बहारीनचा सुर्यास्त.......

Submitted by पल्ली on 6 January, 2008 - 03:47

एक हळवा सुर्यास्त !
हरवलेल्या अज्ञाताची हुरहुर पेटवून लपणारा.
मावळलेल्या सोबत्यांची सय दाट करणारा.
दाटलेल्या अस्वस्थ लाटा काठावर आणायला हातभार लावणारा.
व्याकूळ काळजाला भरभरून चिंब होण्यासाठी आभाळभर काळोखाची सोय करणारा.
मित्रच नव्हे का ? !!!

...........................अज्ञात