबद्दल म्हणताय तुम्ही?
कारण वर लिहिलेय त्यापलिकडे समाजाचा संबंधच कुठे येतो?

>>बेडरूममधे दोन माणसे परस्पर संमतीने जे करतात त्याबद्दल त्या दोन माणसांपैकी एकाचाही जोडीदार नसलेल्या तिसर्‍याने ओरड करायची काहीही गरज नाही.>> अतिशय सहमत.
>>अतिशय दुर्दैवी विचार, ज्याने समाजाचे आरोग्य (शारिरिक, मानसिक) धोक्यात येऊ शकते अशा गोष्टींना लोक एवढा जोरदार पाठिंबा कसा काय देऊ शकतात देव जाणे.>> बलात्कार वगैरे खपतायत की. तेव्हा कुणी समाजाच्या स्वास्थ्याबद्दल बोलत नाही. समलिंगी संबंध असणार्‍यांना त्यांच्या भरवशावर सोडा की.

सुलु ताई, माफ करा,
>>> इब्लिस, ते सुलुताई नसून सुलुभाऊ आहेत.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

त्यांना बहुतेक वाटतंय की सर्वांना निदान एक समलिंगी संबंध ठेवायची सक्ती करतंय सरकार<<
बहुतेक वेळेला समलिंगी संबंधांना हिरीरीने विरोध करणार्‍यांचा असाच गैरसमज असतो. Happy

नीधप, भरत, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजून घेतोय. पटत काहीच नाहीये. उद्या आई-मुलगा, बाप्-मुलगी, भाऊ-बहिण, भाऊ-भाऊ असेही पालक दिसतील आणि हे सर्व इतर पालकानी स्विकार करा असा ओरडा होतोय असे दिसतेय. मुलाना समजावणे तर त्याहून बीकट होवून बसेल असे दिसतेय.

नीधप,
<<अहो हे ऑलरेडी होतंय आणि छानपद्धतीने होतंय. लहान मुलांना काहींना आई-बाबा असतात, काहींना आई-आई असतात आणि काहींना बाबा-बाबा असतात हे समजणे अगदी सोपे जाते. मात्र पालक आडमुठे असतील तर ते हे विकृत आहे इत्यादी विष पेरू शकतात.
>>
मुलाना एवढेच सांगितले तर नक्कीच सोपे आहे हो! पण मग तुम्ही मुलाना ओळखत नाही असे म्हणीन.

भरत,
<<
म्हणजे एक क्रेझ किंवा खाज म्हणून कोणी लपूनछपून समलैंगिक संबंध ठेवलेले चालतील?( फक्त त्याला नैसर्गिक म्हणून नका आणि मान्यता देऊ नका.)

>>
नक्कीच चालतील. चार भिंतीत वाट्टेल तेवढे कव्वल्या गा. फक्त शेजार्याना टाळ्या वाजवायला सांगू नका.

Pages